प्रशंसा…आनंद अन्‌ टाळ्यांचा कडकडाट; उत्साहपूर्ण वातावरणात रंगला ‘प्रभात आदर्श सरपंच पुरस्कार’ सोहळा

पुणे – डोक्‍यावर फेट्यांचा साज चढवत सभागृहात प्रवेश.. प्रसन्न वातावरणाने बहरलेले सभागृह… गावात आपण केलेल्या कामांची चित्रफित स्क्रीनवर सुरू असताना “आदर्श सरपंच’ पुरस्काराचे नाव जाहीर करत सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान…त्याचवेळी टाळ्यांचा कडकडाट…अशा उत्साहपूर्ण आणि आनंददायक वातावरणात हा कौतुक सोहळा पार पडला. निमित्त होते, दैनिक प्रभातने आयोजित केलेल्या आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्याचे… “हा सोहळा आम्हाला उर्जा … Read more

आदर्श सरपंचांच्या ग्रामपंचायतींसाठी दोन कोटींचा विकासनिधी; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे – “दैनिक प्रभातने निवडलेल्या 40 आदर्श सरपंचांच्या गावाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये असा सुमारे दोन कोटी रुपयांचा विकास निधी दिला जाईल,’ अशी घोषणा उच्च-तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. दैनिक “प्रभात’तर्फे आयोजित “प्रभात आदर्श सरपंच पुरस्कार’ सोहळ्यात पाटील यांच्या हस्ते 40 गावांतील सरपंचांना पुरस्काराने सन्मानित … Read more

आदर्श सरपंच : बेलसरचे लोकमान्य नेतृत्व उपसरपंच धीरज जगताप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली लढाई ज्या पावनभूमीत झाली. त्या इतिहासाचे साक्षीदार असलेले बेलसर गाव. पुरंदर तालुक्‍यातील बेलसर हे प्रगतशील व ऐतिहासिक वारसा असलेले गाव. 15 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली व 9 फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले क्रियाशील, कृतिशील, अभ्यासू व अनुभवी युवा … Read more

आदर्श सरपंच : समाजकार्य व्हाया राजकारण सरपंच विक्रम गव्हाणे

देशातील इतिहासाचा साक्षीदार असलेले कोरेगाव भीमा हे ऐतिहासिक गाव. शेतकरी कुटुंबातील विक्रम गव्हाणे यांना राजकीय वलयाची झालरही नव्हती. मात्र, समाजकार्य करताना ते कळत नकळत राजकीय आखाड्यात प्रवेशित झाले. त्यांचा प्रवास हा र ाजकारणातील तरुणांना आणि नवशिक्‍यांना प्रेरणादायी ठरला आहे. समाजभान जपत सरपंच विक्रम गव्हाणे हे गावासाठी एक व्हिजन ठेवून कार्यरत राहिले आहेत. सर्व सहकाऱ्यांना सोबत … Read more

आदर्श सरपंच : अण्णापूरचे उदयोन्मुख, विकासाभिमुख नेतृत्व किरण झंजाड

शिरूर तालुक्‍यातील अण्णापूर येथील विद्यमान सरपंच किरण झंजाड यांनी गेल्या दहा वर्षांत गावाचा विकास साधत उत्कर्ष केला आहे. ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच, सरपंच अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली आहे. त्यामुळे त्यांनी शिरूर तालुक्‍यात एक विकासात्मक ठसा उमटवला आहे. वयाच्या 23व्या वर्षी उपसरपंचपदाची संधी मिळाल्यानंतर गावविकासाचा ध्यास त्यांनी घेतला. एक आदर्श सरपंच, अशी प्रतिमा निर्माण करून … Read more

आदर्श सरपंच : महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्‍न पडावा, ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहात राहावा. कुटुंबाबरोबरच समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी समाजातील गोरगरीब लोकांना नेहमी मदतीचा हात पुढे करून त्यांचे जीवनही सुखी करण्यासाठी अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या वाघोली येथील माजी सरपंच जयश्री राजेंद्र … Read more

आदर्श सरपंच : जनसेवेची तिसरी पिढी माजी उपसरपंच दत्तात्रयमामा टेळे

दौंड तालुक्‍यातील राहू ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन आसपासच्या अनेक वाड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यावेळी टेळेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. या गावातील टेळे कुटुंबीयांना तीन पिढ्यांचा सामाजिक, राजकीय वारसा आहे. कुटुंबातून बाळकडू मिळाल्याने माजी उपसरपंच- दत्तात्रयमामा टेळे यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. यातूनच त्यांनी टेळेवाडीची उपसरपंचपदाची धुरा लीलया पेलली होती. दत्तात्रयमामा टेळे यांनी आपल्या कार्यकाळात विकासकामांची गंगा गावात … Read more

आदर्श सरपंच : गोरगरिबांचा वाली विठ्ठलवाडीचे जयेश शिंदे

प्रति पंढरपूरनगरी असलेल्या शिरूर तालुक्‍याच्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत असलेल्या एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये जयेश शिंदे यांचा जन्म झाला. तत्कालीन परिस्थितीनुसार प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण विठ्ठलवाडीमध्येच पूर्ण करून तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्र शिंदे यांना खुणावत होते. म्हणून औंध येथील आयटीआयमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीमध्ये समाधान मिळत नव्हते. कारण, तोट्याचा का होईना पण रक्‍तात स्वतःच्या … Read more

आदर्श सरपंच : विकामकामांचा ध्यास घेणारे नेतृत्व अरुणाताई घोडे

शिरूर तालुक्‍याच्या राजकीय व्यक्‍तिरेखांचा अभ्यास करता प्रामाणिक, शांत, संयमी, सुसंस्कृत, कल्याणकारी, सुशील व सृजनशील आणि सर्वसामान्यांच्या सेवेस सदैव तत्पर असलेले नेतृत्व म्हणजे टाकळी हाजी गावच्या कार्यक्षम विद्यमान सरपंच सौ. अरुणाताई दामूशेठ घोडे. कुठलीही सत्ता हाती नसताना शिरूर तालुक्‍याच्या राजकारणात सातत्याने पाय रोवून खंबीरपणे उभे राहात राजकारणात प्रवेश करून गावचे सरपंच, शिरूर पंचायत समितीच्या कार्यकुशल, प्रतिभावंत … Read more

आदर्श सरपंच : वाशेरे गाव उद्योग नगरी करण्याचा सरपंच संभाजीराजे कुडेकर यांचा संकल्प

“आमची शेती आमची माणसे’, “आमचा व्यवसाय आमचे उत्पादन’ हा मूलमंत्र घेऊन वाशेरे गाव उद्योग नगरी करण्याचा लोकनियुक्त सरपंच संभाजीराजे कुडेकर यांचा प्रयत्न आहे. गावातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम समृद्ध झाला पाहिजे. “गावातील पैसा गावातच राहिला पाहिजे’, “बाहेरील पैसा गावात आला पाहिजे’ यासाठी नियोजनपूर्वक कार्यक्रम हाती घेतला आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून घराघरांत रोजगार उपलब्ध करून देण्याचा … Read more