दुसऱ्यांदा मुलगीच झाल्याने विहिरीत ढकलून पत्नीचा खून; निर्दयी पतीला अटक

सांगली – मुलगी जन्मली की घरात लक्ष्मी आली असे म्हटले जाते. मात्र पहिली मुलगी असताना दुसऱ्यांदाही मुलगीच जन्माला आली म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना सागंली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळील कापूसखेड हद्दीत घडली. विहिरीत ढकलून खून करण्यात आला. राजनंदिनी सरनोबत (वय 29) असे मृत्यू पावलेल्या विवाहितेचे नाव असून कौस्तुभ सरनोबत (वय 30) असे संशयीत आरोपी पतीचे … Read more

सातारा: खूनप्रकरणी महिलेला जन्मठेपेची शिक्षा

वाठार स्टेशन – नांदवळ (ता. कोरेगाव) येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणी सीमा नामदेव चव्हाण (वय ३०) हिला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत वाठार स्टेशन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदवळ येथील हुपळी या शिवारात वाघोली (ता.कोरेगाव) येथील शैलेश अशोक भोईटे यांची शेत जमीन होती. या शेतात नांदवळ येथील सीमा नामदेव चव्हाण ही … Read more

कराड मध्ये डोक्यात दगड घालून युवतीचा निर्घृण खून

कराड – डोक्यात दगड घालून युवतीचा खून करण्यात आल्याची घटना कराड तालुक्यातील कार्वे- कोरेगाव रस्त्यालगत उसाच्या शेतात उघडकीस आली. संबंधित २५ वर्षीय युवतीचा मृतदेह सोमवारी (दि. 3) सकाळी आढळून आला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कार्वे- कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या भैरोबा मंदिराजवळ उसाच्या शेतामधून जाणाऱ्या वाटेवर युवतीचा मृतदेह आढळून आला.मृतदेहाशेजारीच … Read more

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा पंचायत समिती सदस्याकडून खून; दोघांना अटक

आष्टा – अनैतिक संबधात मुलगा अडथळा ठरत होता म्हणून पंचायत समिती सदस्याकडून ६ ऑक्टोबर रोजी खून करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे यामध्ये प्रेयसीचाही हात होता. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे हा प्रकार घडला होता. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी पंचायत समिती सदस्यासह प्रेयसीलाही अटक केली आहे. अमरसिंह ऊर्फ अमर विश्वासराव पाटील, वय 36 असे पंचायत समिती सदस्याचे नाव … Read more

पुण्यात 17 वर्षीय युवकाचा गोळ्या झाडून खून,परिसरात खळबळ

तळेगाव दाभाडे – पुण्यासह परिसरात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. गुन्हेगारांनाही पोलिसांचा धाक राहिला नाही हे परिसरात घडलेल्या अनेक गुन्हेगारी घटनावरून दिसून येत आहे. असे असताना आज एका 17 वर्षीय तरूणाची अज्ञाताने गोळ्या झाडून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील नॅशनल … Read more

राजगुरूनगर : २८वर्षीय युवकाचा निघृण खून

राजगुरूनगर – अज्ञात कारणावरुन खरपुडी ता खेड हद्दीत २८वर्षीय युवकाचा निघृण खून करण्यात आला असून त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रावरही हल्ला केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.तालुक्यात खुनाचे सत्र सुरूच असून दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. रामदास सोपान थिटे वय २८ , रा. सडकवस्ती रेटवडी, ता खेड असे खुन झालेल्या तरुणाचे नांव आहे. तर … Read more

पुण्यात मुलांचा सांभाळ करण्यावरून पत्नीचा खून

पुणे- मुलांना जेवायला देताना किरकिर घालणाऱ्या पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याचा धक्‍कादायक प्रकार काशेवाडी येथील अशोकनगर कॉलनी येथे घडला. यातील पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. आस्मा हवारी (35 रा. अशोकनगर, काशेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून याप्रकरणी पती तौसिफ नुरहसन हवारी (37) याला … Read more

पुण्यात चेष्टा मस्करीतून सकाळी-सकाळी मध्यवस्तीत तरुणाचा खून

पुणे : चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका  तरुणाने चाकूने आपल्या मित्रावर वार करुन लाकडी दांडक्याने मारहाण करून  त्याचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहिती दिली. अमन अशोक यादव (वय २६) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आर सी एम गुजराथी शाळेसमोरील फुटपाथवर आज सकाळी  पावणे सहा वाजता हा प्रकार घडला. … Read more

तृतीयपंथी सारिकाच्या खून प्रकरणी आरोपी अटक

पुणे – तृतीयपंथी सारिकाचा खून करणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पैसा आणि शरीरसंबंधातून वाद झाल्यावर हा खून करण्यात आला. आरोपी हा पीओपीचे काम करतो. ही घटना कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाच्या जंगलात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सागर उर्फ सारिका उजागरे (वय 23) असे खून झालेल्या तृतीयपंथीयांचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात … Read more

मुंबईत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून ‘खून’

मुंबई – राज्यात महिला अत्याचाऱ्यांच्या घटनेत दिवसांदिवस वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागातून रोजच महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न महिलांसह सर्वसामान्यांना पडला आहे. असे असताना मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात … Read more