देशातील सर्व प्रादेशिक पक्षही संपतील… जे. पी नढ्ढा म्हणतात, भाजपशी लढण्याचे सामर्थ्य कोणत्याही पक्षात राहिलेले नाही

    पाटणा, दि. 1 -देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. कॉंग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील. देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी केला. बिहारमधील पाटणा येथून त्यांच्या हस्ते भाजपच्या जिल्हा पक्ष कार्यालयांचे उद्‌घाटन … Read more

पोलिसांच्या जिप्सीवर उलटला ट्रक; भीषण स्फोटात तीन पोलिस जागीच ठार

पाटणा – पाटण्यातील दानापूर परिसरात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या वाहनावर एक भरधाव ट्रकची धडक होऊन हा ट्रक उलटल्याने हा अपघात झाला आहे. धडक बसल्यानंतर भीषण स्फोट होऊन यामध्ये तीन पोलिसांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने पोलिस जिप्सीला … Read more

पाचव्या मुलाच्या इच्छेपोटी अंधश्रद्धेतून 8 वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या; आधी काढले डोळे नंतर…

पाटणा – अंधश्रद्धेतून बापानेच 8 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलीचे डोळे काढून त्यापासून ताईत बनविला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील पदम गावातील सफियाबाद पोलिस स्टेशनच्या हद्दित घडली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. दिलीप कुमार असे आरोपी वडीलाचे … Read more