अहमदनगर – चौघा भाविकांवर काळाचा घाला एसटी बस व कारमध्ये अपघात

श्रीगोंदा – एकादशीच्यानिमित्ताने आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी गेलेल्या पारगाव सुद्रिक येथील भक्तांवर काळाने घाला घातला. एसटी बस व एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. एका भाविकाचा काळ आला होता, मात्र वेळ आली नसल्याने ते बालंबाल बचावले. शनिवारी (दि.४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या ढवळगाव परिसरात … Read more

अहमदनगर – प्रतिबंधात्मक कारवाई केल्याच्या रागातून पोलिसास शिवीगाळ

नगर – या पूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत तु नोकरी कशी करतो, असे म्हणत तुझ्यावर दावाच ठोकतो, अशी धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.३) रोजी नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत घडला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुधीर दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी तुषार रामभाऊ येवले … Read more

Bihar Politics: तेजस्वी यादव यांच्या रॅलीत चिराग पासवान यांना आईवरुन शिवीगाळ, बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले

पाटणा – राजकारणात शब्दांची मर्यादा हरवत चालली आहे. नेत्यांना काय बोलतो याचे भान राहीलेले नाही. त्याचाच एक नमुना बिहारमध्ये पहायला मिळाला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या व्यासपीठावरून लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिरग पासवान यांना जाहीरपणे आईचा उद्धार करणारी शिवीगाळ केली गेली. (Abusive Language Used Against Chirag Paswan’s Mother During Tejashwi Yadav’s Rally) हा प्रकार … Read more

पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करा, जामखेड भाजपाची मागणी

जामखेड (प्रतिनिधी) : पंतप्रधानांना मारण्याची आणि शिविगाळ करण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जामखेड तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली. जामखेड पोलीस स्टेशन येथे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याबाबत लवकर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, … Read more