मतदानाच्या आदल्या दिवशी आपचा उमेदवार सपमध्ये

मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (आप) एका उमेदवाराने बुधवारी अचानकपणे समाजवादी पक्षात (सप) प्रवेश केला. विशेष म्हणजे, मतदानाच्या आदल्या दिवशी ती घडामोड घडली. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी 58 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. त्या मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या चरथावलमध्ये आपने यावर रोशन यांना उमेदवारी … Read more

मोफत विजेचे समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्‍वासन

लखनौ -समाजवादी पक्षानेही आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. अटुट वचनपत्र नावाने जारी करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशवासीयांना 300 युनिट मोफत विजेचे आश्‍वासन देण्यात आले असून शेतकऱ्यांनाही कृषी पंपांसाठी मोफत विजेचे आश्‍वासन देण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले आमचे सरकार सत्तेवर आल्यावर पंधरा दिवसांच्या आत दिली जातील, असेही या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले … Read more

सपाच्या 24 उमेदवारांची घोषणा

लखनौ –आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने 24 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत गोरखपूर शहराच्या उमेदवाराचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गोरखपूर शहर मतदारसंघातून सभावती शुक्‍ला यांना तिकीट देण्यात आले आहे. दुसरीकडे, अखिलेश यादव मुबारकपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावतील. याशिवाय बैजनाथ पासवान यांना … Read more

Income Tax Raid: 800 कोटींचा घोटाळ्यासह करचोरी उघड; सपा नेते व सहकाऱ्यांवर मोठी कारवाई

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते आणि त्यांच्या साथीदारांवर आयकरच्या छाप्यांमध्ये मोठा खुलासा झाला आहे. आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये 800 कोटी रुपयांचे घोटाळे आणि करचोरी उघडकीस आली आहे. या छाप्या दरम्यान समाजवादी पक्षाचा एक मोठा नेता आणि त्याच्या कुटुंबीयांच्या परदेशी तिकिटांशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. अशा काही खात्यांबाबतही माहिती मिळाली आहे, जी हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय … Read more

समाजवादी पक्षाचा दिल्लीत बसप आणि आपला पाठिंबा

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाने (सप) दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष (बसप) आणि आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला. दिल्लीत सपने स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवलेले नाहीत. त्यामुळे त्या पक्षाने दिल्लीतील सातपैकी पाच जागा लढवणाऱ्या बसपला पाठिंबा दिला. उर्वरित दोन जागांवर सपने आपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ केला. उत्तरप्रदेशात सप आणि बसपने रालोदला बरोबर घेऊन … Read more

नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट – आझम खान

रामपूर (उत्तर प्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट असल्याचे वक्तव्य आझम खान यांनी केले आहे. रामपूर येथील प्रचार सभेत बोलताना आझम खान यांनी ही टीका केली असून, इम्रान खान यांनी म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी … Read more

‘त्या’ वक्तव्यावरून मायावती अडचणीत

निवडणूक आयोगाने मागितला अहवाल  साहारनपूर – साहरणपूर येथील देवबंद येथे आज समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि रालोदच्या जाहीर सभेत मायावती यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. तसेच काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना मायावती यांनी, उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाला टक्कर देऊ शकत नाही, कारण उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस कमजोर झाल्याचे त्या म्हणाल्या होत्या. या प्रचार सभेत मायावती यांनी थेट मुस्लिमांना … Read more

उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष भाजपला टक्कर देऊ शकत नाही – मायावती

साहारनपूर (उत्तर प्रदेश) – बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. देवबंद साहारनपूर येथील सभेत काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना मायावती यांनी, उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाला टक्कर देऊ शकत नाही, कारण उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस कमजोर झाल्याचे त्या म्हणाल्या. मुस्लिम समुदायाला चेतावणी देत मायावतींनी, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांचे गठबंधनच भारतीय जनता पक्षाला … Read more

भाजपचा जाहीरनामा निवडणुकीनंतर येणार का?-अखिलेश

लखनौ – भाजपच्या जाहीरनाम्याला विलंब झाल्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्या पक्षाची खिल्ली उडवली आहे. भाजपचा जाहीरनामा निवडणुकीनंतर येणार का, असा सवाल त्यांनी केला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा मोठ्या चर्चेचाही विषय बनला आहे. मात्र, भाजपने अजून जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यापार्श्‍वभूमीवर, अखिलेश यांनी ट्‌विटरवरून भाजपला लक्ष्य केले … Read more