पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रेसर

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या आणि वजन व उंची मोजमापांच्या माहिती संकलनामध्ये झालेल्या उच्च प्रगतीनुसार पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. पोषण ट्रक ॲपवरील वर्गीकरणाच्या अनुषंगाने केंद्र शासनास राज्य शासनाकडून अवगत केले गेले असल्याने व त्यानुषंगाने केंद्र शासनाकडून कार्यवाही सुरु असल्याने कुपोषित मुलांचे योग्य वर्गीकरण पोषण ट्रॅकरमध्ये दिसून आले आहे. कुपोषित … Read more

अरे वा! गुजरातमध्ये शुद्ध सोन्या, चांदीच्या राख्या लाँच; पहा एका राखीची किती आहे किंमत?

राजकोट: भावा-बहिणीच्या पवित्र नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन हा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. याच रक्षाबंधनासाठी सर्वात आकर्षक राखी आपल्या भावाच्या हाती बांधता यावी यासाठी बहिणी धडपड करत असतात.  अशाच बहिणींसाठी बाजारात सोन्या-चांदीच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. रक्षाबंधनाच्या सणापूर्वी गुजरातच्या राजकोटमधील ज्वेलर्सनी यावर्षी शुद्ध सोन्या -चांदीच्या राख्या बाजारात आणल्या आहेत. 22 कॅरेट सोन्याने सोन्याच्या राख्या … Read more

विराट कोहली ‘या’ बाबतीत ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा सरस

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक इन्स्टाग्रामच्या प्रभावशाली ( top Instagram influencers worldwide ) व्यक्तीच्या यादीत टॉप 25 मध्ये स्थान मिळविले आहे. ही यादी जागतिक डेटा संग्रहण आणि विश्‍लेषण करणारे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) हाइप ऑडिटरने  ( Hype Auditor ) जाहीर … Read more

#IPL2020 : फ्युचर समूहानेही बीसीसीआयशी घेतली फारकत

मुंबई –आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाची चिंता काही केल्या कमी होताना दिसत नसून मुख्य प्रायोजक व्हिवोने करार संपुष्टात आणल्यानंतर आता फ्युचर समूहानेही बीसीसीआयशी फारकत घेतली आहे.  अर्थात, आता स्पर्धेला फटका बसणार असे विधान काही सदस्यांनी केल्यावर त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. तुम्हाला तोटा होणार नसून केवळ नफा कमी होणार आहे, अशा प्रतिक्रिया काहींनी व्यक्‍त … Read more

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : मेस्सीच्या कामगिरीने बार्सिलोनाची आगेकूच

बार्सिलोना – लिओनेस मेस्सीने डाव्या पायाला झालेल्या दुखापतीनंतरही केलेल्या दोन अफलातून गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत नापोलीवर 3-1 असा विजय मिळवला. ऍग्रीगेट गुणांच्या मदतीने या विजयाची नोंद 4-2 अशी झाली असली तरीही बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला हेच या सामन्याचे वैशिष्टय ठरले. या फेरीत आता त्यांची लढत बायर्न म्युनिकशी होणार आहे. या सामन्यात … Read more

#EPL : सामना बरोबरीत, तरीही मॅंचेस्टरची आगेकूच

लंडन –करोनाचा धोका कमी झाल्यावर मैदान रिकामे ठेवून इंग्लिश प्रीमिअर लीगला पुन्हा एकदा सुरुवात झाली. बलाढ्य क्‍लब अशी ओळख असलेल्या मॅंचेस्टर युनायटेडला ब्रुनो फर्नांडिसने केलेल्या महत्त्वपूर्ण गोलमुळे टॉटनहॅमशी बरोबरी साधता आली. अर्थात, या बरोबरीनंतरही मॅंचेस्टरने आगेकूच कायम राखली आहे.  स्टिव्हन बर्गविनने पहिल्या हाफमध्येच गोल करत टॉटनहॅमवर दडपण टाकले. हा गोल मॅंचेस्टरला चांगलाच झोंबला. मात्र, त्यानंतर … Read more

मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला ‘हे’ नियम पाळावे लागणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागच्या आठवडयात अनलॉकडाउन 1.0 जाहीर करत मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. येत्या आठ जूनपासून काही राज्यांमध्ये मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल खुली होणार आहेत. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर आता आपल्याला पूर्वीसारखे बिनधास्तपणे वावरता येणार नाही. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. केंद्र सरकारने त्या दृष्टीने काल संध्याकाळी … Read more

IndonesiaMasters : सिंधूची आगेकूच; सायनाचा पराभव

जकार्ता : भारताच्या पी.व्ही. सिंधूने इंडोनोशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच केली आहे तर सायना नेहवाल हिला मात्र पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला आहे. World champion P V Sindhu advances to second round of Indonesia Master with win over Japan's Aya Ohori. — Press Trust of India (@PTI_News) January 15, 2020 महिलाच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत पाचव्या … Read more