पुणे : महापालिका हद्दीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक बाधित

पुणे-राज्यात ओमायक्रॉनचे सोमवारी नवे 31 बाधित आढळले आहेत. यामध्ये पुणे शहरातील बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे शहरातील बाधितांची संख्या 28 आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 1 हजार 247 झाली आहे. याशिवाय पुणे ग्रामीण मधील दोन आणि पिंपरी चिंचवड मध्ये एका बाधिताचा समावेश आहे. एकूणच सोमवारी जे बाधित सापडले आहेत ते सगळेच्या सगळे पुणे जिह्यातील आहेत. … Read more

करोनाचा कहर महाराष्ट्रात ‘मिनी लॉकडाऊन’ सुरू, मुंबईतील धारावीत पॉझिटिव्हिटी रेट २१ टक्क्यांवर

मुंबई – ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे. याशिवाय राज्यात करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार निर्बंध व नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील, असे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पत्रकाद्वारे … Read more

पुण्यात 118 ओमायक्रॉनचे नवे रुग्ण; 2,471 नवीन बाधित

पुणे- शहरात आज नव्याने 2 हजार 471 करोना बाधित सापडले. वाढत्या संसर्गामुळे तपासणीच्या संख्येत वाढ करण्यात आली असून, दिवसभरात तब्बल 19 हजार 186 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. दरम्यान, राज्यात आज ओमायक्रॉनचे एकूण 133 रुग्ण सापडल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये पुणे महापालिकेत सर्वाधिक 118 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 3, वसई विरार येथे … Read more

Coronavirus : देशात करोनाची १ लाख ४१ हजार ९८६ नवीन प्रकरणे, ४० हजारपेक्षा जास्त करोनामुक्त

नवी दिल्ली – देशातील प्राणघातक करोना विषाणूच्या साथीचा वेग अनियंत्रित होत आहे. यासोबतच करोनाचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत करोना विषाणूचे एक लाख ४१ हजार ९८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, २८५ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ओमायक्रॉची ३ हजार ७१ प्रकरणे समोर आली … Read more

चिंताजनक! देशातील ‘ओमायक्रॉन’ रुग्णांची संख्या 3 हजाराच्या पुढे

नवी दिल्ली- देशात करोना रुग्णांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात ८७६ ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली असून देशात ओमायक्रॉन रुग्णांचा आकाडा आता ३ हजार ७ वर गेला आहे. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रसह दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, केरळ, गुजरात व … Read more

‘ओमायक्रॉन’ संदर्भात दिलासादायक बातमी; ‘ICMR’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना विषाणू ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी OmiSure किटला मान्यता दिली आहे. OmiSure हे किट टाटा मेडिकलने विकसित केले आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या TATA MD CHECK RT-PCR OmiSure ला ICMR ने 30 डिसेंबर रोजीच मान्यता दिली होती, परंतु त्याची माहिती आज मंगळवारी समोर आली आहे. Omisure … Read more

सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित पुण्यात

पुणे – पुणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली असून, राज्यात रविवारी 50 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या 49 झाली असून, राज्यात ओमायक्रॉन बाधितांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. तर सांगलीचा नव्याने समावेश झाला आहे. राज्यातील एकूण बाधित संख्या रविवारी 510 झाली आहे. रविवारी नोंद झालेल्या 50 बाधितांमधील … Read more

चिंताजनक! ‘ओमायक्रॉन’रुग्णांमध्ये वाढ; 27 दिवस, 21 राज्ये आणि 781 प्रकरणे

नवी दिल्ली – ओमायक्रॉनचा धोका देशात सातत्याने वाढत आहे. करोनाचा हा नवीन प्रकार देशातील 21 राज्यांमध्ये पोहोचला आहे. गेल्या 24 तासात ओमायक्रॉनचे 128 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 871 वर पोहचली आहे. ओमायक्रॉनचे 241 रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक प्रकरणे आहेत, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. … Read more

‘ओमायक्रॉन’ प्रकरणांमध्ये दिल्ली अव्वल, महाराष्ट्राला टाकले मागे, देशात एकूण 598 रुग्ण

नवी दिल्ली – ओमायक्रॉन रुग्ण संख्येत दिल्लीने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. दिल्लीत आता एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 142 झाली आहे तर महाराष्ट्रात आता 141 प्रकरणे आहेत. देशात एकूण 598 रुग्ण आहेत. ओमायक्रॉनया धोका लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने आज रात्रीपासून राजधानीत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. देशात करोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरीयंटचा … Read more

ओमायक्रॉन : देशात दर तासाला मिळत आहेत पाच रुग्ण

नवी दिल्ली – ओमायक्रॉन देशात वेगाने पसरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत देशात प्रथमच 122 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. म्हणजेच दर तासाला सरासरी 5 रुग्ण येत आहेत. देशातील ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 358 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांची संख्या बघून चिंता व्यक्त केली जात आहे. ओमायक्रॉनची लागण झालेल्या … Read more