आणखी दोन भाषणांवरून मोदींना निवडणूक आयोगाकडून क्‍लीन चिट

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज आणखी दोन भाषणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चिट दिली. कर्नाटकच्या चित्रदुर्गमधील सभेत मोदींनी पुलवामाचा उल्लेख करत बालाकोट हवाई हल्ल्यातील हिरोंसाठी मतदान करावे अशी हाक दिली होती. तर, गुजरातच्याच्या अहमदाबाद येथील रॅली बाबत सुद्धा निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिली आहे. मोदींच्या भाषणांमधून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा निर्वाळा … Read more

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल

मुख्यमंत्र्यांची केंद्रिय निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य मुंबई – राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन निवडणूकीच्या दिवसांतच दुष्काळाची दाहकता वाढत असताना दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आचारसंहितेमुळे सरकारपुढे अडचण निर्माण झाली होती. मात्र, राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता शिथिल करण्याच्या मागणीला केंद्रिय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आयोगाने मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य केल्याने राज्यातील दुष्काळी … Read more

मोदींनी राजीव गांधींबद्दल केलेल्या विधानावरून काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वताला मिस्टर क्‍लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते त्यावर कॉंग्रेसकडून तीव्र टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Read more

दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला आदर्श आचारसंहितेमध्ये सवलत

मुंबई – राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आदर्श आचारसंहितेमध्ये सवलत दिली आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने दुष्काळ निवारणाच्या कामाला परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे, अशा ठिकाणी कामे करण्यास बंधन नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. Election Commission of India has given relaxation in Model Code of Conduct in Maharashtra … Read more

निवडणूक आयोगातर्फे साध्वी प्रज्ञा सिंह यांना पुन्हा नोटीस

भोपाळ –  साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी बाबरी मस्जिद पाडल्याचा आपल्याला अभिमान आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. साध्वी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी निवडणूक आयोगातर्फे त्यांच्यावर ३ दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी निवडणुकीच्या प्रचारात … Read more

पंतप्रधान मोदींकडून सतत आचरसंहितेचे उल्लंघन – माजी निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत आचरसंहितेचे उल्लंघन करत असून, निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका माजी निवडणूक आयुक्त डॉ.एस.वाय. कुरैशी यांनी केली आहे. संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने ओडिशातील १९९६ मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला (मोहम्मद मोहसिन) बुधवारी निलंबित केलं होत. यावरूनच डॉ.एस.वाय. कुरैशी यांनी निवडणूक आयोग आणि मोदींवर निशाणा … Read more

निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही हजर राहण्याचे आदेश नवी दिल्ली – निवडणूक प्रचारात जाती-धर्माच्या आधारे मते मागणाऱ्या नेत्यांवर कारवाई न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. “धर्माच्या आधारे मतदान करा’, या वक्तव्यावरील नोटिशीला मायावतींनी उत्तर दिले नाही, मग तुम्ही काय केले? असा प्रश्‍न उपस्थित करत न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले. तसेच या प्रकरणी मंगळवारी होणाऱ्या सुनावणीला … Read more

भाजपाच्या प्रचार साहित्यात एअर स्ट्राईकचा वापर

प्रचार साहित्य जप्त ; निवडणूक आयोगाची कारवाई मुुंबई – लोकसभा निवडणूकीतील प्रचार साहित्यात सर्जिकल स्ट्राईक, हवाई दलाच्या विमानाचे छायाचित्र तसेच भारतीय सैन्यांच्या प्रतिमांचा वापर असलेले प्रचारसाहित्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी छापा मारून जप्त केले. कॉंग्रेसने याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील खार उपनगरात ‘युनायटेड फॉस्फरस लिमिटेड’ कंपनीच्या … Read more

भाजपाचा प्रचार करणाऱ्या टीव्ही मालिकांच्या निर्मात्यांना आयोगाचा दट्ट्या

 एका दिवसात खुलासा करण्याचा आदेश मुुंबई – लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत टिव्ही मालिकांच्या माध्यमातून भाजपाचा छुपा प्रचार करणाऱ्या मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने चांगलाच दट्ट्या दिला आहे. या निर्मात्यांना आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांना 24 तासांत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. झी टीव्ही आणि ऍण्ड टीव्ही या वाहिन्यांनी आपल्या भाभाजी घर पर है, तुझसे है राबता… … Read more

अरूणाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात रोकड सापडल्याचा कॉंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली – अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या ताफ्यात तब्बल 1 कोटी 80 लाख रूपयांची रोकड सापडल्याचा आरोप कॉंग्रेसने बुधवारी केला. त्या प्रकरणावरून खंडू यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पक्षाने केली. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी येथे पत्रकार परिषदेत रोकड सापडल्याचा आरोप करताना दोन व्हिडीओ दाखवले. … Read more