मराठी उमेदवारांनी अर्ज करु नयेत.! गुजराथी कंपनीकडून कार्यालयासाठी जाहिरात; विरोधकांकडून कारवाईची मागणी

मुंबई – देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे हे प्रकार असताना आता मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस कंपन्या करु लागल्या आहेत. ITCODE Infotech या कंपनीने चक्क मराठी लोकांनी अर्ज करु नयेत अशी जाहिरात करण्याचे धाडस केले. भाजपचे सरकार आल्यापासून असा मराठीद्वेष उफाळून … Read more

Pune: जाहिरात फलकांची १५ दिवसांत तपासणी करा

पुणे – शहरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस होतो. या पावसाने मोठ्या प्रमाणात झाडे, तसेच होर्डिंग्ज (जाहिरात फलक) पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे वित्तहानी होण्यासह जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आकाशचिन्ह विभागाने १५ दिवसांच्या आत शहरातील सर्व जाहिरात फलकांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांसह, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महापालिकेच्या … Read more

46 वर्षांपूर्वी प्रभात : पंतप्रधानांचा फोटो जाहिरातीत वापरणे गुन्हा

1 हजार व त्यावरील रकमेच्या नोटा चलनातून बाद नवी दिल्ली, दि. 15 – राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकुमान्वये 1000, 5000 व 10,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या आहेत. या वटहुकुमाची अंमलबजावणी त्वरित होणार आहे. या नोटा बेकायदेशीर ठरविण्यात आल्या असून उद्याचा दिवस सर्व बँका व सरकारी कोषागारांना सुट्टीचा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींकडे या … Read more

शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची जाहिरात देण्याची प्रक्रिया तात्काळ पुर्ण करा; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे निर्देश

पुणे – राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत. शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही तात्काळ करावी लागणार आहे. याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश … Read more

Phone Tips : मोबाईलवर दिसणाऱ्या जाहिरातींमुळे हैराण आहात का? 3 क्लिकमध्ये Ads करा बंद, पाहा स्टेप्स…

How to Block Ads in Smart Phone : जेव्हा तुम्ही गुगल सर्च किंवा ई-कॉमर्स अॅप्सवर काहीतरी शोधता तेव्हा तुम्हाला सर्वत्र समान सामग्री(प्रोडक्ट) दिसू लागते. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर कुठेही गेलात तरी तुम्हाला त्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात नक्कीच दिसते. एकाच प्रकारच्या उत्पादनाच्या जाहिराती पुन्हा पुन्हा पाहिल्याने चिडचिड होते. Google तुम्हाला या जाहिराती (Advertisement) तुमच्या जाहिरात आयडीनुसार … Read more

Teacher Recruitment : राज्यातील शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच; दीपक केसरकर

Maharashtra Teacher Recruitment : राज्यातील  शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची   जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. राज्यात शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यात (Maharashtra News) शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती … Read more

आज शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल जाहिरात प्रसिद्ध; जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीचीहे केली बेरीज

मुंबई :  “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीने राज्याच्या राजकारणात एक वादळ निर्माण केले होते. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत कुछ तो गडबड है च्या चर्चांना उधाण आले होते.  शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले. दरम्यान, हीच चूक सुधारत आज शिवसेनेकडून … Read more

“बाळासाहेब ठाकरे वगैरे काही नसून ‘सब कुछ मोदी’ असेच या शिंदेछाप…”; ‘त्या’ जाहिरातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा

मुंबई : ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाच्या जाहिरातीने काल दिवसभर राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ उडवला होता. विरोधकांनी या जाहिरातींवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा याच जाहिरातींवरून ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपवर शेलक्या टीका करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे … Read more

“जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का नाही? शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना”; राऊतांची टीका

मुंबई – शिवसेनेकडून (शिंदे गट) एक जाहिरातबाजी करण्यात आली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या जाहिरातीला राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असं शीर्षक देण्यात आले आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च समजत राष्ट्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे म्हंटले जात होते. मात्र या जाहिरातीवरून शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचे दाखवण्यात आल्याचे दिसते. … Read more

Maharashtra Politics : “सध्या जनतेच्याच पैशाने मस्तपैकी…”; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबई – जाहिरातींचा खर्च आता 55 कोटी नाही, तर 100 कोटी रुपयांवर जाणार आहे कारण सध्या सत्ताधाऱ्यांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत. लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे, असा थेट हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सरकारने जर वेगवेगळ्या योजना आणि त्या योजनांबद्दल … Read more