Maharashtra : एक रुपया पीक विमा योजनेमध्ये ६६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

पुणे :- राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेमध्ये आजपर्यंत ६६ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. राज्यात विमा संरक्षित क्षेत्र ४२.३० लाख हेक्टर आहे. राज्याचे १ … Read more

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत

पुणे :- चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल म्हणजे ८७ टक्के बियाण्याचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मिमी असून आत्तापर्यंत २२७.३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी ४६.७ मे. टन … Read more

शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणीसाठी अतिरिक्त रक्कम देऊ नये – कृषि आयुक्त चव्हाण

पुणे :- शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून https://pmfby.gov.in या पोर्टलवर पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते. … Read more

Maharashtra : पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी; कृषि आयुक्ताचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे :- खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात २०.६० लाख हेक्टर म्हणजे १४ टक्के पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. चालू खरीप हंगामाकरिता राज्यास १९.२१ लाख … Read more

Maharashtra : राज्यात लवकरच २ हजार ७० कृषि सेवकांची पदभरती – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे :- कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता याच्या ८० टक्के म्हणजे २ हजार ७० पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असून शासनाची मान्यता प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. आयुक्त चव्हाण यांनी पुढे … Read more