सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची अनपेक्षित भेट

सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आले उधाण सोलापूर – सोलापूर लोकसभेचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची शनिवारी सकाळी बालाजी सरोवर येथे अनपेक्षित व योगायोगाने भेट झाली. प्रकाश आंबेडकर हे आपले सहकारी बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे व बाळासाहेब वाघमारे या दोन कार्यकर्त्यांसह नाश्‍ता करत असताना सुशीलकुमार शिंदे याच वेळी … Read more

जातीवर नाही तर विकासावर बोला – धनंजय मुंडे

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आगामी लोकसभेनंतर देशात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असल्याचे सांगत, धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारने वर्षाला ६००० रुपये देण्याची केलेली घोषणा ही फसवी असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस … Read more

मोदी हे फकीर, यांना घर म्हणजे काय हे कळणार नाही – शरद पवार

पंढरपूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधे जोरदार आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत शरद पवार यांच्यावर सतत हल्ला चढवला होता. त्यानंतर शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देत, … Read more

निवडणूक २०१९ ; काहींनी टाकला बहिष्कार तर, काहींनी केले आवर्जून मतदान

नवी दिल्ली – १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान  संपन्न झाले. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश होता. महाराष्ट्रातील संध्याकाळी  ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी – वर्धा -55.66 %, रामटेक –  51.72 %, नागपूर –  53.13 %, भंडारा-गोंदिया –  60.50 %, गडचिरोली-चिमूर – 61.33 %, … Read more

मतदान करून परतत असताना अपघात ; ३ ठार

गडचिरोली –  मतदान करून परतत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेमध्ये  ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शंकरपूर या गावात ही घटना घडली असून मतदान करून परत येताना हा अपघात झालेला आहे. Maharashtra: Three people dead, 9 injured as a tractor overturned near Shankarpur village in Gadchiroli, today. The victims were returning to … Read more

“मै भी चौकीदार” वरून नवज्योत सिंग सिध्दू यांची भाजप वर टीका

रायपूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घमासान आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग सिध्दू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या “मै भी चौकीदार” मोहिमेवरून नवज्योत सिंग सिध्दू यांनी टीका केली असून, जग कुठेच्या कुठे चालले आहे, चीन समुद्राच्या खालून रेल्वे नेण्याचा प्रयत्न … Read more

नरेंद्र मोदी जर स्वतःला अजिंक्य समजत असतील तर, त्यांनी २००४ विसरू नये – सोनिया गांधी

रायबरेली – आपला पारंपरिक मतदारसंघ रायबरेली येथून आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते अजिंक्य आहेत, असे वाटत असेल तर त्यांनी २००४ विसरू नये असे सोनिया गांधी यांनी म्हंटले आहे. २००४ मध्ये वाजपेयी यांना ते … Read more

ईशान्य भागात ३ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान, तर उर्वरित भागात मतदानाची इतकी आकडेवारी

नवी दिल्ली – १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत मतदान ३८.३५% मतदानाची नोंद झाली आहे. तर तेलंगणा राज्यात ४८.९५ % मतदान आतापर्यंत झाले आहे. Maharashtra: Voting turnout in Nagpur parliamentary constituency till 3 pm is 38.35%. … Read more

रोख रक्कम, दारू, दागिन्यांसह 75.79 कोटी रुपयांचा ऐवज जप्त

निवडणूक आयोगाची कारवाई राज्यात सि-व्हिजील ऍपवर 1 हजार 862 तक्रारी दाखल मुुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांना निवडणूक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस, अबकारी व आयकर विभागाने केलेल्या कारवाईत राज्यभरातून रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, सोने-चांदीचे दागिने मिळून तब्बल 75.79 कोटी रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. … Read more

रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींचा पारा वाढला – राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रत्युत्तर

मुंबई – वर्धा येथील जाहिर सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवार कुटुंबीय व राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी … Read more