पुणे जिल्हा : जुन्नरला पाडळी रस्त्यासाठी 1 कोटींचा निधी मंजूर

सहा महिन्यांत काम पूर्ण होणार – शरद सोनवणे जुन्नर – जुन्नर-मुंबई मार्गाला जोडल्या जाणाऱ्या शहरातील पाडळी परिसरातील मार्गासाठी नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून येत्या सहा महिन्यांत हा 0.7 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण होणार असल्याची माहिती माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिली. जुन्नर येथे या मार्गाच्या भूमिपूजनप्रसंगी माजी आमदार सोनवणे बोलत होते. … Read more

ज्योतिषाकडून मुहूर्त काढून दरोडा टाकला, १ कोटींचं घबाड हाती लागलं; पण नशिबाने साथ….

जळोची – लग्न, गृहप्रवेश, वाहनखरेदी आदी शुभकार्यासाठी मुहूर्त काढले जातात. हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र चोरट्यांनी चक्क ज्योतिषाकडून जबरी चोरीचा मुहूर्त काढला. चोरीही यशस्वी झाली. मात्र मुहूर्त काढूनही चोरटे अडकले पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकाते नगर येथील महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत तब्बल एक कोटी सात लाख रुपयांचा दरोडा … Read more

Maharashtra : ज्येष्ठ नागरिकांचा मोफत ‘एसटी प्रवासा’ला प्रचंड प्रतिसाद,अवघ्या 52 दिवसांमध्ये….

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या 52 दिवसांमध्ये 1 कोटी 4 लाख 86 हजार ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने 1 कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या … Read more

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : साधारण वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने पाहता पाहता भारतालाही विळखा घातला आहे. जगात अमेरिकेनंतर भारतात रुग्णसंख्या सर्वाधिक आहेत. दरम्यान, आता या रुग्णसंख्येने तब्बल 1 कोटींचा आकडा ओलांडला आहे. याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेने दिला आहे. मागील 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 25,153 नवे रुग्ण आढळून आले. नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्यांचा आकडा देशात काही अंशी … Read more

चाकण जनावरांच्या बाजारात 1 कोटीची उलाढाल

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल सव्वादोन महिन्यांपासून बंद असलेला चाकण येथील जनावरांचा बाजार शनिवारी (दि. 30) सुरू झाला आहे. त्यामुळे येथील जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. दिवसभरात एकूण उलाढाल 1 कोटी रुपये झाली. चाकण येथील जनावरांचा बाजार सुरू झाल्याने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकरिता ही समाधानकारक बाब आहे. चाकण येथील महात्मा फुले मार्केटच्या आवारात महिन्यातील प्रत्येक शनिवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो. विविध भागातून शेतकरी जनावरे घेऊन व काही जण जनावरे खरेदी करण्याकरिता आले होते. शेतकरी व व्यापारी यांच्या मागणीनुसार, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी पणन विभागाकडे पशुधनाची खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार चाकण येथे जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला. जनावरांचा बाजार भरत असलेल्या ठिकाणी गर्दी टाळून आणि फिजिकल डिस्टन्स ठेवून हा बाजार भरविण्यात आला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण व राजगुरूनगर उपबाजार आवारात काही दिवसांचा अपवाद वगळता लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, तरकारी व बंद असलेले कांदा व बटाटा हे व्यापार सुरू ठेवण्यात आले होते. करोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समिती अलर्ट झाली आहे. मार्केटयार्डमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हातावर सॅनिटायझर टाकले जात आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच ज्यांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधला आहे त्यांनाच मार्केट यार्डमध्ये प्रवेश देण्यात आला. तापमापक यंत्राच्या माध्यामातून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

अभिनेता रणदीप हुड्डा आणि जय पटेलने करोनाविरूध्द लढण्यासाठी केली ‘इतक्या’ कोटीची मदत

नवी दिल्ली – नवी दिल्ली – देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरूण धवन, सनी देओल यांनी करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता रणदीप हूड्डा आणि त्याचा काॅर्पोरेट सहकारी जय पटेल यांनी सुध्दा … Read more