चतुर्थ वार्षिक पाहणीला पुन्हा मुदतवाढ

संदीप राक्षे सातारा – पालिकेच्या चतुर्थ वार्षिक पाहणीचा वनवास संपता संपेना. 2020 चा ऑगस्ट महिना उजाडण्याची वेळ आली तरी साताऱ्यातील नव्या मिळकतींची गणना व त्याची करआकारणीचा कार्यक्रम पुन्हा मुदतवाढीच्या यादीत गेला आहे. वसुली विभागाने तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर चर्चेसाठी ठेवला आहे. यासंदर्भात चतुर्थ वार्षिक पाहणीसंदर्भात वसुली विभागाची तातडीची बैठक घेतली जाणार आहे, असे मुख्याधिकारी अभिजित … Read more

जिल्ह्यात नवे 286 जण करोनाबाधित

सातारा – जिल्ह्यात करोनाची दहशत वाढत असून मंगळवारी रात्रीच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत एकाच दिवसातील उच्चांकी 261 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर बुधवारी दिवसभरात आणखी 304 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर जिल्ह्यातील पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या 6504 झाली आहे. तर करोनामुळे एकूण 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांचा मृत्यू … Read more

सार्वजनिक मंडळांसाठी “श्रीं’ची मूर्ती चार फुटांचीच

सातारा  -करोना संक्रमणाच्या पार्श्‍वूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गणेशोत्सव नियमावली बुधवारी जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळाची “श्रीं’ची मूर्ती चार फूट व घरगुती गणपती मूर्ती किमान दोन फूट असावी, असे बंधन घालण्यात आले आहे . पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव अवघ्या नऊ दिवसावर येऊन ठेपला आहे. स्वागत व विसर्जन मिरवणुका टाळून अत्यंत साधेपणाने यंदाचा … Read more

जिल्ह्यात 87 जण करोनामुक्त

सातारा  -जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 रुग्ण तसेच सातारा शहरातील खासगी रुग्णालयांतून 25 जण अशा एकूण 87 जणांना दहा दिवसांनतर बुधवारी घरी सोडण्यात आले. तर 624 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज … Read more

ग्रामीण भागात पुन्हा वाढू लागलीय रुग्णसंख्या

कातरखटाव – खटाव तालुक्‍याच्या ग्रामीण भागात करोनाने पुन्हा डोके वर काढले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्‍यात आतापर्यंत 19 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्‍यात आजमितीस 49 हजार 730 नागरिक बाहेरून आल्याची नोंद झाली आहे. तालुक्‍यात बाधितांची एकूण संख्या 271, घरी सोडलेले 143 नागरिक आहेत. कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेरून … Read more

पाटण तालुक्‍यात 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

पाटण -पाटण तालुक्‍यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुक्‍यात एकूण करोना बाधितांची संख्या 409 वर पोहोचली आहे.मंगळवारी आलेल्या बाधितांच्या अहवाल मुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. पाटण तालुक्‍यात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. उपचार घेत असणाऱ्या ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 141 वर … Read more

कराडच्या कोविड स्मशानभूमीवर वाढतोय ताण

कराड  – गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात मृत पावणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. जिल्ह्यातील अनेक बाधित मृतांवर कराड येथील कोविड स्मशानभूमीत दहनविधी केला जात असल्याने स्मशानभूमीत ताण वाढत चालला आहे. मृतांवर तातडीने अंत्यसंस्कार होत नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांवरही ताण वाढत चालला आहे. याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन पर्यायी स्मशानभूमीची व्यवस्था करावी. अन्यथा … Read more

शहरातील मिठाई विक्रेत्यांच्या 25 लाखांच्या गोडव्यावर पाणी

सातारा – स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि सोबत साजुक तुपातील जिलेबीचा गोडवा हा योग यंदाच्या पंधरा ऑगस्टला जुळून येणार नाही. करोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिलेबी उत्पादन, विक्री व वाटप करण्यास मनाई केल्याने मिठाई विक्रेत्यांना सुमारे 25 पंचवीस लाख रूपयांच्या उत्पन्नांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. या नियमात जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिलता द्यावी, या … Read more

वीर धरण भरले

लोणंद – सातारा व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरण भरण्याच्या मार्गावर आहे. धरणात 98.48 टक्‍के पाणीसाठा झाल्याने बुधवारी दुपारी चार वाजता धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने उचलून आणि विद्युत गृहातून चार हजार 600 क्‍युसेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती धरण अभियंता विजय नलवडे … Read more

सातारा पालिकेत घरपट्टी माफीचा ठराव मंजुरीच्या प्रतीक्षेत

संदीप राक्षे सातारा -खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आवाहनानुसार सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेत घरपट्टी माफ करण्याबाबतचा ठराव आहे. तो मंजूर होण्याची प्रतीक्षा आहे. सभेमध्ये तो मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वीच पालिकेच्या नियमांप्रमाणे वसुली प्रक्रिया सुरू करून पालिकेने महसूल संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. राज्य शासनाने घरपट्टी माफ केल्यास पुढील … Read more