PUNE : ‘लेटलतिफ’ कर्मचाऱ्यांना बसणार जरब; महापालिकेत नवीन वेतन प्रणाली

पुणे – सरकारी नोकरीचा गैरफायदा घेत “आओ जाओ घर तुम्हारा..’ असा समज करत महापालिकेत दररोज उशिरा कामावर येणाऱ्या आणि कामाची वेळ संपण्याआधीच कार्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जरब बसणार आहे. महापालिकेसह शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनपत्रक आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन तयार होणार असून कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या आणि जाण्याच्या वेळा या प्रणालीत रिअल टाईम नोंदविल्या जाणार आहेत. … Read more

प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट धरणात; कारवाईचे निर्देश

पुणे – सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पवार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल … Read more

PUNE: शहरी बचतगटांसाठी ‘पुण्यश्री’ बाजार; महापालिका पाच परिमंडळांत करणार उभारणी

सुनील राऊत पुणे – शहरातील बचतगटांना वर्षभर हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेच्या वतीने आता शहरात सुपर मार्केटच्या धर्तीवर बचतगटांच्या उत्पादनासाठी “पुण्यश्री’ बाजार सुरू केले जाणार आहेत. सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या आधार केंद्राच्या जागेत सुमारे 3 हजार चौरस फूट जागेत हा बाजार सुरू केला जाणार असल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांनी सांगितले. हा … Read more

Prabhat Impact ! पुणे महापालिकेने रात्रीत सुधारली चूक… पादचारी मार्गातील दुभाजक काढला

पुणे : महापालिकेकडून जी 20 परिषदेसाठी सेनापती बापट रस्त्यावर रत्ना हॉस्पीटल समोर तयार केलेल्या “रेज्ड क्रॉसिंग’ मधील दुभाजकाचा अडथळा मंगळवारी रात्रीत दूर केला असून नागरिकांना आता हा पादचारी मार्ग सुरक्षितपणे वापरता येणार आहे. रत्याच्या दोन्ही बाजूने “रेज्ड क्रॉसिंग’ तयार केल्यानंतर सबंधित ठेकेदाराने दुभाजक तसेच ठेवले होते तर ज्या भागात दुभाजक काढले तिथं “रेज्ड क्रॉसिंग’ न … Read more

पाणी येणार नाही; पालिका कळवतच नाही ! राष्ट्रवादी अर्बन सेलची पुणे आयुक्‍तांकडे तक्रार

  सहकारनगर, दि. 6 (प्रतिनिधी) -आज पाणी येणार नाही.., याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची योग्य ती खबरदारी पुणे महापालिकेकडून घेतली जात नसल्यामुळे पुणेकरांची गैरसोय होत आहे. गेली दोन पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सोसावा लागत आहे. तर, पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. याबाबत राष्ट्रवादी अर्बन सेल तर्फे आयुक्‍तांकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी अर्बन … Read more

पुण्यात हनुमान चालीसाचे पठण करून मनसेकडून रावण दहन

  पुणे – दुष्कृत्यावर सत्कर्माची मात आणि वाईट प्रथांचा नाश करून चांगले गुण अंगी बाळगण्याचा संदेश देत विजयादशमीच्या मुहूर्तावर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नयनरम्य आतषबाजीत करण्यात आलेल्या रावण दहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक प्रशांत कनोजिया व माजी नगरसेविका पुष्पाताई कनोजिया यांच्यावतीने  कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी … Read more

राष्ट्रवादीचे चिन्ह ‘घड्याळ’ काढून ठेवतो ! पुण्यातील कात्रजच्या नमेश बाबर यांनी पक्ष सोडला; कात्रज विकास आघाडीची घोषणा

  कात्रज, दि. 6 (प्रतिनिधी) -महापालिकेत कात्रज परिसराचा समावेश होऊन 25 वर्षे लोटली तरीही मूलभूत सुविधा व विकास प्रकल्पांच्या निधींबाबत कात्रजला डावलले जात आहे. बीडीपी आरक्षण तीनपट कर, नव्याने समाविष्ट गावातील अन्यायकारक आरक्षणे यामुळे मोठा अन्याय या परिसरावर होत आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार, आमदार यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने मागील वर्षी दसऱ्यालाच माझे आवडते हातातले … Read more

राज्यात 25 लाख हेक्‍टरवर नैसर्गिक शेती ! राज्यस्तरीय परिषदेत उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची माहिती

  पुणे, दि. 6 – रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून, “ग्लोबल वॉर्मिंग’चा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सन 2025 पर्यंत राज्यातील 25 लाख हेक्‍टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 2016-17 मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर 9 लाख 50 हजार … Read more

अतिरिक्‍त ‘लेन’ला खडकाचा अडथळा ! पुण्यातील चांदणी चौक; सुरळीत वाहतुकीसाठी आणखी दहा दिवस

  पुणे, दि. 6 – चांदणी चौक येथील पूल पाडल्यानंतर तेथे अतिरिक्‍त लेन तयार करण्यासाठी खडक फोडण्याचे काम सुरू आहे. येथील कठीण खडक फोडण्यासाठी सुरुंग लावणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी वाहतूक काही वेळ बंद ठेवावी लागणार आहे. एका बाजूला वाहतुकीची कोंडी आणि दुसऱ्या बाजूला पाऊस यावर मात करत हे काम करावे लागत आहे. परिणामी, … Read more

पुण्यात कागदावरील बीआरटीच्या मार्गावर उधळपट्टीचा घाट

  पुणे, दि. 6 -कोट्यवधी रुपयांचा खर्च करून महापालिकेकडून हडपसर ते स्वारगेट मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, या सेवेसाठी काही भाग वगळता स्वतंत्र मार्गिका केवळ कागदोपत्रीच आहे. असे असताना मार्गिकेच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली 27 लाखांची उधळपट्टी करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. याबाबतची निविदा उद्या (शुक्रवारी) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आली … Read more