पुणे जिल्हा : कृषी विधेयकांतील गैरसमज लवकर दूर होईल

रेडा (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने पारित केलेली 3 कृषी सुधारणा विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. विधेयकातील तरतुदींसंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद सुरू आहे. शेतकऱ्यांचे कृषी विधेयकासंदर्भातील गैरसमज लवकर दूर होतील, असा विश्‍वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्‍त केला. भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची नवी दिल्ली येथे शुक्रवार (दि.18) … Read more

पुणे शहर काँग्रेसच्या वतीने शेतकरी व कामगार विधेयकाविरोधात ‘सत्याग्रह’

पुणे – शहर काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी किसान अधिकार दिवस पाळण्यात आला. शनिवार दि.(31ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सत्याग्रह’ करण्यात आला. ‘भाजप हटाव, देश बचाव’चा फ्लेक्स यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात होते.

राजस्थानात 31 ऑक्‍टोबरला केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात विधेयके

जयपूर – पंजाबप्रमाणेच राजस्थान सरकारनेही केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात स्वतंत्र विधेयके मांडण्याचा निर्णय घेतला असून राजस्थान विधिमंडळाच्या अधिवेशनात 31 ऑक्‍टोबरला ही विधेयके सादर केली जाणार आहेत. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ट्‌विटरवरून ही माहिती दिली. कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी वचनबद्ध असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जी भूमिका घेतली आहे ती … Read more

…राजीनामा देण्यासही कचरणार नाही – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह

चंदिगढ – केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे पंजाबातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून या अन्यायाच्या पुढे झुकण्याऐवजी आपण राजीनामा देण्यासही मागे पुढे पहाणार नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ अमरिंदरसिंह यांनी म्हटले आहे. केंद्राच्या या कायद्यांमुळे राज्यातील स्थैर्य आणि शांततेला धोका निर्माण होत असून त्यातून राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही अत्यंत … Read more

‘शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही’

पुणे – कृषी प्रधान देशातील शेती उद्‌ध्वस्त करणारे कायदे भाजप सरकारने आणले आहेत. उद्योगपती आणि भांडवलदारांच्या हिताचे हे कायदे रद्द होईपर्यंत कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला. भाजप सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन केले जात असून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. कसबा मतदारसंघ ब्लॉक … Read more

कृषी कायद्यास स्थगिती देणाऱ्या ‘महाआघाडी’च्या आदेशाची होळी

केंद्राचा नवीन कृषी कायदा : मावळ भाजपचे निषेध आंदोलन वडगाव मावळ – कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, दलाल, मापाडी यांच्या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करणारा व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालविषयी स्वांतत्र्य देणारा नवीन कृषी कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने तो कायदा राज्यात लागू न करता त्यास स्थगिती आदेश दिला. त्याच्या निषेधार्थ भाजपचे तालुका … Read more

सत्तेचे ‘गड’ जिंकले तरी एनडीएतील दोन ‘सिंह’ मात्र गमावले

मुंबई – शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय  शनिवारी जाहीर केला. ही घडामोड कृषी विधेयकांवरून मोदी सरकारला बसलेला हादरा मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्र सामाना अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंजाबच्या अकाली दलानेही एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा त्याग केला आहे. भाजपशी त्यांचीही प्रदीर्घ साथसंगत होती, पण … Read more

कृषी विधेयकप्रकरणात अजित पवारांनी जाहीर केली भूमिका

पुणे – केंद्र सरकारने कृषी सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर देशभरात अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. विविध शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कॉंग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. कृषी सुधारणा व कामगार विधेयकाची अंमलबजावणी राज्यात होऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले.   दरम्यान, या विधेयकामुळे कोणते नवीन प्रश्न निर्माण होतील, तसेच न्यायालयात … Read more

कृषी विधेयकांचा विषय जाणार सर्वोच्च न्यायालयात

चंडीगढ – देशभरातील वातावरण ढवळून काढणाऱ्या वादग्रस्त कृषी विधेयकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात पोहचण्याची शक्‍यता आहे. त्या विधेयकांना न्यायालयात आव्हान देण्याची तयारी पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने सुरू केली आहे. पंजाबचे अर्थमंत्री मनप्रितसिंग बादल यांनी शुक्रवारी लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती दिली. दोन मुद्‌द्‌यांवरून कृषी विधेयकांना आव्हान दिले जाईल. पहिला मुद्दा म्हणजे कृषी … Read more

भाजीपाल्याचा राष्ट्रीय वस्तू विनिमय यंत्रणेत समावेश करा

पिंपरी-चिंचवड चेंबरची मागणी : पंतप्रधान, कृषीमंत्र्यांना निवेदन पिंपरी – शेती सुधारणा विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. मात्र, या विधेयकाला देशात विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी भाजीपाला व फळांचा राष्ट्रीय वस्तू विनिमय यंत्रणेत समावेश करावा. तसेच शेतीला उदयोगाचा दर्जा मिळावा, यामुळे शेती पीके घेणे व वित पुरवठा औद्योगिकीकरण कक्षेत आणणे रिझर्व बॅंकेला शक्‍य होईल, … Read more