शिर्डीच्या रणसंग्रामात खासदार लोखंडेची यंञणा सक्रिय ; उबाठा सेनेचे वाकचौरेंचा वैयक्तिक गाठीभेटीवर जोर

कौन बनेंगा खासदार चाय पे चर्चेतमध्ये येतीय रंगत राजेंद्र वाघमारे नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या राजकिय रणसंग्रमात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि उबाठा सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात ही सरळ लढत होत आहे, महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने दोन आजी – माजी खासदारांत होत असलेली ही लढत पक्ष आणि आघाडींपेक्षा वैयक्तीक गाठीभेटी घेतायत. त्यानुसार … Read more

जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार; दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड  : दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादम जखमी झाला असून याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्ट नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की घटनेतील फीर्यादी आबेद … Read more

‘इकडे उपोषण… तिकडे सेटलमेंट….’जनतेच्या प्रश्नाचा बागुलबुवा उभा करुन मांडले उपोषण…

राजेंद्र वाघमारे नेवासा  – जनहिताच्या सामाजिक प्रश्नाचा बागुलबुवा उभा करुन एका सत्ताधारी राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने जनतेच्या समस्याला न्याय मिळण्यापेक्षा उपोषणाचा देखावा मांडून केवळ स्वार्थ साधला गेल्यामुळे या नेवासा तहसिल कार्यालयासमोर झालेल्या उपोषणाची खमंग राजकिय चर्चा तालुक्यात मोठा चवीने सुरु झाली आहे इकडे उपोषण अन् तिकडे सेटलमेंट झाल्याची जोरदार चर्चा या मांडलेल्या उपोषणातून सुरु झाली आहे़. … Read more

अहमदनगर । नेवासा फाटा येथे रविवारी तीन तीस वाहतूक कोंडी

नेवासा प्रतिनिधी –  छञपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक आणि आंबेडकर चौकात रविवार (दि.३) रोजी सकाळी १० वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुक पोलीसांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे महामार्गावर वाहनधारकांना तीन तास वाहतुक कोंडीचा सामना करण्याची दुर्देवी वेळ वारंवार येत असल्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे वारंवार होणाऱ्या या वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांसह व्यावसायिकांतून वाहतुक पोलीसांच्या … Read more

नगर : खासगी वरचढ; सहकारी पिछाडीवर!

उसाला खासगीच्या बरोबरीने दर न दिल्यास सहकारी कारखाने अडचणीत येणार श्रीगोंदा (समीरण बा. नागवडे )- गेल्या काही हंगामांचा विचार करता ऊस दराच्या बाबतीत खासगी कारखाने वरचढ ठरत आहेत. त्या तुलनेत तालुक्‍यातील दोन्ही सहकारी कारखाने जवळपास दोनशे ते तीनशे रुपयांनी पिछाडीवर आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास सहकारी कारखानदारी अधिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. दरवर्षीच्या तुलनेत तालुक्‍यातील … Read more

आमदार असावा तर असा.! ना अंगावर चादर, ना डोक्याखाली उशी; कोविड सेंडरमध्येच झोपले निलेश लंके

मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडेल असून, काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने अहमदनगरमध्ये दोन ठिकाणी 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड … Read more

खटल्यासाठी हवेत सरकारी वकील उमेशचंद्र यादव

नगर – महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून  केडगावमध्ये 7 एप्रिल 2018 रोजी दोन शिवसैनिकांची हत्या झाली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरमधील पदाधिकार्‍यांनी शिवसेना पक्षाचे  नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या खटल्यातील संशयित मुख्य आरोपी सुवर्णा कोतकर या गुन्हा घडल्यापासून अजुनही पसार … Read more

महिलेवर सामूहिक अत्याचार दोघांना अटक, एक जण पसार

नगर – निंबोडी (ता. नगर) शिवारात 25 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अक्षय माळी, व आकाश पोटे, अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना  पोलिसांनी अटक केली असून, यातील पसार झालेल्या एकाचा … Read more

तोफखाना पोलीस ठाण्यातच एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

नगर – शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच एकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. याबाबत एका जणाच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी राजू मुरलीधर काळोखे याला ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात साहेबराव काते हे जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

‘नगर’मध्ये करोनाचा हाहाकार; बाधितांचा एक लाखाचा टप्पा पार

नगर  – नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा नवा उच्चांक झाला आहे. आज दिवसभरात तब्बल 1 हजार 996 नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आज अखेर जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख पार झाली आहे. जिल्ह्यात करोनाचा एक प्रकारे विस्फोटच झाला असून, नगरकरांसाठी धोक्याची घंटाच असल्याचे दिसत आहे. गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात हाजारांच्या पुढे करोना बाधित रुग्ण … Read more