पुणे जिल्हा : भात पिकाला अवकाळीचा फटका

भोर तालुक्‍यात काढणीस तुरंब्या झडल्याने नुकसान भोर – भोर तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून भात काढणीची लगबग सुरू असताना बुधवारी (दि. 8) सकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भोर तालुक्‍यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मांढरदेवी (ता. वाई) च्या दिशेने तालुक्‍याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी काढणीस … Read more

पुणे जिल्हा : अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांचेही बळी जातील

ऍड. असीम सरोदे ः इंदापूर येथील झाड व पक्ष्यांचा बळी गेलेल्या ठिकाणची पाहणी इंदापूर – इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे गढीवरील पुरातन वृक्ष म्हणजेच हेरिटेज ट्री बेकायदेशीरपणे पाडल्याने, त्यामध्ये शेकडो चित्रबलाक व वटवाघुळ तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांचा नाहक बळी गेला. घटनास्थळाची वकिलांनी पाहणी केली. आता कायदेशीर लढाई लढताना, न्यायिक मार्गाने लढा देणार आहोत. पक्षांचे बळी गेले तसे … Read more

हवेच्या प्रदूषणामुळे डिप्रेशनचा धोका; विषारी हवेमुळे फुफ्फुसे आणि मेंदूलाही त्रास

लंडन : आधुनिक काळातील प्रगतीची दुसरी बाजू म्हणून नेहमी प्रदूषणाकडे पाहिले जाते सर्वच प्रकारचे प्रदूषण मानवी जीवनासाठी धोकादायकच मानले जाते. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे हवेच्या प्रदूषणामुळे फक्त फुफुसांनाच धोका निर्माण होतो असे नाही तर मेंदूला सुद्धा धोका होतो आणि त्यातूनच डिप्रेशनसारखे विकार उद्भवू शकतात. नेटवर्क ओपन जर्नल आणि जामा सायकॉलॉजिकल जर्नल या नियतकालिकांनी याबाबतचे संशोधन … Read more

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

इंदोर – मध्य प्रदेशातील विदिशा येथे भाजपचे नगरसेवक संजीव मिश्रा यांनी दोन मुले आणि पत्नीसह विष प्राशन करून आत्महत्या केली. मुलांचा जागीच मृत्यू झाला तर पती-पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येच्या काही वेळापूर्वी संजीवने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यात त्यांनी लिहिले की, ‘देव हा आजार, मस्कुलर डिस्ट्रॉफी डीएमडी, अगदी शत्रूच्या मुलांनाही … Read more

पुणे जिल्हा : जुन्नरमधील 4 हजार 900 हेक्‍टर क्षेत्र बाधित

खरीप हंगाम वाया : तालुक्‍यात आतापर्यंत 330.8 मिमी पावसाची नोंद काही ठिकाणी पंचनामे पूर्ण रामदास सांगळे बेल्हे – जुन्नर तालुक्‍यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्‍यातील सप्टेंबर महिन्यात 75.6 सरासरी पाऊस झाला आहे तर एकूण 330.8 मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. या पावसामुळे तालुक्‍यातील 4 हजार 900 हेक्‍टर क्षेत्र … Read more

पुणे जिल्हा : शासन निर्णयानुसारच नुकसानग्रस्तांना मदत

वेल्हे तालुक्‍यात अतिवृष्टीचा फटका ः प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण वेल्हे – वेल्ह्याच्या विविध भागांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे , शेतकऱ्यांचे शेतीबरोबरच अन्यही नुकसान झाले आहे. रस्ते आणि महावितरणचे यात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. शासन नियमानुसार लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. वेल्हे तालुक्‍यामध्ये … Read more

रिंगरोडचा “समृद्धी’ पॅटर्न; भूसंपादन आणि बाधितांना पाचपट मोबदला

स्वेच्छेने जमिनी देणाऱ्यांना 25% जादा रक्‍कम असा असेल रिंगरोड प्रकल्प * 68 कि.मी. लांबी * 695 हेक्‍टर भूसंपादन पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य शासन रिंगरोड प्रकल्प राबवत आहे. यासाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रिंगरोडच्या कामास गती मिळाली आहे. पश्‍चिम रिंग रोड हा भोर, हवेली, … Read more

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार – मंत्री विजय वड़ेट्टीवार

चंद्रपूर : सावली तालुका आणि परिसरात गोसीखुर्द प्रकल्पामुळे सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे या परिसरात धानासाठी बारमाही पाणी उपलब्ध आहे. मात्र, वरचा अवकाळी पाऊस आपल्या हाती नाही. काही दिवसांपूर्वी या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

काळजी घ्या! सातारा जिल्ह्यात आणखी 540 जण बाधित

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (शनिवार, दि. 4) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 540 नागरिक करोनाबाधित झाले असून, गेल्या 24 तासांमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 67 रुग्णांना रविवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. जिल्ह्यातील करोनाबाधितांची … Read more

Lockdown : ‘जादा करोना बाधित आढळल्यास, सहा आठवडे लॉकडाऊन’

नवी दिल्ली  – ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर 10 टक्‍क्‍यापेक्षा अधिक आहे, तेथील लॉकडाऊन आणखी सहा ते आठ आठवड्यांनी वाढवण्याची गरज असल्याचे मत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्‍त केले. आज देशातील 718 जिल्ह्यांपैकी तीन चतुर्थांश जिल्ह्यांमध्ये हा दर 10 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. त्यात मुंबई, दिल्ली, बंगळुरू यांसारख्या महानगरांचा समावेश आहे. जिथे … Read more