चांगल्या आरोग्यासाठी आपले रात्रीचे जेवण कसे असावे? तब्येत राहील नेहमी ठणठणीत, वाचा….

dinner benefits : प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक … Read more

आवळ्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचेपासून ते केसांपर्यंत शरीराला मिळतील भरपूर लाभ

भारतीय आयुर्वेदशास्त्र आणि युनानी प्रणालीच्या प्रसिध्द औषधांमध्ये आवळयाचा वापर प्रामुख्याने केलेला दिसतो. आवळा हे रसायन द्रव्य म्हणून ओळखले जाते. आवळा हा मानवी शरीरावर अमृतासमान कार्य करतो. च्यवनप्राशसारख्या रसायन औषधीमध्ये आवळा हे प्रमुख औषधी द्रव्य आहे. ब्राह्मी रसायन, धात्री रसायन, त्रिफळाचुर्ण व आमलकी रसायन अशा औषधांमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आवळयामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह … Read more

सौंदर्य प्रदान करणारे वर्तुळासन

हे बैठकस्थितीतील आसन आहे. तोलात्मक आसन असल्यामुळे हे करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर पाठीवर किंवा तोंडावर पडण्याची शक्‍यता असते. बैठकस्थितीप्रमाणेच शयनस्थितीतसुद्धा हे आसन करता येते. प्रथम बैठकस्थिती घ्यावी. दोन्ही पायात अंतर घ्यावे. श्‍वास सोडत हाताने पायाचे अंगठे पकडावेत. श्‍वास घेत दोन्ही पाय उचलून सीटवर आसन स्थिर करावे. आसन सोडताना उलट क्रमाने बैठक स्थितीत … Read more

हृदय मजबूत करणारे हृदयस्तंभासन

हृदयस्तंभासन हे शयनस्थितीतील आसन आहे. या आसनाचा संबंध सरळ हृदयाशी येतो त्यामुळे त्याला हृदयस्तंभासन म्हणतात. हे आसन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे. प्रथम मऊ चादरीवर शयनस्थिती घ्यावी. दोन्ही हात लांब करून हात आणि डोके उचलावे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन दोन्ही पायही उचलावे. साधारण जमिनीपासून एक फुटापर्यंत डोके, हातपाय उचलण्याचा प्रयत्न करावा. आसनस्थितीत संथ श्‍वसन करावे. आसनावस्थेमध्ये दृष्टी … Read more

फिटनेस : कामास प्रेरणा देणारे नटराजासन

हे करायला सोपे असे दंड स्थितीतील आसन आहे. या आसनामध्ये महादेवाच्या तांडवनृत्याचा आकार येतो अथवा नटराजाच्या मूर्तीच्या आकृतीबंधासारखा हे आसन आविष्कार करते म्हणूनच याला “नटराजासन’ म्हणतात. हे आसन करणाऱ्या प्रत्येकाला सुचित करत असते की “काम करा, पुढे चला.’ प्रथम दंड स्थितीत उभे राहावे दोन्ही हात शरीराजवळ ठेवावे, नजर समोर असावी, पहिल्यांदा डावा पाय गुडघ्यात दुमडून … Read more

दम्याच्या विकारावर पतंगासन

दंडस्थितीतील आसन आहे. या आसनामुळे दम्याच्या विकारात बरे वाटण्यास सुरुवात होते. दोन्ही पायात अंतर घ्यावे. डावे पाऊल वळवावे. त्या बाजूला मान वळवताना दोन्ही हात जमिनीला समांतर ठेवावे. श्‍वास घेत मागचा पाय थोडासा वर घेत नजर एका बिंदूकडे स्थिर करत आसनस्थिती घ्यावी. पुढील पाय काटकोनात वळवून पावलावरती भार दिला जातो. श्‍वास घेत घेत फुलपाखरासारखे दोन्ही हात … Read more

फिटनेस : जीवन जगण्याची कला

भगवद्‌गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी योगाची एक उत्तम परिभाषा दिली आहे. “समत्वं योग उच्चते’ म्हणजेच परस्पर विरुद्ध घटकांना सारखेपणाने सांभाळणे म्हणजेच योग होय. याचा अर्थ माणसाने सुख-दुःख, यश-अपयश, भय-शोक अशा परस्परविरुद्ध भावनांना सारखेपणाने (समान) हाताळण्याची कला अवगत करण्यासाठी योग अभ्यास जरुरीचे आहे. योग हे एक अति प्राचीन शास्त्र आहे. योग ह्या शब्दाचा अर्थ आहे … Read more

फिटनेस : आत्मविश्वासाठी वृक्षासन

हे दंडस्थितीतील आसन आहे. त्याचप्रमाणे आपण शयन आणि विपरित शयनस्थितीतही वृक्षासन करू शकतो. वृक्ष म्हणजे झाड. या आसनाची झाडाप्रमाणे कल्पना केलेली आहे. हे दंड स्थितीमधील, म्हणजेच उभ्याने करण्याचे तोलात्मक आसन आहे. प्रथम दोन्ही पायांत थोडेसे अंतर घेऊन उभे राहावे. हाताच्या आधाराने डावा पाय गुडघ्यात वाकवून हळूहळू वर घ्यावा पायाचा तळवा उजव्या मांडीच्या आतल्या बाजूला टेकवावा. … Read more

आरोग्य वार्ता : उंची वाढविण्यासाठी महावीरासन

हे दंडस्थितीतील एक आसन आहे. या आसनात शरीराची अवस्था वीर हनुमानाप्रमाणे होते म्हणूनच याला महावीरासन म्हटले आहे. हे करायला अतिशय सोपे आहे. प्रथम दंड स्थितीत उभे राहावे, भरपूर श्‍वास घ्यावा श्‍वास रोखून डावा किंवा उजवा पाय जेवढा जास्ती जास्त लांब टाकता येईल तेवढा टाकावा. दोन्ही हातांच्या मुठी बंद कराव्या आणि हात कोपरामध्ये दुमडून वर हवेत … Read more

आरोग्य वार्ता : शारीरिक उत्साह वाढवते ‘कुक्‍कुटासन’

कुक्‍कुट म्हणजे कोंबडा. कुक्‍कुट हा शब्द संस्कृत आहे. या आसनामध्ये शरीराची अवस्था ही कोंबड्यासारखी होते म्हणूनच याला कुक्‍कुटासन म्हणतात. दोन्ही हाताच्या आधाराने संपूर्ण शरीर उचलले जाते. प्रथम पद्मासनात बसावे. हाताची ध्यान मुद्रा ठेवावी. ध्यान मुद्रा सोडून हात कंबरेजवळ टेकवावे. डावा हात डाव्या पायाच्या मांडीतून जमिनीकडे न्यावा. उजवा हात उजव्या पायाच्या मांडी आणि पोटरीतून कोपरापर्यंत बाहेर … Read more