पुणे जिल्हा : बैलपोळा सणासाठी मातीचे बैल बाजारात दाखल

राजगुरूनगर – गणेशोत्सवाची लगबग संपल्यानंतर आता येत्या 14 ऑक्‍टोबरला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण बैलपोळा असल्याने बैलाच्या मूर्ती तयार करण्यात खेडमधील कुंभार बांधव सरसावले आहेत. बैलांची जागा यंत्रांनी घेतली असली तरी बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबात मनात घर करून आहे, म्हणूनच जिवंत बैल नसला तरी मातीचा बैल करून त्याची मनोभावे पूजा करीत हा सण साजरा होत असतो. बैलपोळा … Read more

हिंगोली : 700 वर्षांची परंपरा; पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी “या’ गावात जमतात हजारों बैलजोड्या, जाणून घ्या काय आहे आख्यायिका

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) –  कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी पोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव पार पडला. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुठेही गालबोट न लागता शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. बैलपोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या ठिकाणी शेतकरी आपले बैल जोड्याा घेऊन दर्शनासाठी जातात. … Read more

दुर्दैवी! बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू, गावात हळहळ

औरंगाबाद – बैल पोळ्यानिमित्त बैलांना धुण्यासाठी तलावावर गेलेल्या काका पुतण्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे घडली. पंढरीनाथ कचरू काळे (वय 33) आणि रितेश अजिनाथ काळे (18) असे मृत काका पुतण्याची नावे आहेत. पोळ्याच्या पूर्व संध्‍येला ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे काका … Read more

बैलपोळा! यंदा पोळ्यावरही महागाईची झुल, बाशिंगासह गोंड्यांच्या किंमती वाढल्या, खरेदीसाठी बाजारात गर्दी

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – बैलपोळ्याचा सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बैलांचा साज खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. साजाच्या विविध साहित्याला महागाईचा फटका बसला असून, किंमतींमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी यंदा पोळा सनावरही महागाईची झुल चढली असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसोबत मित्र, सखा म्हणून वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांचा पोळा हा … Read more

यंदाच्या श्रावणी बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट !

शेवगाव :  यंदा सर्वत्र पावसाने आबादानी झाली असल्याने येथे सध्या निसर्ग मस्तीत आहे. अशावेळी या परिसरातील श्रावणी पोळा मोठ्या धुमधडाक्यात झाला असता, मात्र करोना महामारीने  यावेळी  शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यंदाच्या  श्रावणी बैलपोळ्यावर करोनाचे सावट आहे. जमावबंदी व लॉकडाऊनमुळे सार्वजनिक पोळा भरणार नाही. करोना विषाणूजन्य साथीने  सर्वत्र थैमान घातल्याने  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वरचेवर  … Read more