माजी सरपंच गफ्फार पठाण यांच्याकडून अनोखी कार्तिकी पायी दिंडीची सेवा

जामखेड – शहराची नामांतरे, जातीय-धार्मिक तेढ पसरवणाऱ्या अफवांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स, हिंदू आक्रोश मोर्चा, व्हॉट्सअपची स्टेटस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढत चाललेल्या आपण पाहिल्या. मात्र तालुक्यातील पाटोदा ग येथील माजी सरपंच गफ्फार पठाण याला अपवाद ठरले आहे! ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या सानेगुरुजींच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव येतो ते म्हणजे … Read more

पोलीस स्टेशन रक्तदान शिबीरात नागरिकांचा प्रतिसाद

जामखेड – मुंबईतील २६/११ हल्ल्यात शहीद जवानांच्या स्मरणार्थ व हुतात्मा दिन स्मरणार्थ तरुणांमध्ये देशा, समाज व राष्ट्राप्रती प्रेमाची अन् त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलिस ठाण्यातर्फे सोमवारी (दि.४) रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असुन 111 जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनीकांत जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रांताधिकारी सायली सोळंके … Read more

ओढे-नाल्यांतील पाइप काढण्यासाठी आणखी तीन महिने मुदत

नगर – नगर शहरातील ओढे-नाले बुजवून सिमेंटचे पाईप टाकून त्यावर झालेल्या पक्‍क्‍या बांधकामांची अतिक्रमणे काढण्यास उप लोकायुक्त भाटिया यांनी आता महापालिकेला आणखी तीन महिने मुदत दिली आहे. त्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे. शहरातील 41 ओढ्या-नाल्यांपैकी काही ओढे-नाले बुजवून तेथे जमिनी करून लेआऊट टाकण्यात आले तर काही ओढ्या-नाल्यांतील पाण्याचे प्रवाह सिमेंट पाईपद्वारे वळवले गेले. मात्र, यामुळे … Read more

शेतीच्या वादातून मोटारसायकल पेटवली

जामखेड – वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन तु आम्हाला परत का देत नाहीस? या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या शेताजवळ लावलेली मोटारसायकल पेटवून दिली या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, फिर्यादीचे वडील रामभाऊ हजारे यांनी जवळा गावात राहणारे महेबुब गुलाब शेख यांच्या मालकिची जवळा गावात शेतगट … Read more

धर्मांतराला विरोध करणाऱ्या युवकालाच पोलिसांकडून अमानुष मारहाण

राहुरी – तालुक्‍यातील उंबरे येथील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर प्रकरणा विरोध करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करून अटक झाली. यातील प्रतीक धनवटे नावाच्या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली असा आरोप आ. नितेश राणे यांनी विधानसभेत केला. जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी बुधवारी दि.2 रोजी सकाळी विधानभवनात आ. नितेश राणे यांची भेट घेऊन उंबरे येथील प्रकरणाची … Read more

हिंदू समाजाच्या मुलांवरील गुन्हे मागे घ्या

राहुरी – आम्हाला वेळीच कळाले असते तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी मुलींच्या छेडछाडीचा प्रकार गांभीर्याने घ्यावा, अन्यथा आम्हाला दखल घ्यावी लागेल. अटक करण्यात आलेल्या हिंदू समाजाच्या मुलांवरील दाखल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केली. उंबरे गावातील दोन गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी हिंदू समाजाची बैठक पार पडली. … Read more

प्रकल्पग्रस्त जमिनीवरील सातबारा नाव काढण्यासाठी कार्यवाही करा: महसूलमंत्री विखे

पाथर्डी – बहुचर्चित व विवादीत एरडा मध्यम प्रकल्प 2007 साली रद्द झाला, परंतु प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाचे नाव असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी होत्या. या जमिनी परत शेतकऱ्यांच्या नावे लावण्यासाठी जवखेडे खालसा, जवखेडे दुमला, हनुमान टाकळी, कोपरे येथील शेतकऱ्यांनी आमदार मोनिका राजळे यांना वेळोवेळी निवेदने दिली होती. यासंदर्भात आज विधानभवनात महसूलमंत्री मंत्री विखे … Read more

साई संस्थानच्या जेवणाची राष्ट्रपतींना भुरळ!

शिर्डी – आशिया खंडातील सर्वांत मोठे मेगा किचन म्हणून ओळख असलेल्या साई संस्थानच्या प्रसादालयातील जेवणाची भुरळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पडली असून, त्यांनी थेट जेवण बनविणाऱ्या दोन्ही कुकला थेट राष्ट्रपती भवनात जेवण बनविण्यासाठी बोलविले आहे. मागील महिन्यात राष्ट्रपती साई समाधी दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी साई मंदिरात पाद्यपूजा करून बाबांविषयी सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर थेट … Read more

कामाचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग

संगमनेर – “माझ्यासोबत हॉटेलवर चल’ म्हणत एका व्यक्तीने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरात बसस्थानकावर घडली आहे. नाशिक येथे राहत असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लोणी येथील किरण किसन आहेर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किरण आहेर याने पीडित महिलेला संगमनेरमध्ये माझे डॉक्‍टर मित्र असून त्यांच्याकडे … Read more

ग्रामपंचायतींना करता येणार ऑनलाईन व्यवहार

नगर – आता ग्रामपंचायतीमध्ये करता येणार आहे ऑनलाईन व्यवहार करता येणार आहेत. येत्या 15 ऑगस्ट पासून त्यानुसार व्यवहार करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा हा ऑनलाईन करता येणार आहे. केंद्र सरकारने ग्रामपंचायतींना डिजिटल पेमेंटसाठी भीम-यूपीआय व “क्‍यूआर कोड’चा वापर करणे बंधनकारक … Read more