Pune: शेतकरी, वितरकांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

पुणे – राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२४४६६५५ उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या … Read more

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनी ‘कृषी विभागा’च्या लक्षवेधी चित्ररथाचे सादरीकरण…

मुंबई : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती. राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत – ‘प्रति थेंब अधिक पिक’ यामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच महिला … Read more

PUNE: शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश; जिल्ह्यात फक्‍त 67 टक्‍के पाऊस!

पुणे – जिल्ह्यातील 54 महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड सुमारे 22 ते 35 दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्‍यात आली आहेत. आता कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 455 मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी 684 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत हा पाऊस केवळ … Read more

कृषी विभागामार्फत पीक स्पर्धेचे आयोजन; 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

पुणे – कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग … Read more

कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषीमंत्री मुंडे

मुंबई :- महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. त्यासाठी अर्ज प्रक्रिया कमी कालावधीची व सोपी … Read more

Krushi Vibhag Bharti 2023 : कृषी विभागात सरळसेवेने विविध पदभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आजपासून प्रक्रिया सुरु…..

मुंबई :- कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी दि.०३ एप्रिल २०२३ ते दि. ०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१३/०७/२०२३ ते दि. २२/०७/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज प्रणाली खुली … Read more

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात कृषी विभाग आक्रमक; कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काल हिंगोलीच्या कृषी विभागाच्या कार्यालयात चांगलाच गोंधळ  केला. दरम्यान, त्यांच्या या कृतीच्या विरोधात कृषी विभाग आक्रमक झाला आहे. त्यांच्या विरोधात आज हिंगोलीच्या कृषी विभागातील कर्मचारी आंदोलन करणार आहेत. संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षकांना शिवराळ भाषेचा वापर करत धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. याविरोधात कृषी विभागातील कर्मचारी आक्रमक … Read more

कृषी विभागात लक्ष घालावे लागेल : आमदार मोहिते

कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा राजगुरूनगर – तालुक्‍यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा फायदा मिळाला पाहिजे, खेड कृषी विभागाचे काम समाधानकारक नाही, मला यात लक्ष घालावे लागेल, असा स्पष्ट इशारा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिला. खेड कृषी विभागाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण योजनेतून निवड झालेल्या शेतकरी लाभार्थीना अनुदानित ट्रॅक्‍टर, … Read more

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सक्षम : कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध बियाण्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत असून, खरीप हंगामात कृषी विभागाने सोयाबीन, मूग, बाजरी, मका या पिकांचे बियाणे प्रात्यक्षिक वाटपाचे नियोजन केले आहे. कोरोनाची मरगळ झटकत शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामाच्या मशागतीला वेग दिला आहे. यंदाचा खरीप हंगाम चांगला येईल अशी आशा असली तरी आर्थिक दुर्बल घटकासह मागासवर्गीय, विधवा, कोरोनाग्रस्तामुळे बाधित … Read more

कृषी विभागाकडून शेतमजूरांना कौशल्याधारित प्रशिक्षण

जिल्ह्यात सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत – पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावती : शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील सुमारे १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे. त्याचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतमजूर बांधवाना लाभ मिळण्यासाठी सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री … Read more