nagar | आमदारांच्या कार्यालयासमोरून दुचाकी चोरीला

जामखेड, (प्रतिनिधी) – चोरटे कधी आणि कुठे चोरी करतील, याचा काही नेम नाही. आता शहरातील आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोरूनच एकाची दुचाकी चोरीला गेली. येथील खर्डा रोडवरील आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर महेंद्र बारस्कर यांनी मोटार सायकल (GJ १६ m ४८२०) पार्क करून कामानिमित्त निघून गेले. नंतर ते पार्किंग ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी … Read more

nagar | आनंदऋषीजी नेत्रालयात पहिली बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

नगर, (प्रतिनिधी) – जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी नेत्रालयात पहिली कॉर्निया (बुबुळ) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. नेत्रालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.अशोक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नलिनी महेंद्रुकर यांनी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला दृष्टी परत मिळाली असून तो सामान्य जीवन जगू शकतो. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत मोफत करण्यात आली, अशी माहिती … Read more

nagar | छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री सन्मानाचा आदर्श समाजपुढे ठेवला

नगर, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याच्या माध्यमातून आदर्श जगासमोर ठेवला. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावले. त्यामुळे आजप्रत्येक गोष्ट म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव पुढे येते. तसेच स्त्री सन्मानाचा आदर्श समाजापुढे ठेवला, शेतकर्‍यांसाठी ते मदत करत राहीले, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपण फक्त जयंती व पुण्यतिथीच्या … Read more

nagar | गोमांस वाहतूक करणारी पिकअप पलटी

पारनेर, (प्रतिनिधी) – दुभाजकावर पिकअप धडकून पलटी झाल्याने तिघे गंभीर जखमी झाले असन, सुपा पोलिसांनी मुद्देमालासह तिघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत प्रकाश कांडेकर यांनी फिर्याद दिली. दि.२४ मार्च रोजी सकाळी ११ च्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी ( एमएच-१३ एएन १०२९) नगर-पुणे महामार्गाने नगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना नारायणगव्हाण … Read more

nagar | जामखेड- श्रीगोंदा रोडचे काम निकृष्ट दर्जाचे

माहिजळगाव, (वार्ताहर)- माहीजळगाव चौफुला येथे जामखेड- श्रीगोंदा या रस्त्याचे काम चालू आहे. एक महिन्यापूर्वी झालेला काँक्रीट रोड आज पूर्ण खराब झाला असून, त्या काँक्रीटला जास्त पाणी न मारल्यामुळे रस्त्याला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. माहिजळगाव येथील रोडचे काम चालू असताना बसस्थानक पाडले असून त्या जागेवर ठेकेदाराने बसस्थानक बांधले नाही. जुन्या बस स्टॅन्डची जागा सोडून दुसऱ्या … Read more

nagar | अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

नारायणडोहो, (प्रतिनिधी) – अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर – जामखेड रोडवर चिचोंडी पाटील गावाजवळ सांडवे फाट्यावर सोमवारी (दि.२५) पहाटे १.१० च्या सुमारास घडली. प्रतिक प्रशांत खांदवे (वय २२, रा. सांडवे, ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत प्रतिक हा जामखेड रोडने गावाकडे जात … Read more

महेंद्र गायकवाड ठरला ‘छत्रपती शिवराय केसरी’चा मानकरी; पटकावली अर्धा किलो सोन्याची गदा

अहमदनगर – छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा दिनांक 21 ते 23 एप्रिलदरम्यान अहमदनगरच्या वडियापार्क मैदानावर आयोजित करण्यात आली होती. जवळपास बाराशे मल्ल या कुस्ती स्पर्धेसाठी हजर झाले होते. तसेच महाराष्ट्र केसरी 2023 चा विजेता शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक, महेंद्र गायकवाड अशा दिग्गज मल्लांनी देखील सहभाग नोंदविला होता. काल दि. 23 एप्रिल … Read more

आता भिंगारमध्येही शिवसेनेला खिंडार; शहरप्रमुखासह तीन माजी नगरसेवक शिंदे गटात

नगर  – नगर शहर शिवसेनेत फूट पडलेली असताना भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे भिंगार शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे यांच्यासह छावणी मंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रकाश फुलारी, सदस्य संजय छजलानी आणि रवींद्र लालबोंद्रे, प्रशांत डावरे यांच्यासह एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाला आहे. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल … Read more

1 लाख 20 हजार रुपयात घरकुल बांधायचं कसं? अनुदानातून विटा अन् वाळूदेखील येईना…

योगेश गांगर्डे कर्जत – करोनानंतर सावरणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे एकापाठोपाठ एक असे धक्के बसत आहेत. इंधन व जीवनावश्यक वस्तूबरोबर सिमेंट, विटा, लोखंडाचे दर वाढल्याने या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही वर्षात सिमेंट, विटा, वाळू आणि लोखंड या बांधकाम साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत घरकुलाचे अनुदान मात्र जैसे थे … Read more

शनि चौथरा भाविकांसाठी खुला

शनिशिंगणापूर (वार्ताहर) – श्रावण महिना सुरू होत असल्याने शनिशिंगणापूर येथे दररोज पहाटे 5 ते 7 यावेळेत महिनाभर शनिचौथरा भाविकांसाठी खुला झाला. सकाळी दोन तास भाविकांना मोफत दर्शन व्यवस्था असणार आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. या काळात भाविकांना थेट मूर्तीला जल अर्पण करून तेलाने अभिषेक करता येणार आहे. श्रावण महिन्यात शनिदेवाच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने … Read more