Bribe News: 4 हजार रुपयांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकाला रंगेहाथ पकडले; जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे- लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये मंजूर झालेल्या ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना जुन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापु एकनाथ रोकडे (५७) असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. याबाबत ५२ वर्षीय व्यक्तीने पुणे … Read more

“सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा…”; बीडच्या पोलीस निरीक्षकाच्या घरात कुबेराचा खजिना

Haribhau Khade ।

Haribhau Khade । व्यावसायिकांना घाबरवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या पोलीस निरीक्षकाच्या घरी कुबेराचा खजिनाच सापडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे  यांच्या घडावर धाड टाकली. त्यावेळी खाडे यांच्या घरात सोन्याची बिस्कीट, चांदीच्या विटा, सोन्याचे महागडे दागिने आणि नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली. ही सगळी संपत्ती पाहून एसीबीच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. … Read more

Pune: पीएच. डी. प्रबंधासाठी लाच

पुणे – पीएच.डी. साठी तयार केलेला प्रबंधामध्ये सुधारण करून पुन्हा सादर करण्यासाठी महिला प्राध्यापिकेने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शहरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून … Read more

Pune: वडगाव मावळात लाचखोर तलाठ्याला पकडले

पुणे : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी एका शेतकऱ्याकडे ५० हजारांची लाच मागणाऱ्या वडगाव मावळातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सखाराम कुशाबा दगडे (वय ५२) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. दगडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. शेतजमिनीची फोड … Read more

’40 लाखांची रोकड, 2 किलो सोने, 60 महागडी घड्याळे’ अधिकाऱ्याच्या घरावर छापा, 100 कोटींहून अधिकची सापडली मालमत्ता

Telangana – हैद्राबाद येथे एका अधिकाऱ्याच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. तेलंगणा लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने ACB  नगर नियोजन अधिकाऱ्याच्या घरातून आणि कार्यालयातून सुमारे 100 कोटी रुपया पेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्याचे नाव शिव बालकृष्ण नाव आहे. 14 पथकांनी या … Read more

मोठी बातमी: ठाकरे गटाला धक्का; आमदार राजन साळवीच्या घरी एसीबीकडून झाडाझडती सुरू

Rajan Salvi: ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) झाडाझडती सुरू झाली आहे. एसीबीचे अधिकारी चौकशीसाठी राजन साळवी यांच्या घरी पोहोचले असून अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच राजन साळवीसह त्यांच्या कुटुंबाची एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या निवासस्थानी एसीबी पथक … Read more

मोठी ‘लाचखोरी’! सहाय्यक अभियंत्याला तब्बल 1 कोटी रुपयांची लाच घेताना पकडले

अहमदनगर – लाचखोरीची प्रकरणे कमी न होता ती वाढतच चाललेली दिसत आहे. याआधी पाच हजार, पन्नास हजार, 10 लाख अशी लाचेची प्रकरणे समोर येत असत मात्र आता तब्बल एक कोटी रुपये लाचेचे प्रकरण उघडकीस आले आहे. अहमदनगर एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गायकवाड … Read more

Corrupt Officer: औरंगाबादमधील लाचखोर अधिकाऱ्यांची पाहा यादी

औरंगाबाद – अनेकदा सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी विविध कामांसाठी लाच घेतल्याची प्रकरणे समोर येतात. या घटनानांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. खरं तर जनतेची कामे करण्यासाठीच या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र आपल्या अधिकाराचा अनेकदा काही अधिकारी गैरफायदा घेतात. नागरिकांकडून विविध कामांसाठी विविध विभागातील अधिकारी लाच घेतल्याची प्रकरणे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या विभागाच्या अधिकाऱ्याने किती लाच … Read more

PUNE: ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा लाचखोरीत सहभाग? डॉ. बंगिनवार याला पोलीस कोठडी

पुणे – महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिष्ठाता आणि तक्रारदार यांच्यातील संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) हाती आले आहे. त्यातून या प्रकरणात महानगरपालिकेतील वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे लाचलुचपत विरोधी पथकाने (एसीबी) केलेल्या तपासातून स्पष्ट झाले आहे. ध्वनिमुद्रित संभाषणाच्या अनुषंगाने या आर्थिक गैरव्यवहारामध्ये ट्रस्टचे पदाधिकारी व … Read more

Bribe News: प्रवेशासाठी 20 लाखांची लाच मागणारा पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता ACBच्या ताब्यात

पुणे – व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यास लाचलुचपत विरोधी पथकाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. मंगळवारी संध्याकाळी ही कारवार्इ करण्यात आली. आशिष बंगिनवार असे ताब्यात घेतलेल्या अधिष्ठाताचे नाव आहे. महाविद्यालयात असलेल्या १५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी बंगिनवार यांनी एका विद्यार्थिनीच्या … Read more