satara | वाईतील कर्वे महाविद्यालयास बीसीए अभ्यासक्रमास मान्यता

वाई, (प्रतिनिधी)- येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालयातील बीसीए अभ्यासक्रमास नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) मान्यता प्राप्त झाली आहे. अशी मान्यता प्राप्त झालेले वाई तालुक्यातील हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे. येत्या शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून बीसीए अभ्यासक्रमास इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर प्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा परिषदेने प्राप्त करून दिला आहे. … Read more

Pune: खासगी विद्यापीठांना युजीसीची मुभा

Universities

पुणे – देशभरातील राज्य, केंद्रीय आणि खासगी विद्यापीठांना दूरस्थ, ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम राबविण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) परवानगी, शिफारस घ्यावी लागणार नसल्‍याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारथीदासन विद्यापीठ आणि अन्य विरुद्ध एआयसीटीई आणि इतर (2001) 8 एससीसी 676 या प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार राज्य, केंद्रीय आणि खासगी विद्यापीठांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रम … Read more

पुणे | व्‍यवस्‍थापनशास्‍त्र पदवी अभ्यासक्रम आमच्याकडेच राहू द्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बीबीए, बीएमएस, बीसीए या व्‍यवस्‍थापनशास्‍त्र पदवी अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला आहे. त्याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही. यंदा निवडणूक वर्ष असल्याने या काळात विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य घटकांच्या नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, असे सूचित करुन हा निर्णय किमान एक वर्ष स्थगित करण्याची मागणी प्रोग्रेसिव्ह … Read more

भारतीय विद्यार्थ्यांना UGC चा इशारा; पाकिस्तानातून शिक्षण घेतल्यास मिळणार नाही भारतात नोकरी

नवी दिल्ली – भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांनी भारतातील विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमधून शिक्षण घेतले तर त्यांना भारतात नोकरी मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. दोन्ही संस्थांनी जारी केलेल्या आवाहनात भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश … Read more

शिक्षण संस्थांकडून वसतिगृह, वाहतूक शुल्काची वसुली

  वापर होत नसलेल्या सुविधांच्या शुल्काची आकारणी न करण्याच्या सूचना उल्लंघन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर होणार कारवाई पुणे – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांकडून वापर होत नसलेल्या सुविधांच्या शुल्काची आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश तंत्रशिक्षण संस्थांना दिले आहेत. एवढेच नव्हे, तर त्याचे उल्लंघन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे “एआयसीटीई’ म्हटले … Read more

बोगसगिरीच! अभियांत्रिकीचे तब्बल दीड लाख प्राध्यापक बोगस

पुणे – देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जवळपास दीड लाख प्राध्यापक बोगस असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) तपासणीतून स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे, तर काही अभियांत्रिकी महाविद्यालयात अजूनही नियमबाह्य प्राध्यापक कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय “एआयसीटीई’ने घेतला आहे. याबाबतची माहिती “एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. … Read more