इयत्ता अकरावी प्रवेश: ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदवले पसंतीक्रम

पुणे – पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीत “कॅप’अंतर्गत पाच दिवसांत ४२ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत. पहिल्या नियमित प्रवेश फेरीला ५ जूनपासून सुरुवात झाली आहे. इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ८३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामधील ७६ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग -१ भरून ते … Read more

इयत्ता अकरावी प्रवेशाची लगबग अन्‌ धावपळ

पुणे – पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील ३३६ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अॉनलाइन नोंदणीद्वारे १ लाख १० हजार ७३ एवढ्या प्रवेशाचा जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग अन्‌ धावपळ सुरू आहे. राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल लवकर लावला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाची अकरावी प्रवेशासाठी पुरेशी तयारी … Read more

Pune : अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे – पुणे व पिंपरी महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीची इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी महाविद्यालयांना निर्देशही दिले आहेत. राज्य मंडळाच्या वतीने पुढील आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या आधीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी http:11admission.org.in हे … Read more

11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची झडती

तपासणीसाठी विशेष भरारी पथके नियुक्त ः महिनाअखेर येणार अहवाल पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष भरारी पथकामार्फत तपासणी करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तपासणीसाठी पाच पथके सज्जही झाली आहेत. डिसेंबरअखेर या पथकाकडून तपासणी अहवाल सादर होणार आहे. यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली … Read more

अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीतील इयत्ता अकरावीसाठी सुरू असलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीकरिता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 20 ऑगस्टपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील प्रवेश फेरी सुरू करण्यात आली आहे. 24 ऑगस्ट रोजी दहिहंडी उत्सवानिमित्त मुंबईसह काही ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस … Read more

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज

पुणे – अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी 63 हजार 566 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत आहे. आता विद्यार्थ्यांचे पहिल्या गुणवत्ता यादीकडे लक्ष लागले आहे. अकरावी प्रवेशासाठी भाग-1 आणि भाग-2 असे अर्ज करणे आवश्‍यक होते. त्यानुसार महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या 55 हजार 716 … Read more

पुणे – विद्यार्थ्यांना मिळणार माहिती पुस्तिका

अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू : 1 लाख पुस्तिका वाटपासाठी तयार पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांकरिता अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना 25 मे नंतर माध्यमिक शाळांमधून माहिती पुस्तिका उपलब्ध होणार आहेत. यंदा 1 लाख पुस्तिका वाटपासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेशासंदर्भात अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून याचेही … Read more

पुणे – विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन वर्ग

पुणे – इयत्ता अकरावीच्या सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी येत्या 22 व 23 मे रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक विभागाच्या वतीने मार्गदर्शन वर्ग घेण्यात येण्यात येणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी … Read more

पुणे – अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया; दि.21 मे रोजी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

पुणे – इयत्ता अकरावीच्या सन 2019-20 या वर्षाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत येत्या दि.21 मे रोजी अधिकाऱ्यांना विभागनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची नियमावली, मुख्याध्यापक व झोन समितीची जबाबदारी, प्रवेश अर्ज भाग-1 व भाग-2 चे ऍप्रूव्हल कसे करणे याचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांना देणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रशिक्षणाचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. यात पुणे व … Read more

पुणे – आता मिशन; अकरावी अॅडमिशन

पुणे – शहरातील अकरावी प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची संकेतस्थळावर नोंदणी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी नोंदणीसाठी संकेतस्थळावर माहिती भरून, ती दि. 10 मे पर्यंत एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे संपूर्ण फाइल सादर करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिल्या आहेत. अकरावी ऑनालाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावरील आपल्या महाविद्यालयाची माहिती … Read more