Pune : मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान

मांजरी – मांजरी बुद्रुक येथील स्व. अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजारात गेली काही दिवसांपासून समिती प्रशासनाने खोतीदारांना शेतमाल आणण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे खोतीदारांकडून घेतला जाणारा शेतकऱ्यांच्या माल शेतातच पडून लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. त्यासाठी बाजारसमितीने खोतीदारांना शेतमाल आणण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेकऱ्यांकडून होत आहे. मांजरी उपबाजार शेतकरी ते थेट ग्राहक असा वैशिष्ट्यपूर्ण आहे. … Read more

Pune : माळवाडी येथे रक्तदान व मोफत थायरॉईड तपासणी शिबीर..

हडपसर – हडपसर माळवाडी येथील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे . त्यानिमित्ताने रक्तदान शिबिर व मोफत थायरॉईड तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास दत्त जयंती निमित्त ब्लुटूथ इअर बर्ड मोफत देण्यात आले,तसेच रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र ही देण्यात आले.अशी माहिती धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक दत्तात्रय तुपे … Read more

Pune : पत्नीची शैक्षणिक पात्रता पतीपेक्षा जास्त ! पोटगीची मागणी फेटाळली

पुणे : पत्नी सध्या कमवत नाही. मात्र, तिची शैक्षणिक पात्रता पतीपेक्षा जास्त आहे. तिला आर्थिक सहाय्यतेची गरज नाही. शिक्षणाच्या जोरावर नोकरी करून ती उदरनिर्वाह करू शकते, असा निष्कर्ष काढत पत्नीने पोटगीसाठी केलेला अर्ज पुणे येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्रगती येरलेकर यांनी हा आदेश दिला आहे. माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे … Read more

पुणे महापालिकेला अखेर सहा महिन्यानी पुर्णवेळ प्रशासकीय अधिकारी मिळाले

पुणे, – शालेय शिक्षण विभागातील विविध कार्यालयातील आठ शिक्षणाधिकारी यांना अखेर अडथळ्यातुन मार्ग काढत शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यात पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांची पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आलेली आहे. तब्बल सहा महिन्यांनी महापालिकेला पुर्णवेळ प्रशासकीय अधिकारी मिळाले आहेत. … Read more

Pune : खून प्रकरणात एकाला जामीन..

पुणे : डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणात एकाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांनी जामीन मंजुर केला आहे. अजय मिडगुले असे त्याचे नाव आहे. त्याने अ‍ॅड. अभिषेक अवचट आणि अ‍ॅड. दीपक नागवडे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. ( pune crime ) शिरूर तालुक्यातील उबाळे वस्ती, टाकळी हाजी येथे १७ मार्च २०२२ रोजी ही घटना … Read more

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा ‘आरटीई’ थकीत निधी वाटप करा ! अन्यथा प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालणार

पुणे – मागील शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा थकीत ‘आरटीई’ चा निधी देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय द्यावा अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षापासुन ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्रातील शेकडो इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनांनी नागपूर विधानभवनावरील एक दिवसीय धरणे आंदोलनातुन दिला आहे. महाराष्ट्रातील हजारो गरीब व वंचित मुलांचे गुणवत्ता पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण … Read more

पहिल्या तारखेलाच दावा निकाली ! अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या महिलेला समुपदेशनामुळे जलद न्याय.. मिळणार 20 लाख

पुणे : समुपदेशन खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पीएमपीएलने धड्क दिल्यामुळे अपघातात दोन्ही पाय गमवावा लागलेल्या ३९ वर्षीय महिलेला समुपदेशनामुळे लवकर न्याय मिळाला आहे. पहिल्या तारखेलाच दावा निकाली निघाला आहे. २० लाख रुपये तिला मिळणार आहेत. समुपदेशक अ‍ॅड.अतुल गुंजाळ यांनी या दाव्यात यशस्वी समुपदेशन केले. अपघाताची घटना २१ ऑगस्ट २०२३ रोजी घडली. बाणेर येथे राहणाऱ्या … Read more

पुणे : झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे – झाडाखाली चहा पीत उभा असलेल्या तरुणाच्या डोक्यात फांदी पडून मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळी घडली. (pune news) अभिजित गुंड (३२, रा .कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. गुंड हा तरुण सायंकाळी चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आला होता. त्यावेळी वरून झाडाची फांदी कोसळली. ही फांदी … Read more

Pune Crime : कार्यक्रमाचा फ्लेक्‍स फाडल्याने कोयत्याने वार करत केला खून

पुणे – दमबाजी तसेच कार्यक्रमाचा फ्लेक्‍स फाडल्यामुळे गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तुषार राजु कुंदुर (21) आशुतोष संतोष वर्तले (20 दोघेही रा. गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिध्दार्थ नंदकुमार हादगे (29 , रा. गणेश पेठ)असे खून झालेल्याचे … Read more

Pune Crime : गवंड्याने वसुलीसाठी बाळगला गावठी कट्टा..

पुणे – उधार दिलेले पैसे वसूल करण्यासाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपी गवंडी काम करतो, त्याने एकाला काही रक्कम उधार दिली होती.हे पैसे समोरचा व्यक्ती देत नसल्याने त्याने ओळखीच्या एका व्यक्तीकडून गावठी कट्टा घेतला होता. या कट्टयाचा धाक दाखवून पैसे वसूल करण्याचा त्याचा इरादा होता. (Pune Crime) विजयकुमार तुळशीराम शिंदे … Read more