पुणे जिल्हा : हातभट्टीचा ४ लाखांचा साठा जप्त; शिंदवणे येथे कारवाई, एकावर गुन्हा

उरुळी कांचन : शिंदवणे (ता. हवेली) येथील हद्दीत घराच्या आडोशाला गावठी तयार दारू विक्री व तयार करणाऱ्या व्यक्तीला मुद्देमालासह उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी कच्चे रसायन व तयार दारू असा ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लाला उर्फ कांतीलाल जवाहर राठोड (वय ३४, रा. काळे शिवार वस्ती, शिंदवणे ता. … Read more

पुणे जिल्हा | पौड समस्यांच्या विळख्यात, ग्रामपंचायत करणार कारवाई

पौड -मुळशी पुणे शहरापासून अवघ्या काही अंतरावर वसलेला मुळशी तालुक्याचा संपूर्ण कारभार हा पौड या ठिकाणाहून चालतो. मुळशी तहसील कार्यालय, पौड पोलीस स्टेशन, मोजणी कार्यालय, पंचायत समिती, शासकीय ग्रामीण रुग्णालय, बांधकाम विभाग, महावितरण, फॉरेस्ट, बँक, पोस्ट ऑफिस, दुय्यम निबंधक कार्यालय अशी सर्वच कार्यालयांमधून तालुक्यातील सर्व गावांचा कामकाज पाहिले जाते; परंतु पौड गावाचा कारभार हा पौड … Read more

ईव्‍हीएम चोरी प्रकरणी तिघे निलंबित; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठी कारवाई

मुंबई  – पुरंदर ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ … Read more

सातारा – प्लॅस्टिक वापर व कचरा उघड्यावर फेकणाऱ्यावर कारवाई करा

सातारा – जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रांमध्ये नागरिकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुकास्तरावरील पथकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येत आहे. स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

सातारा – प्लॅस्टिकबंदी उल्लंघनप्रकरणी लोणंदमधे कारवाई

लोणंद – ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ व ‘माझी वसुंधरा 4’ अभियानांतर्गत लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडा बाजार व बाजारपेठेत प्लॅस्टिकबंदी उल्लंघनप्रकरणी प्लॅस्टिक जप्ती व दंडाची कारवाई करण्यात येत आहे. नगरपंचायतीने गुरुवारी एकाच दिवसात 25 हजार रुपयांचा दंड वसूल करून, 35 किलो प्लॅस्टिक जप्त केले. ‘स्वच्छ भारत’ अभियान जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतींनी ‘मिशन मोड’वर … Read more

सातारा : सूर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई

ओगलेवाडी परिसरातील तीन जणांचा समावेश कराड : कराड शहर आणि परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जबर दुखापत, जबरी चोरी, विनयभंग, खंडणी, अवैधरित्या शस्त्रे बाळगणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे, शासकीय कामात अडथळा आणणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सोमा उर्फ सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी (वय 33), रविराज शिवाजी पळसे (वय 27) आणि आर्यन चंद्रकांत सूर्यवंशी (वय 19, … Read more

नगर – ट्रान्सपोर्टचे ऑफीस फोडणारे दोघे जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर – नागापूर एमआयडीसी येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफीस तसेच गोडाऊनचे शटर तोडून चोरी करणारे दोघे सराईत तसेच एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. राहुल महेंद्र मखरे (वय २०, रा.नागापूर), सतीश मछिंद्र शिंदे (वय २९ रा.तपोवन रोड) असे आरोपींची नावे आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल राजेंद्र परदेशी यांनी फिर्याद दिली होती. पितळे कॉलनी, एमआयडीसी नागापूर येथील … Read more

सातारा – कोरेगावच्या विकासात अडथळा आणणार्‍यावर कारवाई करा

कोरेगाव – कोरेगावमध्ये मोठ्य प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे हे विशिष्ट हेतूने आणि व्यक्तिद्वेषातून नगरपंचायतीच्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत. अशी नाहक बदनामी करणार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना गुरुवारी निवेदन देण्यात … Read more

पुणे शासकीय वसतिगृह आता खासगी इमारतीत

पुणे : कोरेगाव पार्क येथे संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी पुणे शहरात खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतीगृहासाठी १० ते १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या खासगी इमारतीची आवश्यकता आहे. या इमारतींमध्ये किमान १५ ते २० खोल्या, १० शौचालये, १० स्नानगृहे, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय … Read more

पुणे : जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी

आक्षेपार्ह टिप्पणी : भाजपच्यावतीने आंदोलन पुणे – प्रभू श्री रामचंद्र यांच्याविषयी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. शिवाय, ते सतत हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्ये करून भावना दुखावून राज्यात अशांतता निर्माण करत आहेत. त्यमुळे जितेंद्र आव्हाड यांना आम्ही पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला. आमदार आव्हाड यांनी प्रभू श्रीराम … Read more