महाराष्ट्र पुन्हा हादरला; अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती- पुणे, मुंबई शहरातील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना अमरावती शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर तिने राहत्या घरात गळफा घेत आपले आयुष्य संपविले आहे. … Read more

Sakinaka Rape Case : ‘ही हार आहे आमची आणि याचंच मला दु:ख’; चित्रा वाघ यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई – मुंबईच्या साकीनाका परिसरात काल एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले होते. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भाजपाच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजावाडी रुग्णालयात … Read more

मुंबई : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई – मुंबईच्या साकीनाका परिसरात काल एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले होते. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा धक्‍कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री (9 ऑगस्ट) घडला. … Read more

बलात्काराचा बनाव; 50 लाखांची खंडणी

पुणे – एअरफोर्सच्या माजी अधिकाऱ्याला “हनी ट्रॅप”मध्ये अडकवत 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. त्याला मारहाण करून तीन लाखांचा धनादेश घेण्यात आला. याप्रकरणी चौघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. दत्तात्रय यादव (47), उत्तम तानाजी कुऱ्हाडे (40, दोघे रा. आळे, ता. जुन्नर), अनिल ज्योतिराम वाल्मीकी (45, रा. कात्रज), नारायण सोन्याबापू जाधव (38, रा. जुन्नर) अशी अटक आरोपींची नावे … Read more

उत्तर प्रदेशात “निर्भया’ची पुनरावृत्ती

बदायू (उत्तर प्रदेश) : दिल्लीतील बलात्कारानंतर पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विकृतीचा कळस गाठणारी आणि निर्भयाची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी या महिलेचे अक्षरश: लचके तोडले. पूजा करण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर पाशवी … Read more

धक्कादायक : पतीच्या जामिनाचा अहवाल द्यावा यासाठी पत्नीचा पोलीस ठाण्यासमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न

पुणे : बलात्कार, विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस जामीन व्हावा असा अहवाल पोलिसांनी द्यावा, अशी मागणी करीत आरोपीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात डिझेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. येरवडा पोलीस ठाणे परिसरात बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेस आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं आणि तिला नोटीस बजावली आहे. पोलीस शिपाई प्रमिला पवार यांनी … Read more

बलात्काराची क्लिप नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकत 2 लाखांची मागणी…

इस्लामपूर : बलात्काराची व्हिडीओ क्लिप संबंधित महिलेच्या मुलासह कुटूंबाला मोबाईलवर पाठवत 2 लाख रूपयांची मागणी करणाऱ्या तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवानसिंग राजपुत ठाकूर (वय २६ रा. बिदर, कर्नाटक) असे तरुणाचे नाव आहे. कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देत ठाकूर याने सतत 2 वर्षे महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. बलात्काराचा व्हिडीओ नातेवाईक … Read more

बलात्कार प्रकरणातील एकास गणेगावात मारहाण !

मांडवगण फराटा : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे एकास बलात्काराच्या खटल्यातून वाचवतो म्हणून पैसे न दिल्याने तिघांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी मनोज प्रभाकर निंबाळकर (वय. 24, रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रवींद्र चालशा भोसले, कोल्ह्या चालशा भोसले (दोघे रा. गणेगाव दुमाला), संभाजी पवार, (रा. तांदळी ता. शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल … Read more

मूकबधिर मुलीवर केलेल्या बलात्काराच्या आरोपातून मुकबधिर व्यक्तीची दहा वर्षांनी मुक्तता

पुणे : स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून मूकबधिर तरूणीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून तब्बल दहा वर्षानंतर मूकबधिर तरूणाची सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी निर्दोष मुक्तता केली. घटना घडल्यानंतर एक वर्षाहून अधिक विलंबाने फिर्याद दिल्याच्या मुद्यावर न्यायालयाने हा निकाल दिला. विशेष म्हणजे दोघेही मूकबधिर असल्याने न्यायालयाला कामकाज करणे अवघड होते. या पार्श्‍वभूमीवर मूकबधिराची भाषा समजत असलेल्या मध्यस्थाच्या माध्यमातून … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. दंडापैकी पाच हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सोमदत्त नंदू खरारे ऊर्फ डो भाई असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 16 वर्षीय … Read more