अकोला: भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन

अकोला : अकोल्याचे भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शर्मा यांना कर्करोगाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज शुक्रवारी (दि. 3) रात्री 8 वाजता त्यांचे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. शर्मा यांच्या पार्थिवावर शनिवार (दि. 4) … Read more

मोठी बातमी: अकोल्यात भाजप नेत्याच्या कारचा अपघात; रुग्णालयात उपचार सुरू

अकोला : भाजपचे नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अकोल्याहून अमरावतीकडे जात असताना कुरणखेड जवळ बसची विजयराज शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीला धडक बसली. या अपघातात विजयराज शिंदे जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते अनिल बोंडे यांची … Read more

Drought In Maharashtra : महाराष्ट्रातील ‘हे’ 13 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये; पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर

मुंबई – राज्यात उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा ओढ दिल्याने अनेक भागात दुष्काळ सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषताः मराठवाड्यातील स्थिती गंभीर असून राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये ( Red Zone) असल्याची माहिती हवामान खात्याकडून (Department of Meteorology) देण्यात आली आहे. ( Maharashtra Drought) दरम्यान, राज्यातील बळीराजा अद्यापही जोरदार … Read more

पैशाचे आमिष दाखवून अकोल्यात ‘शुभम’ला बनवलं ‘मोहम्मद अली’ ?

अकोला – हिंदू दलित तरूणाचा मुस्लिम धर्मात धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगावातून समोर आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या मुलाचं धमकावून धर्मांतर झाल्याचा आरोप त्याच्या आईनं केला आहे. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह धमकावण्याचे गुन्हे … Read more

Akola : अखेर दीड महिन्यानंतर तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली

अकोला :- मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच अकोला कमी तापत असल्याचे जाणवत असून, दीड महिन्यानंतर प्रथम सोमवारी 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यापूर्वी 6 मे रोजी 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. लांबलेला मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असला तरी अकोल्यात मात्र तापमान रविवारपर्यंत 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्तच होते. विदर्भात मान्सूनचे आगमन साधारणपणे 15 जूनच्या आसपास … Read more

Maharashtra : भाजप आमदाराला अकोल्यात लुटण्याचा प्रयत्न; सोने खरेदी-विक्रीची रक्कम…

अकोला – महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात भाजप आमदाराला लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला अटक केली आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल हे त्यांच्या कारमधून घरी जात असताना रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आमदार वसंत खंडेलवाल पश्चिम विदर्भातील मोठे सराफा व्यावसायिक आहेत. ते गांधी रोडवरील आपल्या सराफा दुकानातून खंडेलवाल … Read more

इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यात हिंसाचार, 15 जण ताब्यात; शहरात संचारबंदी लागू

अकोला – महाराष्ट्रातील अकोल्यात दोन समाजातील लोकांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर जोरदार दगडफेक झाली. यादरम्यान दंगलखोरांनी अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. तेथे अनेक वाहने जाळण्यात आली. या घटनेत दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा परिसरात दाखल झाला. येथे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील … Read more

दुर्दैवी ! अकोल्यातील पारस गावात मंदिरावर झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू; 35 जण गंभीर जखमी

मुंबई : अकोला जिल्ह्यातील पारस गावात मंदिरावर झाड कोसळून 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 ते 25 जण जखमी झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाबूजी महाराज मंदिरात ही दुर्घटना घडली आहे. रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता त्याच वेळी मंदिरात 50 ते 60 भाविक होते. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातल्या पारस गावातील बाबूजी … Read more

Akola : जिल्ह्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलं महत्वाचं आवाहन

अकोला – प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवसात (मंगळवार दि.14 ते शनिवार दि. 18 मार्च) विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. #अकोला प्रादेशीक हवामान विभाग नागपुर यांच्यासंदेशानुसार मंगळवार दि.१४ ते शनिवार दि.१८दरम्यान अतिवृष्टी,विजांचा कडकडाट,ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी … Read more

अकोल्यातील अंतर्गत वादातून मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई; ‘या’ नेत्याची पदावरून हकालपट्टी

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शिंदे गटातील अंर्तगत कलह चव्हाट्यावर आला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे सोपवण्यात आलेली संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांची … Read more