…म्हणून सुनेने आधी भररस्त्यात सासऱ्यावर कुऱ्हाडीने केले ‘वार’; नंतर दगडाने ठेचून केली हत्या, नगर हादरले

अहमदनगर – सासरा सुनेच्या झालेल्या भांडणातून सुनेने सासऱ्याची भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वार केल्यानंतर सुनेने दगडाने सासऱ्यांचे डोके ठेचले आहे. सासरा सारखा चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे या दोघांमध्ये सारखे भांडण होत होते. त्यातून हा खून करण्यात आला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे घडली आहे. अर्जुन … Read more

पुण्यात तृतीयपंथी सारिकाचा दगडाने ठेचून खून : दरी पुलाजवळील घटना

पुणे- कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाच्या जंगलात एका तृतीयपंथीयाचा दगडाने डोक ठेचून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी उघडकीस आल्यावर भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली . मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सागर उर्फ सारिका उसगरे (वय 23) असे खून झालेल्या तृतीयपंथीयांचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस … Read more

कोंढव्यात खून; सुरक्षारक्षकावर अनैतिक संबंधाच्या संशयातून हल्ला

पुणे –अनैतिक संबंधाच्या संशयातून शाळेत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकावर हल्ला करीत टोळक्‍याने खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यात समोर आला आहे. दरम्यान, खून झालेल्या व्यक्तीसह त्याच्या जखमी साथीदाराला रिक्षातून रहदारीच्या ठिकाणी सोडून आरोपींनी पळ काढला. रवी कचरू नागदिवे (वय 50, रा. नेवसेमळा, देवाची उरूळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र बालाजी चव्हाण या घटनेत गंभीर … Read more

पुण्यात आईला जन्मठेप; जाणून घ्या प्रकरण

पुणे – तीन वर्षांच्या पोटच्या मुलालाच विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला. कौटुंबिक वादाच्या कारणातून त्या महिलेने मुलाला विषारी औषध पाजले. त्यानंतर आईनेदेखील औषध घेतले आणि गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा … Read more

अमरावती : संचारबंदीत मित्राने केली मित्राची हत्या, परिसरात खळबळ

अमरावती – अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान या संचारबंदीत जिल्ह्यातील परतवाडा शहरात खून झाल्याची घटना समोर आली आहे. दोन मित्रामधील झालेल्या वादातून मित्राकडूनच हा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निखिल मंडले असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. विक्की धाडसे असे आरोपीचे नाव … Read more

भाऊबीजेच्या दिवशीच एकुलत्या एक भावाची हत्या, मनमाड मधील घटना

मनमाड – मनमाड रेल्वे स्थानकात टोळक्याने मिळून एकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच एकुलत्या एक भावाची हत्या करण्यात आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी असताना हा खून करण्यात आला आहे. शिवम पवार असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून शिवम यास तीन … Read more

नाशिक हादरले, महिलेवर सपासप 25 वार करत हत्या

नाशिक – राज्यातील प्रमुख शहरातील गुन्हेगारी वाढत जात असल्याचे रोज घडणाऱ्या घटनेवरून दिसून येत आहे. गुन्हेगांरावर पोलिसांचा धाक न राहील्याची परिस्थिती सध्या आहे. अशीच एक घटना नाशिक शहरातून समोर आली आहे. येथील एका महिवेवर चाकूने 25 वेळा सपासप वार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूजा आंबेकर असे खून करण्यात आलेल्या महिलेचे … Read more

पुणे : टीव्ही मालिका पाहून वृद्धेचा खून

पुणे –टीव्हीवरील गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित मालिका पाहून त्यातील घटनेसारखा बनाव रचत दोन अल्पवयीन मुलांनी सिंहगड रस्त्यावरील ज्येष्ठ महिलेचा खून केल्याचे तपासात उघड झाले. या दोघांनी टी.व्ही. पाहत बसलेल्या वृद्धेला मागून धक्का देत पाडले. यानंतर तिचे तोंड, नाक दाबून तिचा खून केला आणि घरातील किमती ऐवज चोरला. घटनास्थळी बोटांचे ठसे उमटू नयेत, म्हणून दोघांनी हॅन्डग्लोव्हज वापरले … Read more

हिंगण्यात ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने चोरले

पुणे- हिंगणे खुर्द परिसरात 70 वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. त्यानंतर चोरट्यांनी घरातून पावणेदोन लाखांचे दागिने चोरले आहेत. शालिनी बबन सोनावणे असे या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी या एका सोसायटीत एकट्याच राहात होत्या. तर, मुलगा विराट हा शेजारील सोसायटीत राहतो. … Read more

खटला जलदगतीने न्यायालयात चालवा; बिबवेवाडी येथील मुलीच्या कुटुंबियांचे गृहमंत्री, पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे – बिबवेवाडी येथे एकतर्फी प्रेमातून खून केलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी हा खटला जलतगती (फास्टट्रॅक) न्यायालयामध्ये चालवावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे. याबाबत निवेदन दोघांनाही देण्यात आलेले आहे. तसेच, या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरणा आहे. कुटुंबियांनी आरोपीपासून जीविताला धोका आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली … Read more