पुणे : कोथरूड, बावधन परिसरात दंडात्मक कारवाईचा बडगा

पुणे – सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, प्लॅस्टिक वापर करणे, पोस्टर लावून शहर विद्रुपीकरण करण्यासह धूळ आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर पुणे महापालिकेच्या कोथरूड, बावधन क्षेत्रीय कार्यालयातील भरारी पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर जे व्यावसायिक नियमांचे पालन करतात, त्यांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “दमदार भरारी पथक” स्थापन … Read more

पुण्यात ८८ किलो भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पुणे  : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर धाड टाकून २२ हजार रुपये किमतीचे ८८ किलो भेसळयुक्त तुप व ११ हजार ९६ रुपये किमतीचे ७३ किलो वनस्पती असा एकुण रुपये ३३ हजार ९६ चा साठा जप्त करण्यात आला आहे. भेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी … Read more

राणा दाम्पत्यावर केलेली कारवाई योग्यच; दिलीप वळसे पाटील यांची भूमिका

मुंबई – राणा दाम्पत्याच्याबाबत पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत. ते योग्य चौकशी करूनच दाखल केले असतील. पोलिसांकडे असलेल्या माहितीनुसारच योग्य ती कारवाई करतात. त्यामुळे राणा दाम्पत्यावर केलेली कारवाई योग्यच आहे. तसेच राणा दाम्पत्याच्या घरावर धावून जाणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून, ते … Read more

पुणे: शिक्षण उपसंचालकांवर शिस्तभंगाच्या कारवाईस चालढकल

पुणे – पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत खासगी अनुदानित शाळांमधील बेकायदा शिक्षक भरतीप्रकरणी राज्य शासनाची परवानगी न घेता पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते. याप्रकरणी तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे तपासणी करून तत्कालीन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांवर शिस्तभंगाची कारवाईचे आदेश शासनाने शिक्षण आयुक्‍तांना दिले होते. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी केवळ चौकशी समिती नियुक्‍त करण्याचा वेळकाढूपणा केला जात आहे. बेकायदा … Read more

एनसीबीने केलेली कारवाई बेकायदेशीर; ड्रग्ज प्रकरणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई  – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत संबंधीत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने दोन आरोपींचे बॅंक खाते गोठवली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल विशेष न्यायालयाने दिला आहे. तसेच संबंधित बॅंक खाती पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आरोपी जय मधोक आणि झैद विलात्रा यांनी विशेष न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेत मधोक … Read more

बारामती एसटी आगारातील १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

बारामती : संपात सहभागी असलेल्या १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आहे. बारामती आगारातील ७ तर एमायडिसी आगारातील ६ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली आहे. विविध मागण्यासह एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले काही दिवसांपासून सुरू आहे. दिवसेदिवस त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. बारामती आगारातील 13 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य … Read more

पुणे | वारजे परिसरातून 52 लाखांचा मद्यसाठा जप्त

पुणे | राज्य उत्पादन शुल्क विभागाने  वारजे माळवाडी परिसरातून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून  52 लाख रुपये किंमतीचा  मद्यसाठा जप्त केला.  ही कारवाई शनिवारी (दि.6) करण्यात आली असून यासंदर्भात एकाला पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा तुळशीराम कांदे  (वय-30,  रा. मु. अंबील वडगाव, ता. बीड)हे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवा राज्यासाठी विक्रीचा परवाना असलेल्या … Read more

पुणे: महापालिकेतील मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक; १० हजारांची लाच घेताना कारवाई

पुणे: पुणे महापालिकेतील एका मुकादमाला आणि झाडुवाल्याला १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. रवी लोंढे व हर्षल ज्ञानेश्वर अडागळे ( ३१) असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

कंगना राणावतला ‘ट्विटर’पाठोपाठ ‘इन्स्टाग्राम’चा दणका; केली कारवाई

मुंबई –   बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे आता एक समीकरणच बनलं आहे. अशाच एका वादग्रस्त पोस्टमुळं कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद  केले आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. त्यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली. मात्र … Read more

“करोना नियमांच्या भंगाबद्दल राजकीय नेत्यांवर कारवाई व्हावी”, याचिका दाखल

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगाल निवडणुकीवेळी करोनाविषयक नियमांच्या उल्लंघनाच्या घटना घडल्या. त्याबद्दल सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांवर आणि स्टार प्रचारकांवर कारवाई केली जावी, अशा मागणीची याचिका मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. बंगालमधील प्रचारावेळी मास्कविषयीच्या नियमांचे पालन झाले नाही. निष्काळजी प्रचारामुळे बंगालमधील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रचारात सहभागी नेत्यांच्या संपर्कातील अनेकांना करोना संसर्ग … Read more