खासदार निलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

Ahmednagar : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांचा विजय झाला आहे. निकालाच्या दोन दिवसानंतर आज पारनेरमध्ये लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. राहुल झावरे असे लंके यांच्या समर्थकाचे नाव असून हल्लेखोरांनी झावरे यांच्या कारवर हल्ला केला. कारच्या काचा फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत … Read more

भानगडी बाहेर काढल्या तर तोंड दाखवणे अवघड होईल

सातारा – जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत आमचा मोठा वाटा आहे. आपल्या वडिलांच्या व आजोबांच्या सहकार्यामुळे ही संस्था शेतकऱ्यांसाठी उभी राहिली. या सहकार्याची जाणीव न ठेवता आमच्यावर बेछूट आरोप करू नयेत. आम्ही आपल्या भानगडी बाहेर काढल्या तर सार्वजनिक जीवनात तुम्हाला तोंड दाखवणे अवघड होईल, असा इशारा जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी प्रतापगड … Read more

नगर | पावसाची प्रतीक्षा ; शेती मशागतीच्या कामांना आला वेग

नगर – गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामानाने पिकांची वाताहात झाली. त्यातच गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. पिकांना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. आता पुन्हा बळीराजा शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला असून पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा असल्याचे दिसत आहे. दोन वर्ष पदरी निराशा पडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे, तरीदेखील खरीप हंगामातील पिकांसाठी … Read more

सोमा बोरुडे याने पटकाविली चांदीची गदा

नगर – भातोडी पारगावच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात शहरातील मल्ल पै. सोमा सुभाष बोरुडे यांनी मानाच्या कुस्तीत चांदीची गदा पटकावली. बोरुडे यांची कुस्ती ससेवाडी येथील मल्ल पै. गौरव जरे यांच्यात अटीतटीची झाली. यामध्ये बोरुडे याने कुस्ती चितपट करुन मानाची चांदीची गदा मिळवली. पै. सोमा सुभाष बोरुडे याने कुस्तीत चांदीची गदा पटकाविल्याबद्दल नालेगाव येथे सत्कार करण्यात … Read more

माजी आमदार नीलेश लंके यांचे संपर्क कार्यालय जमीनदोस्त

पारनेर – सुपा येथे थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली. राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली.अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेली बसस्थानक परिसरातील भिंत, टपऱ्या काढण्यात आल्या. माजी आमदार नीलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकातील संपर्क कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. सुपा बसस्थानक चौक … Read more

रोजगार हमी योजनेवर साडेतेरा हजार मजूर जिल्ह्यात २ हजार ६०९ कामे सुरू

नगर – जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात रोजगार हमी योजनेंतर्गत प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. शेतमजुरांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहेत. रोहयोंतर्गत जिल्ह्यात २ हजार ६०९ कामे सुरू असून १३ हजार ६५७ मजूर ही कामे करत आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कामांसाठी … Read more

नगर | शिक्षण क्षेत्रात प्रत्येक नवीन संकल्पना आणि पायंडा पाडणारे राज्य ठरले

नगर | ‘स्कूल-2 होम कनेक्ट’ हा शैक्षणिक उपक्रम महाराष्ट्र शासन शिक्षण संस्थापर्यंत पोहोचवून साध्य करण्यात यशस्वी ठरले असून, या अभियानाला अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा मोलाचा हातभार मिळाला आहे. हे अभियान दोन टप्प्यांत राबविले जाणार आहे. २०२४-२५ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. राज्यात ४३ लाख विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार … Read more

नगर | जिल्ह्यातील २२३ गावांना पुराचा धोका..!

नगर – पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी लागणारे साहित्य जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्ह्यातील २२३ गावे नदीकाठावर असून अतिवृष्टी झाल्यास या गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आठ प्रमुख नदी काठावरील २२३ गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता असते. या नागरिकांची … Read more

व्हाट्सॲप ग्रुपवर मेसेजने तणावाचे वातावरण

राहुरी  – व्हाट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्या. ही घटना तांदूळवाडी येथे दि. २४ मे रोजी घडली. या घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करत अनेक तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर फिर्याद दाखल करण्याची मागणी केली. अमोल चंद्रभान पेरणे या तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी आयुब … Read more

नगर – केंद्र शासनाने मल्लखांब खेळाचा सन्मान वाढवला ;पद्मश्री उदय देशपांडे

नगर – केंद्र शासनाने मल्लखांब क्षेत्रात अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार देऊन या खेळाचा सन्मान वाढवला. हा सन्मान सर्व मल्लखांबपटूंचा आहे. हा खेळ कॉमनवेल्थ, आशियाई व ऑलिंपिक मध्ये समावेश होण्यासाठी सर्वांपुढे मोठे आव्हान आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा खेळ पुढे घेऊन जायचा आहे. आपआपसातील मतभेद व गैरसमज दूर करुन समोपचाराने प्रश्‍न सोडवा. खेळाला … Read more