‘शरद पवारांनाच भाजपसोबत युती करायची होती…’; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar | Devendra Fadnavis – शरद पवारांनाच भाजपसोबत युती करायची होती. तीनवेळा त्यांनी त्यासंदर्भातला निर्णय घेतला आणि नंतर तो फिरवला. आता मला असे वाटते की शरद पवार हे नेहमी अजित पवारांना पुढे करायचे आणि त्यांना व्हिलन बनवत होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार … Read more

महायुतीत ठाणे लोकसभा भाजपाला? ठाण्‍यात भाजपचे संजय केळकर इच्छुक

ठाणे – महायुतीत लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही अशीच स्थिती आहे. ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजप नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. संजय केळकर … Read more

Lok Sabha Election 2024 । लालूप्रसाद यादवही कॉंग्रेसला झटका देण्याच्या तयारीत; बिहारमध्ये महाआघाडीची स्थिती हाताबाहेर जाण्याचे संकेत

Lok Sabha Election 2024 – जागावाटपाच्या मुद्द्यावर बिहारमध्ये कॉंग्रेसची स्थिती उत्तर प्रदेशपेक्षाही नाजूक वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये कॉंग्रेसला लोकसभेच्या किमान १० जागा हव्या आहेत, मात्र राष्ट्रीय जनता दल त्यांना ६ पेक्षा एकही जास्तीची जागा देण्यास तयार नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अशी कोंडी आता निर्माण झाली आहे की राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आता … Read more

नवनीत राणाच्या उमेदवारीवरून महायुतीत नाराजीचा सूर; मित्र पक्षानेच घेतला रवी राणांचा समाचार

Navneet Rana | Ravi Rana | Lok Sabha Election 2024 – खासदार नवनीत राणा यांची भाजपवर उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, उमेदवारी घोषित होण्याआधीच अमरावती जिल्ह्यात महायुतीत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता महायुतीमधील शिवसेनेकडून (शिंदे गट) कॅप्टन अभिजित अडसूळ, प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि भाजपचे नेते … Read more

कॉंग्रेस- बसप युतीची शक्यता मावळली

लखनौ – उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या १० जागांसाठी आज मतदान झाले व एकूण ३९५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या एकमेव आमदाराने म्हणजे उमाशंकर सिंह यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत दिले. त्यावरून कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षात भविष्यात युती होण्याची जी शक्यता वर्तवली जात होती त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे. … Read more

भाजप म्हणतो, ही तर आंधळ्या-पांगळ्याची आघाडी

अहमदाबाद – कॉंग्रेस आणि आपमधील जागावाटप समझोत्याची आणि विशेषत: गुजरातमधील हातमिळवणीची भाजपने खिल्ली उडवली. वास्तवाकडे दुर्लक्ष करून त्या पक्षांचे एकत्र येणे म्हणजे आंधळ्या-पांगळ्याची आघाडी असल्याचे भाजपने म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असणाऱ्या गुजरातमध्येही कॉंग्रेस आणि आप एकत्रितपणे लढणार आहेत. त्या राज्यात लोकसभेच्या एकूण २६ जागा आहेत. त्यातील २४ जागा … Read more

ठरलं तर…! दिल्लीत काँग्रेसच्या ‘हाता’त आपचा ‘झाडू’; जाणून घ्या दोन्ही पक्षाने किती जागा घेतल्या वाटून ?

Congress - AAP Alliance।

Congress – AAP Alliance। लोकसभा निवडणूक 2024 साठी दिल्लीतून मोठी बातमी समोर आलीय. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात अखेर युती करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आज दिल्लीत दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली. आज दोन्ही पक्षाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात दोन्ही पक्षाच्या युतीची माहिती देण्यात आलीय. काँग्रेस नेते मुकुल वासनिक … Read more

पंजाबमध्ये अकाली दल-भाजप यांच्यातील युतीची चर्चा निष्फळ ; ‘या’ मुद्द्यांवर झाली युती फेल

Akali Dal-BJP Alliance।

Akali Dal-BJP Alliance। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एनडीए आपल्या गटाचा विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि अकाली दल यांच्यात पंजाबमध्ये युतीबाबत काही काळ चर्चा सुरू होती. आता मोठी बातमी समोर येत आहे, त्यानुसार पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप युतीची चर्चा फेल झालीय. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने पंजाबमध्ये एकत्र निवडणूक न लढवण्याची … Read more

“इंडिया आघाडी अशी कुठली आघाडीच नव्हती..” देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

मुंबई – इंडिया आघाडी अशाप्रकारची कोणतीही आघाडी अस्तित्वात नव्हती. या आघाडीवर मला पहिल्यापासून शंका होती आणि ती शंका कायमस्वरूपी असणार आहे, अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इंडिया आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात गोंधळ सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एकत्रित गायचं असेल, समुहगीत गायचं असेल, तर … Read more

Narayan Rane : लोकसभेआधी महायुतीत वादाची ठिगणी? नारायण राणेंचा उदय सामंतांवर पलटवार

Narayan Rane – मी कधी लोकसभेच्या दावेदारीवर भाष्य करतो का? युतीत नांदायचे असेल तर त्याचे पावित्र्य ठेवावे लागेल. एकदा मंगळसूत्र घातले की, त्याचे पावित्र्य जपावे लागेल, उदय सामंतांच्या लोकसभेच्या दाव्याच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. राणे म्हणाले की, उदय सामंत बोलतील आणि तसा निर्णय होईल, असे होणार नाही. … Read more