#T20WorldCup | सांघिक खेळाने श्रीलंकेचा विजय

गेलॉंग (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका संघाने सांघिक खेळाच्या जोरावर अमिराती संघाचा 79 धावांनी पराभव केला व पहिला विजय नोंदवला. (Sri Lanka come roaring back into the tournament with a comprehensive win over UAE) पहिल्या सामन्यात नामिबियाकडून पराभव स्वीकारल्यावर आशिया करंडक स्पर्धेत विजेत्या श्रीलंकेने आपला खेळ उंचावला.

अमिरातीचा कर्णधार चंदगपोइल रिझवानने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर पाथुम निसांकाने कुशल मेंडीसच्या साथीत थाटात सुरुवात केली. मेंडीस 13 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 18 धावांवर बाद झाल्यावर निसांकाने धनंजय डीसील्व्हाला साथीला घेत डाव सावरला.

डीसील्व्हा 21 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 33 धावांवर बाद झाला. निसांकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. डीसील्व्हा बाद झाल्यावर निसांकाने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत आक्रमक फलंदाजी केली. मात्र, कोणत्याही अन्य फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. अत्यंत बेजबाबदार फटकेबाजी करत ते बाद झाले.

निसांकाने संघाला दीडशतकी मजल मारून दिली. त्याने आपल्या 74 धावांच्या खेळीत 60 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 2 षटकार फटकावले. श्रीलंकेचा डाव 20 षटकांत 8 बाद 152 असा रोखला गेला. अमिरातीकडून कार्तिक मेयीप्पनने 3, तर जहोर खानने 2 गडी बाद केले.

#T20WorldCup | बलाढ्य वेस्ट इंडीजवर स्कॉटलंडची मात

विजयासाठी 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमिरातीच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. त्यांचा डाव 17.1 षटकांत अवघ्या 73 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून अय्याज अफजल खानने 19, जुनैद सिद्दीकीने 18, तर चिराग सुरीने 14 धावा केल्या. अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली.

श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने 4 षटकांत 1 षटक निर्धाव टाकताना 8 धावा देताना 3 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना दुष्मंत चमिराने 3, तर महिशा तक्षिणाने 2 गडी बाद केले. प्रमोद मधुशान व कर्णधार दासुन शनाका यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.