भाजप आमदार राम कदमांना ‘कंबल बाबा’ची भुरळ; अंधश्रद्धेला खतपाणी, गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई  – राज्यात सध्या कंबल बाबांची चांगलीच चर्चा रंगली आहे. रुग्णावर उपचार करत असल्याचा दावा करत या बाबाने सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यात आता भाजप आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांनीही या कंबल बाबाला (kambal baba) उपाचारासाठी मुंबईत बोलावले आहे. त्यामुळे राम कदम यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इतकेच नाही … Read more

पुणे : सीबीआयने दाखल केलेली कागदपत्रे आरोपीच्या वकिलांना अमान्य

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयने न्यायालयात सादर केलेली पुराव्यांशी संबंधित तेरा महत्त्वाची कागदपत्रे अमान्य आहेत, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे सीबीआयच्या विशेष सरकारी वकिलांना साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) देऊन ही कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत. याप्रकरणी 13 ऑक्‍टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. विशेष … Read more

डॉ. दाभोळकर प्रकरण ; डॉ. वीरेंद्रसिंह तावडे व विक्रम भावे यांचा पुन्हा जामिनासाठी अर्ज

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलळकर यांच्या हत्या प्रकरणातील संशियित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी (दि.13) सीबीआय म्हणणे सादर करणार आहे. त्यानुसार पुढील सुनावणी होईल, अशी माहिती डॉ. तावडे आणि भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली. दरम्यान ऍड. पुनाळेकर यांनी … Read more

ग्रहणाच्या काळात भाजीपाला सुरीने चिरत गर्भवतीने झुगारल्या विविध अंधश्रद्धा

इस्लामपूर : महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला सौ. समृद्धी चंदन जाधव या तरुणीने आज पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या. ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे,पाणी पिणे,हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत … Read more