“मी जर तुम्हाला योग्य उत्तर दिलं किंवा उत्तर जरी दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल”

नवी दिल्ली : भारतामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी देशात आपल्या जीवाला धोका असून कोणाविषयी आपण बोलू शकत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी युनायटेड किंग्डममधील एका इंग्रजी वर्तमापत्राला मुलाखत दिली त्यात त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. देशात कोरोनाची लढाई रोखण्यासाठी सिरम सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने कोविशील्ड नावाची लस … Read more

“सीरमचे अदर पूनावाला डाकूपेक्षाही वाईट”, भाजप आमदाराची टीका

लखनौ – उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार राधामोहनदास आगरवाल यांनी सीरम इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या करोनालसीच्या दरांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर, सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला हे डाकूपेक्षाही वाईट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीरमने बुधवारी कोविशिल्ड लसीचे खुल्या बाजारातील दर जाहीर केले. त्यानुसार, राज्य सरकारांना लसीचा एक डोस 400 रूपये किमतीने उपलब्ध होईल. … Read more

पुण्याला मोफत लस द्यावी; महापौर, सर्व पक्षनेते अदर पूनावालांना भेटणार

पुणे – ‘सीरम इन्स्टिट्यूट’ ही संस्था पुणे शहरात आहे. पुण्यामुळे या संस्थेचे नाव जगभरात पोहोचलेले आहे. त्यामुळे या संस्थेने सामाजिक जाणीवेतून पुणेकरांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी एकमुखाने केली आहे. याबाबतचे पत्र महापालिकेच्या वतीने लवकरच “सीरम’ला देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक करोनाचा संसर्ग पुणे शहर आणि जिल्ह्यात आहे. तसेच दिवसेंदिवस … Read more

‘सीरम इन्स्टिट्यूट’ला लागलेल्या आगीने 1000 कोटी रूपयांचे नुकसान – अदर पुनावाला

पुणे – सीरमला लागलेल्या आगीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. रोटाव्हायरस आणि बीसीजीच्या लस उत्पादन आणि साठवणुकीला त्याचा फटका बसला आहे. मात्र, कोविशिल्डच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे आगीनंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले. गुरूवारी आग लागलेली इमारत नवी होती. तेथे अन्य उत्पादनांचे काम सुरू करण्यात … Read more

अदर पुनावालांनी सांगितलं; म्हणाले, आपली कंपनी महिन्याला तयार करते ‘एवढे’ कोटी डोस

पुणे – आपली कंपनी करोना प्रतिबंधक लसीचे प्रत्येक महिन्याला सात ते आठ कोटी डोस तयार करू शकते आणि भारत आणि अन्य देशांना किती डोस द्यायचे याचे व्यापक नियोजन सुरू आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. भारत आणि अन्य देशांना किती डोस द्यायचे याचे धोरणात्मक नियोजन आरोग्य मंत्रालय करत आहे. … Read more

करोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे; अदर पुनावालांची सरकारकडे मागणी

नवी दिल्ली – करोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या कंपन्यांना कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर पेचातून वाचवण्यासठी सरकारने कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी केली आहे. जर लस दिल्यानंतर त्याचा कोणत्याही प्रकारे विपरित किंवा गंभीर परिणाम झाला तर यासाठी लस निर्मिती कंपनीला जबाबदार धरले जाऊ नये. सरकारने लस निर्मिती कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे … Read more

जानेवारीत लसीकरण सुरू

सीरमच्या लसीला महिनाअखेर परवानगीची शक्‍यता पुणे – ऑक्‍सफर्ड ऍस्ट्राझिंका लस वापराला या महिन्याच्या अखेर परवानगी मिळेल. लसीकरण जानेवारी महिन्यात सुरू होईल, अशी अपेक्षा या लसीचे उत्पादक असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केली. इकॉनॉमिक टाईम्सच्या जागतिक व्यवसाय परिषदेत पूनावाला बोलत होते. भारतातील प्रत्येकाला ऑक्‍टोबर 2021 पर्यंत लस मिळेल. त्यानंतर … Read more

अदर पुनावालांना मानाचा ‘एशियन ऑफ द ईयर’ पुरस्कार

सिंगापुर – पुण्यातील प्रख्यात सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना यंदाचा एशियन ऑफ द ईयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापुरच्या द स्ट्रेट टाईम्स तर्फे या पुरस्कारासाठी सहा जणांची यादी जाहीर झाली आहे त्यात हे नाव आहे. सीरम इन्स्टिट्युटने ऑक्‍सफर्ड युनिर्व्हीसीटी आणि ऍस्ट्राझेनका कंपनीच्या संयुक्त विद्यमाने करोनावरील कोविशिल्ड नावाची लस विकसित केली असून … Read more

Corona Vaccine:  एवढ्या किंमतीला मिळणार सामान्य नागरिकांना लस 

नवी दिल्ली –  करोनाचा नायनाट करणारी लस शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत. अजुन कोणाला यश मिळाले नसले तरी युध्दपातळीवर सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत जरी लस शोधली गेली इतक्‍या कमी कालावधीत विकसित करून बाजारात दाखल झालेली ही पहिलीच लस असणार आहे. सध्या ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्रेजेनेका यांच्याकडून तयार केली जाणारी लस अगदी … Read more

सिरम इन्स्टिट्यूट पाच करोना लसीचे १०० कोटी डोस तयार करणार

नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पाच वेगवेगळ्या करोना लसीचे १०० कोटी डोस तयार करणार आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. पाच वेगवेगळ्या लसींमध्ये कोविशिल्ड (Covishield), कोवोवॅक्स (Covovax), कोविववॅक्स (COVIVAXX), कोवीवॅक (COVI-VAC), एसआआय कोवॅक्स (SII COVAX) या लसींचा समावेश आहे. २०२२ वर्ष उजाडण्याआधी हे डोस तयार करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न असून यासाठी … Read more