आगाऊ रक्कम भरल्यास सामान्य करात सवलतीची शिफारस ! पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची स्थायीत मान्यता

पिंपरी – सन 2024-2025 या सरकारी वर्षाकरिता करांचे व करेत्तर बाबींचे दर निश्चित करणे तसेच मालमत्ता सर्वेक्षणात नवीन आकारणी होणार्‍या मालमत्तांचे प्रथम बिल दिलेनंतर संपूर्ण मालमत्ता कराची आगाऊ रक्कम भरणा करणा-या मालमत्ताधारकांना सामान्य करात सवलत देणेकामी महापालिका सभेकडे शिफारस करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य … Read more

पिंपरी चिंचवड : सौंदर्य स्पर्धेत वेदिका क्राउन किताबाची मानकरी

भोसरी – एन. जी. म्युझिकच्या वतीने सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत संस्कार गुरुकुल स्कूल, आळंदीची वेदिका फडतरे क्राउन किताबाची मानकरी ठरली आहे. मिस, मिसेस व लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येणारी पुणे बेस्ट ब्युटी क्वीन सीजन टू-2024, ग्रँड फॅशन शो या स्पर्धेत वेदिका फडतरे या विद्यार्थिनीने लहान गटात सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या … Read more

तळवडे येथे कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप शिबिर..

निगडी – महाराष्ट्र शासन महसूल विभाग जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभाग पुणे यांचे अप्पर तहसीलदार, पिंपरी चिंचवड यांचे कार्यक्षेत्रांतर्गत मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र निगर्मित करण्यात येत आहे. त्यासाठी तळवडे गावठाण मारुती मंदिर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तळवडे चिखली तलाठी, कोतवाल सुधीर रोकडे, महेश रोकडे, तळवडे … Read more

पिंपरी चिंचवड : पीएमपी प्रवाशांच्‍या संख्या लाखोत.. कॅशलेसचा वापर मात्र हजारात

पिंपरी – आजच्‍या डिजिटल युगात खूप कमी नागरिक रोखीने व्‍यवहार करतात. परंतु पीएमपीच्‍या बाबतीत मात्र चित्र पूर्णपणे उलट दिसून येत आहे. रोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत कॅशलेस पेमेंट व्‍यवस्‍थेला हरताळ फासला जात असल्‍याचे दिसून येत आहे. पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या रोज दहा ते बारा लाख इतकी आहे. परंतु संपूर्ण डिसेंबर महिन्‍यात … Read more

तळेगाव दाभाडेमध्‍ये इंद्रायणी नदीला जलपर्णीचा वेढा

तळेगाव दाभाडे – तळेगाव स्टेशन भागात पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणी नदीपात्र जलपर्णीने पूर्ण वेढले आहे. सांडपाण्‍यामुळे दिवसेंदिवस जलपर्णीमध्‍ये वाढ होत आहे. तळेगाव स्टेशन भागातील यशवंत नगर व परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रातून पिण्यासाठी पाणी घेतले जाते. या पिण्याच्या पाण्यावर तळेगाव दाभाडे नगर परिषदे कडून जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. परंतु ज्या ठिकाणी पाणी जॅकवेलच्या माध्यमातून उचलले जाते त्या … Read more

देहूगाव : रस्‍त्‍यावर झालेल्‍या अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..

देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू गावठाण परिसर, धर्मवीर संभाजी महाराज चौक, महाद्वार चौक, १४ टाळकरी कमान, मुख्य नगरपंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य प्रवेशद्वार, देहू–आळंदी रस्ता, परंडवाल चौकामध्ये पथारीधारक, लघु विक्रेत्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण करीत दुकाने थाटली आहे. त्‍यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. देहू नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्वच पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. … Read more

पिंपरी चिंचवड : पोलीस बंदोबस्‍तात दिले झाडांना पाणी

पिपरी – प्रशासकीय गुंतागुंतीत मृतप्राय झालेल्‍या झाडांना जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी रावेत येथील मेट्रो इको पार्कमध्ये पोलीस बंदोबस्‍तात झाडांना पाणी दिले. पार्कच्‍या बाहेरुन पाइपने सुमारे १० ते १२ टॅंकर पाणी सोडण्यात आले. शनिवारी व रविवारी अशी दोन दिवस ही मोहीम राबविण्यात आली. त्यात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. मेट्रो इको पार्कमधील झाडांची देखभाल व्हावी, हे … Read more

मूनलाइटिंगचा ठपका, करियरला धोका ! जाणवू लागले परिणाम.. नोकरी बदलणे झाले अवघड

पिंपरी – करोनाकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना भारतात नव्याने रुजू झाली. याच काळात मूनलाइटिंग अर्थात एकाच वेळी दोन कंपन्यासाठी काम करण्याचे प्रकार देखील समोर आले. बेकायदेशीर रित्या आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अनेक आयटीयन्सने मूनलाइटिंग सुरू केले. या प्रकारांनी कंपन्या खडबडून जाग्या झाल्या. त्यांनी आता थेट पीएफ अकाउंटला आधार धरत क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केले. पीएफ अकाउंटचे मागील … Read more

रामनगरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ! पिंपरी चिंचवड महापालिकेचे दुर्लक्ष.. नाला साफ करण्याची मागणी

निगडी – रामनगर येथील परशुराम चौकाजवळून सांडपाणी वाहून नेहण्यासाठी नाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या नाल्याची साफसफाई केलेली नाही. बर्‍याच वेळा नाला तुंबत आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून न गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील नाल्याची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून उघड्यावर … Read more

मावळमधील गुलाबाची परदेशवारी सुरू ! जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप, दुबईमध्‍ये होणार निर्यात

पवनानगर (नीलेश ठाकर) – जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सज्ज होताना दिसत आहे. पण तुम्हाला माहितेय का… या तरूणाईच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जात आहेत. याशिवाय मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, कोलकाता आदी … Read more