करोनाचा धोका वाढला ! देशात 24 तासांत 10 हजार 158 नवीन रुग्णांची नोंद

नवी दिल्ली –  देशात पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढत आहे. नुकतेच मागील दोन दिवसांची करोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी देशात 7,830 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे. आज … Read more

‘ओमिक्रोन’वर कोविशिल्डबाबत अभ्यास सुरू

पुणे – करोनाच्या “ओमिक्रोन’ व्हेरिएंटवर “कोविशिल्ड’ किती प्रभावी आहे, हे येत्या दोन-तीन आठवड्यांत समजणार आहे, अशी माहिती “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले. “ओमिक्रोन’ किती घातक आहे, याविषयी आताच सांगता येणार नाही, असेही पूनावाला यावेळी म्हणाले. “सध्या “ओमिक्रोन’ने जगातच भीतीचे वातावरण आहे, तर सध्याच्या करोना प्रतिबंधक लस या संसर्गावर प्रभावी आहे … Read more

भारतीयांच्या जीवाची किंमत मोजून कोरोना लस निर्यात केली नाही : पुनावाला

नवी दिल्ली : भारताची कोरोना लस उत्पादक कंपनी सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी अखेर भारताच्या वाट्याच्या कोरोना लस परदेशात निर्यात केल्याच्या आरोपावर मौन सोडलं आहे. भारतात कोरोनाच्या लसींचा तुटवडा असताना कोरोना लस परदेशात निर्यात केल्याचा गंभीर आरोप केंद्रातील मोदी सरकारवर आणि सीरमवर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकृतपणे एक निवेदन काढत त्यात आपली भूमिका स्पष्ट … Read more

मी आणि मुलगा अदर पुनावाला देश सोडून पळालेलो नाही

लंडन – मी आणि माझा मुलगा अदर पुनावाला देश सोडून पळालेलो नाहीत. आम्ही केवळ सुट्टीसाठी लंडनमध्ये आलो आहोत, असे वक्तव्य सायरस पुनावाला यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून अदर पुनावाला यांचे कुटुंब देश सोडून पळाल्याची चर्चा आहे. मात्र, आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱ्या असल्याचे सायरस पुनावाला यांनी म्हटले. प्रत्येक उन्हाळ्यात आमचे … Read more

कोविशील्ड : दुसऱ्या डोससाठी झालेली नोंदणी कायम राहणार

मुंबई : कोविशील्ड (Covishield) या कोरोना लसीच्या 2 डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. त्यासंबंधी बदल आता कोविन पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे. म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहेत. मात्र, आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच दुसऱ्या … Read more

लसीकरणाचा सावळागोंधळ !

जगभर जुले 2020 पासून लसींचे उत्पादन आणि उपलब्धता यासाठी प्रत्येक देश कसोशीने प्रयत्न करत होते. करोनाच्या विरोधातील लढाईत लसीकरण हे सगळ्यात प्रभावी अस्त्र आहे याची जाणीव या देशांना झाली होती. आपल्या देशात मात्र लसीच्या उपलब्धतेसाठीचे नियोजन, उत्पादनासाठी गुंतवणूक, लस खरेदीसाठीचे करार झाले नाहीत. स्वाभाविकपणे लसीकरणाचे राष्ट्रव्यापी व्यवस्थापन आणि वेळापत्रक तयार झाले नाही. फक्त घोषणा होत … Read more

भारत-ब्रिटन यांच्यात आरोग्यसेवांवर चर्चा

ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिवांची सीरम इन्स्टिट्यूटला भेट पुणे – “कोव्हॅक्‍स’ या दुसऱ्या करोना प्रतिबंधक लसीचेही 130 कोटी डोस बनवण्यात येणार आहेत, अशी माहिती ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ट्रुसस्लिझ यांना दिल्याचे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पूनावाला यांनी सोमवारी सांगितले. ट्रुसस्लिझ त्यांच्या शिष्टमंडळाने सीरम इन्स्टिट्यूटला सोमवारी भेट दिली. यावेळी “सीरम’चे अध्यक्ष सायरस पूनावाला, अदर पूनावाला … Read more

Updated News : सिरम इन्स्टिट्यूट ‘अग्नितांडव’ ; तब्बल 4 तासांनी आग ‘आटोक्यात’

पुणे – सिरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीच्या काही मजल्यांचे प्रचंड नुकसान झाले मात्र कोणतीही जीवीत हानी झाली नाही. आगीची घटना समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. जवळपास चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. सिरम इन्स्टिट्यूट अग्नितांडव : दुर्घटनेच्या सखोल … Read more

लसीच्या वापरासाठी “सिरम’चा अर्ज दाखल

नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोविशिल्ड या पहिल्या मेड इन इंडिया कोविड लसीच्या आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी अर्ज केला आहे. “वचन दिल्याप्रमाणे, वर्ष 2020 च्या समाप्तीपूर्वी, सिरम इस्टीट्युट ऑफ इंडियाने आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी अर्ज केला असून यामुळे असंख्य लोकांचे प्राण वाचू शकतील, असे सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. … Read more