“राज साहेबांना कुटनीतीने..” निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अमेय खोपकर यांनी केलेली पोस्ट चर्चेत

मुंबई -मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली … Read more

शिवसेना पक्ष धनुष्यबाण कोणाला मिळणार ? निवडणूक आयोगाच्या अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष.. आज होणार सुनावणी

मुंबई – शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाची निवडणूक आयोगासमोर सुरु झालेली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर दोन्हही पक्षांनी आपले म्हणणे मांडले होते यावर निवडणूक आयोगाने देखील सर्व पक्षकारांचे दावे प्रतिदावे ऐकून घेतले होते. गेल्या सुनावणीत दोन्हही पक्षाचे सविस्तर म्हणणे ऐकल्यानंतर आयोगाने दोन्हही पक्षांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात देण्यासाठी मुदत … Read more

उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपद संकटात,शिवसेना कोणाची ? निवडणूक आयोगासमोर आज होणार सुनावणी

मुंबई – महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष एका टोकाच्या वळणावर येऊन पोहचला आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय अशा दोन्हही ठिकाणी सुरु असलेला हा संघर्ष केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशासाठी लक्षवेधी ठरत आहे. न्यायालयातील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी आज निवडणूक आयोगासमोर शिवसेना कोणाची ? आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार याबाबतची सुनावणी होणार आहे. … Read more

लक्षवेधी : निवडणूक आयोग आणि पक्षांतर्गत निवडणुका

पक्षांतर्गत निवडणुका कोणताही पक्ष हिरीरीने घेताना दिसून येत नाही. म्हणूनच ही जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवली पाहिजे. सध्या देशात “निवडणूक आयुक्‍तांच्या नेमणुका’ हा मुद्दा चर्चेत आहे. याबद्दल अनेक अभ्यासक निरनिराळी मतं व्यक्‍त करीत आहेत. मात्र, या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला पाहिजे. सध्याच्या राज्यघटनेतील तरतुदींनुसार केंद्रीय निवडणूक आयोगावर लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या … Read more

‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत उज्वल निकम यांचं मोठं विधान म्हणाले,”मुंबई पालिकेच्या निवडणूका लवकर लागल्या तर निवडणूक आयोगाला…”

  मुंबई – गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष अनेक पेच प्रसंगांचा सामना करतोय.आधी पक्षात उभी फूट पडली त्याचा परिणाम म्हणून सरकार गेलं नंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षासह चिन्हावर दावा केला त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवलं. ज्या निवडणुकीची सर्वांना उत्सुकता होती त्या अंधेरी पोटनिवडणुकीत निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवार … Read more

“प्रबोधनकार ठाकरेंनी ठेवलेले ‘शिवसेना’ हे नाव जर संपवण्यात येत असेल तर..”; छगन भुजबळ यांची भाजपवर टीका

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे. निडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आपल्याला खूप दुःख झाले असल्याचे ते म्हणाले. तसेच चिन्ह गोठवलं असले तरी शिवसेनेची नवीन निशाणी जनतेपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, असा विश्वासदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. “चिन्हाचा निर्णय … Read more

सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा; गाण्याचा उल्लेख करत म्हणाल्या,”“हम बेवफा हरगिज न थे, पर हम वफा..”

पुणे : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून भाजपाला खोचक टोला लगावला आहे. हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा उल्लेख करत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना हे गाणं लागू होते, … Read more

“राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे पक्षातून बाहेर पडले पण त्यांनी शिवसेनेला…; शिवसेनेचा एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ गोष्टीवर आक्षेप

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे असे अनेक लोक आजपर्यंत शिवसेनेतून बाहेर पडले. पण शिवसेनेच्या मुळावर उठणं, … Read more

मोहित कंबोजचा उद्धव ठाकरेंना चिन्हांवरून खोचक सल्ला,’पेंग्विन अन् …’

मुंबई –  शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अशातच भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे. Choice Is Yours ! pic.twitter.com/bUE8L4cRNf — Mohit Kamboj Bharatiya … Read more

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुचवले नवीन नाव..म्हणाले, “शिवसेना …”

  मुंबई – उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वादावर निवडणूक आयोगाने काल निर्णय दिला. आगामी पोट निवडणुकीमध्ये शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीवेळेसचा दाखल देत शिवसेनेला नवीन नाव सुचवलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयनानंतर महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम … Read more