#T20WorldCup | रोमांचक सामन्यात वेस्टइंडिजची झिम्बाब्वेवर ३१ धावांनी मात

T20WorldCup – वेस्टइंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात आज पात्रता फेरीतील सामना खेळला गेला. या सामन्यात इंडिज संघाने विरोधी संघाचा ३१ धावांनी पराभव केला आहे. वेस्टइंडिज संघाने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघ १८.२ षटकांत १२२ धावां पर्यंतच पोहचू शकला. विंडीज संघाकडून अल्ज़ारी जोसेफ याने दमदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

“जय शहा यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा इशारा

वेस्टइंडिज संघाने दिलेल्या लक्षच पाठलाग करत असताना झिम्बाब्वे संघ सामन्यात बाजी मारु शकतो असे वाटत होते. मात्र वेस्टइंडिजच्या जोसेफने दमदार गोलंदाजी करत विरोधी संघाच्या प्रमुख ४ फलंदाजांना तंबूत पाठवण्यात यश मिळवले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

वेस्टइंडिज संघाने स्पर्धेतील ( T20WorldCup ) पहिला सामना गमावला होता. स्कॉटलंड विरुद्धच्या पहिल्याच मोठा उलटफेर पाहायला मिळाला होता. त्यानंतर आज झालेल्या सामन्यातही इंडिज संघाच्या हातातून सामना निसटत असल्याचे चित्र दिसत होते मात्र, त्यानंतर अल्ज़ारी जोसेफच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे झिम्बाब्वे संघाच्या धावसंख्येला ब्रेक लागला. त्यामुळे इंडिज संघाला हा सामना जिंकण्यात यश आले.