अफगाणिस्तानच्या महिला फुटबॉलपटू पाकिस्तानात

इस्लामाबाद – तालिबान सरकारने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथे महिलांवर निर्बंध लादण्यास सुरवात केली होती. महिलांच्या खेळण्यावरही त्यांनी बंधने आणली होती. खेळणे म्हणजे निव्वळ देहप्रदर्शन अशी भूमिका तालिबानने घेतली होती. त्यामुळे अफगाणिस्तानच्या 32 महिलां फुटबॉलपटूनी आपल्या कुटुंबिंयासह पाकिस्तानाची वाट धरली. यापूर्वी महिलांना धमकावलेही जात होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन मानवतावादी व्हिसा देखिल काढण्यात आला. त्यानंतर या … Read more

तालिबान्यांच्या हाती लागलं घबाड; अमरुल्ला सालेह यांच्या घरातील संपत्ती मोजता मोजता आले नाकीनऊ

काबूल :  अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानला पंजशीरमधून मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.  मागच्या आठवड्यात तिथेदेखील तालिबानने आपला झेंडा फडकावला आहे. दरम्यान, पंजशीरमधून तालिबानला विरोध करणारे   माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून माेठा खजिना हाती लागला आहे. तालिबान्यांना सालेह यांच्या घरातून काेट्यवधी डाॅलर्स आणि साेन्याची बिस्किटे सापडली आहेत. नाेटा माेजताना तालिबान्यांना घाम फुटला. यासंबंधी एक … Read more

अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी भारताची भूमिका महत्वाची – अमेरिका

लंडन – अफगाणिस्ताबोबत अमेरिकेने केलेल्या योगदानामध्ये भारताची भूमिका महत्वाची आहे. तसेच अफगाणिस्तानच्या भविष्याबाबतही भारताची भूमिका महत्वाची आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. न्यूयॉर्कवर झालेल्या 9-11 या भीषण दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण होत असताना पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झेड तरार यांनी हे प्रतिपादन केले. 9-11 च्या हल्ल्याला कारणीभूत असलेल्या अल … Read more

अगाणिस्तानमध्ये शाळा, काॅलेज सुरु; मात्र मुली आणि मुलांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेत केला हा बदल

काबुल – अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेल्यानंतर शिक्षणाबाबत नव्या राजवटीची काय धोरणे असतील याबाबत उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील शिक्षण संस्था जरी सुरू करण्यात आल्या असल्या तरी शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये मुले आणि मुलींच्यामध्ये एक मोठा पडदा उभारण्यात आला आहे. प्रत्येक वर्गामध्ये असा पडदा उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. काबुल युनिव्हर्सिटीतील काही फोटो समोर आले असून … Read more

“आमच्या वाटेत कोणी आले तर याद राखा…”; पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा धमकीवजा इशारा

काबुल : अफगाणिस्तानमधील पंजशीरमधील युद्ध संपुष्टात आल्याची घोषणा तालिबानने केली. पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. आम्ही हा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. याच विजयासोबत अफगाणिस्तानमधील संपूर्ण युद्धविराम लागल्याची घोषणा तालिबानने जारी केलेल्या पत्रकात केली. यावेळी तालिबानने इशारा देखील दिला आहे. “जर कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला पंजशीरप्रमाणे हाताळले जाईल”, असा इशारा … Read more

अफगाण सीमेवरील स्फोटात पाकचे चार जवान ठार

पेशावर – अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमे नजिकच्या क्वेट्टा शहरानजिक आत्मघाती पथकातील एका दहशतवाद्याने घडवलेल्या स्फोटात पाकिस्तानच्या निमलष्करी दलातील चार जवान ठार झाले असून अन्य काही जण जखमी झाले आहेत. क्वेट्टा जवळच्या मियाघुंडी भागात तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठीच हा आत्मघाती हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या स्फोटात एकूण 19 जण जखमी झाले असून … Read more

तालिबानची भिती; अफगाणिस्तानच्या शेजारील देशांनी दिली शस्त्रे आणि युद्धसामुग्रीची ऑर्डर

मॉस्को – अफगाणिस्तानच्या शेजारी देशांना रशिया शस्त्रे आणि युद्धसामुग्री पुरवणार आहे. अफगाणिस्तानची सीमा ज्या देशांना जोडली गेली आहे अशा मध्य आशियातील देशांकडून शस्त्रे आणि हेलिकॉप्टर पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे, असे रशियाने म्हटले आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर ही ऑर्डर मिळाली आहे, असे रशियाने म्हटले आहे. पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचे सदस्य असलेल्या देशांबरोबरच ज्या देशांमध्ये रशियाचे लष्करी … Read more

तालिबानच्या भितीने प्रसिद्ध गायकाने सुरु केला भाजी विक्रीचा व्यवसाय

काबूल – तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथे अनेक घटना घडत आहेत. तालिबानकडून नागरिकांचा छळ करण्यात येत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक लोकांनी देश सोडला तर अजूनही काही लोक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. जे लोक तिथे राहिले ते भितीच्या छायेत जीवन जगत आहेत. अशातच येथील प्रसिद्ध गायक गायन सोडून भाजीविक्रेता बनल्याची माहिती समोर … Read more

अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचा आमचा निर्णय योग्यच – बायडेन

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील फियास्कोबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ज्या बायडेन यांच्यावर केली जाणारी टीका आता अधिक व्यापक स्वरूपात होऊ लागली असली तरी अध्यक्ष बायडेन मात्र जवळपास रोजच या निर्णयाचे ठासून समर्थन करताना दिसत आहेत. आपल्या सरकारचा हा निर्णय अत्यंत व्यवहार्य, तर्कशुद्ध आणि योग्यच होता असे त्यांनी आज पुन्हा एकदा म्हटले आहे. आपल्या निर्णयाची अमेरिकेच्या इतिहासात नोंद होईल … Read more

Afganistan Firing : आज पुन्हा काबुल विमानतळाजवळ गोळीबार; सात ठार

काबुल – काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळानजिक झालेल्या गोळीबारात आज आणखी सात जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ठार झालेले सर्व जण अफगाणि नागरीक आहेत अशी माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे. हा गोळीबार इस्लामिक स्टेटशी संबंधीत असलेल्या गनिमांनी केल्याचे वृत्त आहे. तथापि काबुल विमानतळाच्या दिशेने होणारी गर्दी रोखण्यासाठी तालिबानी गनिमांनीही तेथे आज रविवारी हवेत गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. … Read more