Lok Sabha Election 2024 : राहुल यांना १४ दिवसांत १ जागा सोडणे अनिवार्य; कोणती जागा सोडणार, वाचा….

Rahul Gandhi | Lok Sabha Election 2024 – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी लोकसभेच्या २ जागांवरून विजय मिळवला. मात्र, राज्यघटना आणि कायद्यातील तरतुदींतर्गत त्यांना निकाल जाहीर झाल्यापासून १४ दिवसांत १ जागा सोडणे अनिवार्य आहे. केरळमधील वायनाड आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली या मतदारसंघांमधून राहुल यांनी निवडणूक लढवली. त्या दोन्ही जागी ते विजयी झाले. आता ते कुठली … Read more

कर्नाटकातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्यांना रात्री उशिरा अटक  करण्यात आली त्यानंतर न्यायालयात हजज केल्यानंतर महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर दोन अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषणाचा आरोप लावला आला आहे. शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री … Read more

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; २९ एप्रिलला होणार जामीन अर्जावर सुनावणी

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज वांद्रे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली होती. त्यांच्या विरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात … Read more

पुणे : पाऊणे सात वर्षे वेगळे राहणाऱ्या दांपत्याचा 14 दिवसात घटस्फोट

पुणे: वैचारिक मतभेदामुळे पटत नसलेल्या दांपत्याने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाने अवघ्या 14 दिवसात मंजुर केला. दोघेही तब्बल पाऊणे सात वर्षांपासून वेगळे राहत आहेत. ते एकत्र येण्याची शक्‍यता नाही. देवाण-घेवाण वरून दोघात वाद नाहीत. विशेष म्हणजे त्या मुलीचे लग्न ठरले आहे. तिच्या आणि त्याच्याही भविष्याचा विचार करून सहा महिन्याचा कुलिंग पिरीयड वगळण्याची … Read more

Pune | मुस्लिम दांपत्याचा 14 दिवसात घटस्फोट मंजूर

पुणे(प्रतिनिधी) – घरच्यांच्या विरोधाला जुमानून केलेल्या प्रेमविवाहनंतर मुस्लीम दांपत्याने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एम.आर. काळे यांनी 14 दिवसात मंजुर केला आहे. दोघेही 1 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. दोघांना परत एकत्र राहणे शक्‍य नाही. त्यांच्यामध्ये देणे-घेणे म्हणजेच स्त्रीधन व इतर अपत्याच्या ताब्याबाबत वाद नाहीत. कायद्याप्रमाणे घटस्फोट मिळण्याकरीता सहा महिन्याचे कूलिंग पिरेडची … Read more

काटेवाडी 14 दिवस कडकडीत बंद

भवानीनगर (वार्ताहर) – काटेवाडी (ता. बारामती) येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे काटेवाडी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावातील मेडिकल व किराणा दुकान वगळून सर्व व्यवहार 14 दिवस बंद राहतील. सर्व किराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत चालू राहतील. शनिवारी (दि. 4) बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, … Read more

मध्य वस्तीत करोनाबाधित सापडल्याने म्हसवड 14 दिवस बंद

नागरिकांचा एकमुखी निर्णय शहरातील एका व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह म्हसवड (प्रतिनिधी) – म्हसवड शहरात मध्य वस्तीत 58 वर्षांच्या व्यापाऱ्याला नुकतीच करोनाची बाधा झाल्याने त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या 15 नातेवाइकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या व्यापाऱ्याची शहरातील तिन्ही दुकाने बंद करण्यात आली असून म्हसवड शहर 14 दिवस बंद करण्याचा निर्णय प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत … Read more

आंबेगावातील पेठ गाव 14 दिवस पूर्णपणे “लॉक’

पेठ (वार्ताहर) – येथे 2 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शनिवार (दि. 30) ते दि. 12 जूनपर्यंत पेठ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावातील सर्व बाजूच्या सीमाबंद करून मेडिकल व दवाखाने वगळता बॅंका, पतसंस्था, बाजारपेठ व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पेठ गाव हे आंबेगाव तालुक्याचे पुणे बाजूने प्रवेशद्वार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेठ गाव पुढील 14 दिवस कडक बंद पाळणार आहे. येथील दाम्पत्य करोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या घरातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.  गावातील लोकांना गॅस सिलिंडर गरजेप्रमाणे घरपोच दिले जाणार आहेत. ज्या कुटुंबात करोना पॉझिटिव्ह आहेत, त्या कुटुंबातील इतरांना ग्रामपंचायत घरपोच गरजेच्या वस्तू, भाजीपाला, गॅस पुरवणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस कैलास कड यांनी सांगितले. गावात घरोघरी आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी कुटुंब सर्वेक्षण काम सुरू केले आहे. गावातील सर्वबाजूच्या रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यात आले असून प्रशासन विशेष दक्षता घेत आहे.