पुण्यातील हवा प्रदूषणाचा होणार शास्त्रीय अभ्यास

स्वीत्झर्लंडतर्फे “सीएसआर’अंतर्गत निधी : शासकीय संस्थांची मदत घेणार पुणे – पुण्यातील हवा प्रदूषणाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच की काय शहराच्या हवा प्रदूषणाचा शास्त्रीय पद्धतीने सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, “तेरी’ अर्थात “दी एनर्जी ऍन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’, “नीरि’ अर्थात “नॅशनल एन्व्हॉरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’, आणि “एआरएआय’ या संस्था काम … Read more

पुणे – पोलीस वर्षानुवर्ष वायू प्रदूषणाच्या विळख्यात

त्याचा परिणाम केवळ शारीरिक, मानसिक नव्हे, तर कुटुंबावरही पुणे – वायू आणि ध्वनिप्रदूषणाचा थेट परिणाम जसा वाहन चालवणाऱ्यांवर होतो. त्यापेक्षा कैकपटीने जास्त परिणाम वाहतूक पोलिसांवर होतो. पोलिसांना यापासून रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. परंतु मुळातच वायूप्रदूषण रोखणे अधिक महत्त्वाचे असून, ती जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. वाहतूक पोलिसांची जवळपास दरवर्षीच फुप्फुसांची कार्यक्षमता तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात येते. … Read more

पुणे वाहतूक पोलिसांना मिळणार “मास्क’

प्रदूषणात वाढ होत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या पुणे – दिवसेंदिवस शहराच्या प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. या वाढत्या प्रदुषणाचा सर्वाधिक फटका वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चौकांमध्ये उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलिसांना बसत आहे. परिणामी त्यांना श्‍वसनाचा त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांना “मास्क’ देण्यात येणार आहेत. वाहतूक नियमनासाठी चौकाचौकांत उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलिसांना तासन्‌तास उभे राहावे लागते. शहरामध्ये … Read more

पुण्याभोवती हवा प्रदूषणाचा फास घट्ट

एप्रिलमध्ये नायट्रोजन ऑक्‍साईड प्रमाणाबाहेर : “पीएम-10′ सूक्ष्म धुलिकणांनीही भरीस भर पुणे – हवेतील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “पीएम10′ या घटकाबरोबरच नायट्रोजन ऑक्‍साईड या घटकाचे प्रमाणही धोकादायकरित्या वाढत आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार एप्रिलमध्ये हवेतील नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण नियोजित प्रमाणापेक्षा 48 क्‍युबिक मीटरने जास्त असल्याची निदर्शनात आले आहे. शहरातील हवेचे प्रदूषण ही एक गंभीर समस्या … Read more