पिंपरी | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन अपघातात तिघांचा मृत्यू

लोणावळा, (वार्ताहर) – भरधाव वेगात जाणार्‍या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार मार्गालगतच्या खड्ड्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळील टाकवे गावच्या हद्दीत झाला. तर दुसर्‍या एका अपघातात एका निष्णात मोटार रायडरचा मोटार … Read more

पुणे जिल्हा : मिक्सरमधून रस्त्यावर खडी पडल्याने अपघातांत वाढ

पोलिसांकडून कारवाई व्हावी ः मुळशीकरांची मागणी पौड – मुळशी तालुक्यात मुख्य रस्त्यावरून सिमेंट काँक्रीट (आरसीएम) ट्रकची (मिक्सर) वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या मिक्सरमधून रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी पडत असल्याने यावरून दुचाकी घसरून अपघातांत वाढ झालेली आहे. मुळशी तालुक्यात सध्या नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी बांधकामांनी वेग घेतला आहे. पूर्वी बांधकाम करताना … Read more

पिंपरी | बोरघाटात स्कोडा कारला भीषण आग

खालापूर,  (वार्ताहर) – मुंबई – पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या स्कोडा कारला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत स्कोडा कार पूर्णपणे जळून खाक झाली. मुंबई – पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातून मुंबईच्या दिशेने शुक्रवारी सायंकाळी चालत्या कारला अचानकपणे आग लागली व या आगीत स्कोडा कार जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी अग्निशामाक दल, … Read more

satara | कुमठे येथे अपघातात दोन मजूर ठार

कोरेगाव, (प्रतिनिधी) – कोरेगाव-कुमठे-भाडळे रस्त्यावर कुमठे गावानजीक काल (दि. 9) रात्री 8.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील आप्पालाल चव्हाण आणि महादेव गौडा हे विजापूर जिल्ह्यातील रहिवासी जागीच ठार झाले. हे दोघे भोसे, ता. कोरेगाव येथे विहिरीच्या कामावर मजूर म्हणून काम करत होते. या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत माहिती अशी, आप्पालाल … Read more

satara | वाढे फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा

सातारा, (प्रतिनिधी) – वाढे फाटा, ता. सातारा येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून, पोलिसांनी 18 हजार 366 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. याबाबत माहिती अशी, वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेलशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अमित बजरंग करे, अमितकुमार विश्रांत माने (रा. वाढे), श्रीकांत लक्ष्मण पाटील, सुभाष शिवाजी शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा), नारायण किसन कदम (रा. खेड) व … Read more

पुणे | कुटुंबप्रमुख गमावलेल्यांना ५५ लाख भरपाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे अपघातात कुटुंबप्रमुख गमावलेल्या कुटुंबीयांना ५५ लाख रुपये मिळणार आहेत. रविवारी (दि. ३) झालेल्या लोकअदालतमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश एम. जी. चव्हाण, अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर याबाबतचा निर्णय झाला. यासाठी अर्जदारांचे वकील अ‍ॅड. एन. डी. वाशिंबेकर, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुखविंदर बिदरा, विमा … Read more

PUNE: शहरात दोन अपघातांत दोन जणांचा मृत्यू

पुणे – शहरातील कोरेगाव पार्क आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुचाकीला पाठीमागून दिलेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ३ च्या समोरील सार्वजनिक रोड १९ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार डेव्हिड सुलतान शेख ( २५, रा. कोंढवा, खुर्द) असे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिजित गुजर … Read more

पुणे जिल्हा : रस्त्यावरील आठवडे बाजाराने अपघाताचा धोका

जागा बदलण्याची अवसरी ग्रामस्थांची मागणी मंचर – अवसरी खुर्द येथील गुरुवारी भरणारा आठवडे बाजार गावातील मुख्य रस्त्यावर भरत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायतीने आठवडे बाजाराची जागा बदलावी. अशी मागणी चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे. अवसरी खुर्द येथील साठ वर्षापासून दर गुरुवारी आठवडे बाजार चालू आहे. सुरुवातीला आठवडे बाजार ग्रामपंचायत पटांगणात भरत होता. आता एसटी स्टँड … Read more

अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उचलले कडक पाऊल; ‘थेट पालकांनाच होणार शिक्षा’, वाचा…..

लखनौ – अलिकडे शाळेत शिकणारी मुलेही स्कुटी अथवा तत्सम वाहनाने शाळेत जाताना दिसत असतात. त्यांच्याकडे वाहन चालवण्यासाठी आवश्‍यक असलेला परवानाही नसतो. तरीही ती बेजबाबदारपणे वाहने चालवत असतात. काहीवेळा एकाच वाहनावर तीन तीन जण बसलेले असतात. त्याहीपुढे म्हणजे धोका पत्करत विविध प्रकारची स्टंटबाजी करत वाहन चालवण्याचेही फॅड निर्माण झाले आहे. अलिकडेच प्रसिध्द झालेल्या अहवालानुसार रस्ते अपघातात … Read more

दिघी-आळंदी वाहतूक विभागाकडून विद्यार्थ्यांमध्ये अपघात, सायबर गुन्हे, महिला अत्याचारांबाबत जनजागृती

आळंदी – दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या वतीने पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा बापू बांगर यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत गुरुवारी (दि. 14) राजमाता जिजाऊ काॅलेज, डुडुळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये अपघात, सायबर गुन्हे, महिला अत्याचार गुन्हे यासंदर्भात पीपीटी दाखवून जनजागृती करण्यात आली. यावेळी दिघी-आळंदी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, सहाय्यक … Read more