“शेतकऱ्यांच्या मागण्यावर..” कृषीमंत्री अर्जून मुंडा यांनी स्पष्ट केली भूमिका

नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी ज्या मागण्या पुढे करीत आंदोलन पुकारले आहे त्या मागण्यांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी आम्हाला वेळ लागेल असे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागण्यांवर विविध घटकांशी चर्चा करावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, आम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. … Read more

“परीक्षा उत्तीर्ण तरीही नियुक्तीस टाळाटाळ.. कृषी मंत्र्यांनी फाइल का अडवून ठेवली ?” विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीआधी आचारसंहित लागणार असल्याने विकासकामांना ब्रेक लागेल. हाच मुद्दा हेरत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याबाबत पाठवण्यात आलेली फाइल कृषिमंत्र्यांनी का अडवून ठेवली आहे? असा सवाल करत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्‍स वर … Read more

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण ! प्रकृतीबाबत माहिती देत म्हणाले,”नागपूर अधिवेशन..”

CORONA UPDATE – देशातील कोविड रूग्णांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविडचे ६५६ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. त्यामुळे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या आता ३७४२ इतकी झाली आहे. अशात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत … Read more

“दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या..” कांदा निर्यातीबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्टचं सांगितलं

बीड – केंद्राने कांद्याची निर्यात रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक ( onion export ) शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, कांद्याचे दर घसरले आहेत. दरम्यान यावर प्रतिक्रिया देतांना कृषिमंत्री मुंडे ( Dhananjay Munde ) म्हणाले की, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल ( Piyush … Read more

Arjun munda : अर्जुन मुंडा बनले भारताचे नवे कृषीमंत्री ; नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह दोन मंत्र्यांचे राजीनामे मंजूर

Arjun munda : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा (Arjun munda) यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. राज्यमंत्री … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता परीक्षणासाठी माती पाठवा पोस्टाने.. 7 दिवसांत मोबाईलवर मिळणार रिपोर्ट

लातूर – राज्यातील शेतीचे आरोग्य नको त्या मात्रामुळे खराब झाले असून कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणावर भर देणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जाणार आहे. (soil for testing) तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत करून माती परीक्षणासाठी आता शेतकरी आपल्या मातीचा बॉक्‍स माती परीक्षण केंद्राचा पत्ता टाकून त्यावर त्याच्या मोबाईल नंबरसह … Read more

Jalgaon : जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी – कृषिमंत्री मुंडे

मुंबई :- जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय … Read more

‘बैल पोळ्या’निमित्त कृषीमंत्र्यांकडूून शेतकरी बांधवांना शुभेच्छा; म्हणाले “शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात, सण-उत्सवात आम्ही…”

मुंबई : “कृषीप्रधान भारतात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचा सण म्हणजे, बैल पोळा! यानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा!”, असा संदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात व विशेष करून मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, परतीच्या पावसाने पाण्याची कमी भरून निघेल, अशा अपेक्षा असल्या तरीही खरीप हंगामातील पिकांवर … Read more

“कांदा उत्पादकांनी चिंता करू नये…’; केंद्रीय कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले? वाचा….

नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर, महाराष्ट्रसह अन्यत्र शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संबंधात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी कांद्याच्या भावाबाबत चिंता करण्याची गरज नाही. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणत्याही … Read more

पोस्टाद्वारे माती परीक्षणाची सुविधा देणार ! शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई – खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर अधिकाधिक भर द्यावा, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तर, शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाठविण्याची सुविधाही संबंधित विभागाशी चर्चा करून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुंडे म्हणाले आहेत. … Read more