पुण्यात करोनाची मुबलक लस

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 – गेल्या अनेक दिवसांपासून करोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा भासत होता. त्यामुळे या मोहिमेला काही अंशी खो बसला होता. मात्र आता मुबलक पुरवठा असल्याचे लसीकरण विभागाकडून सांगण्यात आले. शहरासाठी कोविशिल्ड, कोव्हॅक्‍सिन, कॉर्बेव्हॅक्‍स मिळून 84 हजार डोस शिल्लक आहे. तर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण मिळून एकूण 3 लाख 9 … Read more

वार्धक्‍यात नको ‘नटसम्राट’चे भोग ! संपत्तीचे मृत्युपत्र करण्यावर ज्येष्ठ नागरिकांचा भर; करोनानंतर दस्तांत वाढ

    गणेश आंग्रे पुणे, दि. 16 -आयुष्याच्या संध्याकाळी संपत्ती मुलांच्या नावावर करायची अन्‌ निर्धास्त व्हायचं. अशीच आजवर ज्येष्ठांची भूमिका असायची. अलीकडे मात्र ही भूमिका बदलतेय. उतारवयात “नटसम्राट’चे भोग नकोत, की मृत्यूपश्‍चात कुटुंबीयांत कलह, यामुळे मृत्यूपत्र करण्यावर भर दिला जात आहे. मागील 20 महिन्यांत राज्यात 81 हजार 216 मृत्यूपत्रांची नोंदणी झाली आहे. करोना संकटाच्या काळानंतर … Read more

‘नमस्ते ट्रम्प’मुळे देशात करोना पसरला…ज्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी यांची : नवाब मलिक

मुंबई – करोना काळात राज्य सरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादले. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर करोना पसरवण्याचा आरोप केला त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी करोना पसरणार नाही असे सांगितले होते. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले, ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात करोना पसरला असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था केली, जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळ्या वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोक भोगत आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.

Coronavirus : गेल्या 24 तासात देशात 70 हजारांहून कमी रुग्णांची नोंद; मात्र मृतांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली – भारतात करोनाचा कहर आता पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. तब्बल महिनाभरानंतर सलग दुसऱ्या दिवशी करोनाचे एक लाखांहून कमी नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 67 हजार 597 नवीन करोना रुग्ण आढळले असून 1 हजार188 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. काल देशात करोनाचे 83 हजार 876 नवे रुग्ण मिळाले होते आणि … Read more

पुणे : नव्या बाधितांचे प्रमाण हजाराच्या आत

पुणे- करोना बाधितांचे प्रमाण हजाराच्या आत आले असून, गेल्या 24 तासांत 776 नवे बाधित आढळले आहेत. तर राज्यात 6 हजार 436 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. पुणे शहर हद्दीत गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे; तर हद्दीबाहेर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 24 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात दिवसभरात … Read more

Coronavirus : देशात करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या आकडेवारी

नवी दिल्ली- देशात करोना संकटादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुद्दा कमालीची घट झाली आहे. सोमवारी (7 फेब्रुवारी) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 876 नवीन रुग्ण आढळले आहेत. जे कालच्या तुलनेत सुमारे 25 हजारांनी कमी आहे. त्याच वेळी, गेल्या … Read more

‘वर्क फ्रॉम होम’ समाप्त : आजपासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन करावे लागणार काम

नवी दिल्ली – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करण्याची मूभा देण्यात आली होती. दरम्यान करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याने हा निर्णय … Read more

दिलासादायक! पुणे शहरात करोना बाधितांची संख्या घटली

पुणे –गेल्या पाच-सहा दिवसापासून बाधितांची संख्या कमी झाली असून, गेल्या 24 तासांत 2 हजार 110 नव्या बाधितांची नोंद झाली. संशयितांच्या टेस्टही कमी झाल्या असून, मृतांची संख्या मात्र वाढली आहे. दिवसभरात 9 हजार 118 संशयितांया स्वॅब टेस्ट झाल्या असून, आजपर्यंत 43 लाख 76 हजार 575 जणांच्या टेस्ट झाल्या आहेत. त्यातील 6 लाख 48 हजार 592 जण … Read more

दिलासादायक! करोना रुग्णांमध्ये घट; गेल्या 24 तासांत 1 लाख 49 हजार रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – कालच्या तुलनेत आज देशात प्राणघातक करोनाव्हायरस साथीच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 1 लाख 49 हजार 394 नवीन रुग्ण आढळले असून 1072 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज करोनाचे 13 टक्के रुग्ण कमी मिळाले आहेत. काल एक लाख 72 हजार 433 करोनाचे रुग्ण मिळाले होते. … Read more

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 1 हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; 1 लाख 72 हजार 433 नवीन रुग्ण

नवी दिल्ली – कालच्या तुलनेत आज देशात प्राणघातक करोना व्हायरस साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 1 लाख 72 हजार 433 नवीन रुग्ण आढळले असून 1 हजार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज करोनाचे 6.8 टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत. India reports 1,72,433 fresh COVID cases (6.8% higher … Read more