हजारो प्रवासी वेगवेगळ्या विमानतळांवर राहिले ताटकळत ! ‘या’ कारणामुळे ब्रिटनची विमानसेवा विस्कळीत

नवी दिल्ली – तांत्रिक कारणामुळे आज ब्रिटनमधील विमानसेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. त्यामुळे हजारो प्रवाशांना वेगवेगळ्या विमानतळांवर ताटकळत राहिले होते. ब्रिटनमध्ये येणारी आणि ब्रिटनमधून अन्य देशांमध्ये जाणारी सर्व विमाने विमानतळांवरच थांबून राहिली होती. तातडीच्या कामांसाठी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा मनस्तापसहन करावा लागला. ब्रिटनच्या विमान वाहतुक व्यवस्थेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानतळावरून कोणत्याही विमानांना उड्डाण करण्याचे … Read more

UK in recession : ब्रिटन आर्थिक मंदीच्या गर्तेत; अर्थमंत्र्यांनी सादर केला आणीबाणीचा अर्थसंकल्प

लंडन :- एकेकाळी जगावर अधिराज्य गाजविणारा ब्रिटन देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. येत्या काही दिवसांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या मंदीचा मारा झेलण्यासाठी आणि मंदीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पावले उचलणार असल्याची घोषणा केली आहे. सुनक यांच्या सरकारने 5500 कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे. अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी … Read more

ब्रिटनमधील राजेशाहीला तरुणांचा विरोध

लंडन – ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा राजेशाही हवी का नको या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. याच निमित्ताने 2021 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातील निष्कर्ष समोर आले असून त्यामध्ये देशातील 41 टक्के तरुणांनी राजेशाहीला विरोध केला आहे. मात्र 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी ब्रिटनमधील राजेशाहीला मनापासून पाठिंबा दिला … Read more

एलिझाबेथ यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स झाले ब्रिटनचे नवे राजे; सगळी संपत्ती देशाला केली अर्पण

लंडन – ब्रिटनमध्ये राजघराण्याचे वंशज आणि दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स तिसरे यांना ब्रिटनचे राजे म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज झालेल्या राज्यरोहणाच्या समारंभामध्ये चार्ल्स यांनी आपल्या आईचे अर्थात एलिझाबेथ द्वितीय यांचे प्रेरणादायी उदाहरण अनुसरण्याची कटिबद्धता व्यक्त केली. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये झालेल्या या राज्यारोहणाच्या समारंभाचे टिव्हीवरून थेट प्रक्षेपण … Read more

मसूद अझहर जागतिक दहशतवादी घोषित होण्याबाबत ब्रिटन आशावादी

नवी दिल्ली – जैश ए मोहम्मदचा म्होरक्‍या मसूद अझहरला लवकरच संयुक्‍त राष्ट्राकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले जाईल, अशी आशा ब्रिटनने आज व्यक्‍त केली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी गटांविरोधात ठोस आणि अपरिवर्तनीय कारवाई केली जावी, अशी मागणीही ब्रिटनने केली आहे. ब्रिटनचे उच्चायुक्‍त सर डोमिनिट ऍस्किथ यांनी शुक्रवारी पत्रकारांबरोबरच्या वार्तालापाच्या कार्यक्रमामध्ये ही भूमिका स्पष्त केली. भारत आणि … Read more

नीरव मोदीच्या कोठडीत 24 मे पर्यंत वाढ

लंडन – ब्रिटन येथील न्यायालयाने भारतातील कर्ज बुडवणारा व्यापारी नीरव मोदी याच्या कोठडीत 24 मे पर्यंत वाढ केली आहे. गेल्या महिन्यापासून तो लंडन पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्या आधीच्या कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्याला व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे कोर्टापुढे उभे करण्यात आले त्यावेळी त्याच्या कोठडीत वाढ करण्याचा आदेश कोर्टाने दिला. त्याचा जामीन अर्ज कोर्टाने या आधीच फेटाळून … Read more

ब्रिटनकडून युरोपिय संघाच्या उल्लेखाशिवाय पासपोर्ट द्यायला सुरुवात

लंडन – ब्रिटन युरोपिय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत दिवसेंदिवस संदिग्धता वाढत आहे. अशातच ब्रिटनकडून नव्याने दिल्या जायला लागलेल्या पासपोर्टवर “युरोपिय संघा’चा उल्लेखच वगळण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यवहारीक तडजोड ठरावाशिवायच ब्रिटनने युरोपिय संघातून बाहेर पडण्याची तयारी केली असल्याचे स्पष्ट होते आहे. 30 मार्चपासून अशा स्वरुपाचे नवीन पासपोर्ट दिले जायला सुरुवात करण्यात आली आहे, असे ब्रिटनच्या … Read more

यूएईकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्माननाने होणार गौरव

नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘झाएद पदका’ने सन्मान करण्यात येणार आहे. अबूधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जायद यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल संयुक्त अरब अमिरातकडून घेण्यात आली आहे. मोदींना संयुक्त अरब अमिरातचा हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहे. याआधी महाराणी एलिजाबेथ, … Read more

“ब्रेक्‍झिट’मध्ये वातावरण बदलाला डावलल्याने ब्रिटिश संसदेत अर्धनग्न निदर्शने

लंडन – ब्रिटनच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सोमवारी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन जोरदाऱ् निदर्शने केली. “ब्रेक्‍झिट’दरम्यान वातावरण बदलाच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही निदर्शने करण्यात आली. अशाप्रकारे निदर्शने केल्याचा प्रकार ब्रिटिश संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. एक्‍सलंट रेबेलियन ग्रुपच्या 11 कार्यकर्त्यांनी संसदेच्या पब्लिक गॅलरीत 20 मिनिटे विरोध दर्शवला. गॅलरीच्या काचेच्या भिंतीजवळ हे लोक उभे होते. कार्यकर्ते … Read more

ब्रिटन कोणत्याही ठरावाशिवायच “ब्रेक्‍झिट’ स्वीकारेल – युरोपियन संघाची भीती

ब्रुसेल्स (बेल्जियम) – पुढील आठवड्यामध्ये ब्रिटन कोणत्याही ठरावाशिवायच युरोपिय संघामधून बाहेर पडेल, अशी भीती युरोपिय संघाचे मध्यस्थ मायकेल बारनेर यांनी व्यक्त केली अहे. कोणत्याही ठरावाशिवाय ब्रिटनच्या संसदेचे एका पाठोपाठ एक दिवस वाया चालले आहेत. त्या पर्श्‍वभुमीवर ब्रुसेल्समधील मुत्सदी आणि विचारवंतांसमोर बोलताना त्यांनी ही भीती व्यक्‍त केली. दोनच दिवसांपूर्वी ब्रिटनच्या संसदेमध्ये खासदारांनी पंतप्रधान थेरेसा मे यांनी … Read more