‘वन मॅन, वन गव्हर्नमेंट, वन बिझनेस ग्रुप’ ! कॉंग्रेसचा अदानी मुद्द्यावरून मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली – जी-20ची थीम “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात “वन मॅन, वन गव्हर्नमेंट, वन बिझनेस ग्रुप’ ही संकल्पना देशात राबवीत आहे, असे म्हणत कॉंग्रेसने अदानी समुहावरील आरोपांवरून शनिवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “जी-20′ शिखर … Read more

Jammu and Kashmir : अदानींवरून लक्ष वळवण्यासाठी काश्‍मीरचा वापर; मेहबुबा मुफ्तींचा आरोप

श्रीनगर :– जम्मू-काश्‍मीरमधील अतिक्रमणविरोधी कारवाईचा माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी तीव्र शब्दांत निषेध केला. केंद्र सरकार अदानी प्रकरणापासून देशाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी जम्मू-काश्‍मीरचा वापर करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करण्याची ग्वाही दिल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मेहबुबा म्हणाल्या, त्यांची वक्तव्ये म्हणजे … Read more

Adani Issue : आपची भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने

नवी दिल्ली – अदानी समुहाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत आम आदमी पक्षाने रविवारी येथील भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. पक्षाचे दिल्ली संयोजक गोपाल राय म्हणाले की, अदानींवरील हिंडेनबर्ग अहवालातील आरोप गंभीर असून त्याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करावी. भाजप चौकशीपासून पळ काढत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हा एकच नेता आहे, जो कोणत्याही तपासाला … Read more

Parliament Session : ‘हा’ पक्ष वगळता विरोधकांचा संसद कामकाजावरील बहिष्कार मागे

नवी दिल्ली – अदानी घोटाळा प्रकरणात विरोधकांनी गेले तीन दिवस संसदीय कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. तथापि आता त्यातील आम आदमी पक्ष वगळता बहुतांशी पक्षांनी आपला बहिष्कार मागे घेऊन कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात मंगळवारी समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. … Read more

Adani scam : अदानी घोटाळा प्रकरणामुळे देशाच्या प्रतिष्ठेला बाधा – मायावती

लखनौ – अदानी घोटाळा प्रकरणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होईल. सरकारने या देशातील जनतेला या मुद्द्यावर विश्‍वासात घेतले पाहिजे, पण ते घेत नाहीत, हे “दुर्दैवी” आहे. या घोटाळा प्रकरणामुळे भारताच्या प्रतिष्ठेला बाधा पोचली आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. मायावती यांनी म्हटले आहे की, आज रविदास जयंतीच्या दिवशी अदानी प्रकरणाचा … Read more