सव्वातीन लाख कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’; दिवाळीनिमित्त जिल्ह्यात वाटप सुरू

पुणे – राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा आढावा घेतला. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते, परिमंडळ अधिकारी दिनेश … Read more

आनंदाच्या शिध्यापासून शिधापत्रिकाधारक दूरच

पुणे – दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शहरातील सुमारे 3 लाख 20 हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. शिधा देण्यासाठी नेमलेल्या पुरवठादाराकडून अजूनही पूर्णपणे साहित्य पुरवठा विभागाकडे पोहचलेच नाही. आतापर्यंत शहरातील सुमारे 93 हजार नागरिकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचला आहे. दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आलेला असताना अजूनही सुमारे 2 … Read more

अहमदनगर – लाभधारक “आनंदाचा शिधा’च्या प्रतीक्षेत!

शेवगाव -दीपावलीचा सण तोंडावर येऊन ठेपला असूनही येथील लाभधारक अद्याप आनंदाचा शिधाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्‍यातील प्राधान्य कुटुंब कार्ड लाभधारक 32 हजार 766 व अंत्योदयचे 9 हजार 756 अशा एकूण 39 हजार 885 लाभधारक कार्डधारकांसाठी आजअखेर केवळ 37 हजार आनंदाचा शिधा संच शेवगाव पुरवठा विभागात प्राप्त झाला आहे. त्यातही लाभधारकाला शंभर रुपयात वाटप करावयाच्या साखर, पामतेल, … Read more

“सगळा कमिशनचा व्यवहार चालू”; आनंदाचा शिधावरून नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

मुंबई – राज्य सरकारकडून नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. 100 रुपयांमध्ये हा शिधा उपलब्ध करून दिला जाणार आहे. गेल्या वर्षीही राज्य सरकारडून आनंदाचा शिधा देण्यात आला होता. त्यानंतर याहीवर्षी देण्यात येणार आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. अनेक महत्वाच्या निर्णयासह दिवाळीला दिला … Read more

Maharashtra Govt : ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा; मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

औरंगाबाद :- गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गणेशोत्सवाच्या आधी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व त्यासाठी काटेकोर नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मंत्री भुजबळ हे औरंगाबाद येथे आले असता त्यांनी  रविवारी(दि.२७) पुरवठा व ग्राहक संरक्षण … Read more

#हिवाळीअधिवेशन2022 : ‘आनंदाचा शिधा’चा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

नागपूर : कोरोना काळात गरिबांची आर्थिक स्थिती खालावली होती. दिवाळीमध्ये त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून राज्य शासनाने प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आनंदाचा शिधा 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला. राज्यात आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला असून ही सर्व प्रक्रिया ई-लिलावाद्वारे झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र … Read more