आयकॉनिक ‘ॲम्बेसेडर’ कार लवकरच भारतीय रस्त्यांवर धावणार; कसा असेल नवीन लूक? महत्वाचे अपडेट आले समोर…

Ambassador car | India : आजची पिढी कदाचित ॲम्बेसेडर कार ओळखत नसेल, पण ही कार एकेकाळी आयकॉन आणि शाही दर्जाचे प्रतीक होती. एक काळ असा होता की लोक ॲम्बेसेडर कारचे चाहते असायचे. नेत्यांची ओळख त्यांच्या गाड्यांवरून होते. जवळपास प्रत्येक नेत्याकडे ही कार असल्याची, अजून देखील काही लोकांच्या दारात ॲम्बेसेडर कार उभी असल्याचं पाहायला मिळतं. ही … Read more

Mumbai Marathon 2024 : केटी मून मुंबई मॅरेथॉनची अँम्बेसेडर….

मुंबई – पोल व्हॉल्टमध्ये दोन वेळा विश्वविजेती आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती केटी मूनची रविवारी येथे होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयोजकांनी बुधवारी ही माहिती दिली. मुंबई मॅरेथॉनला जागतिक अॅथलेटिक्समधून ‘गोल्ड लेव्हल’ शर्यतीचा दर्जा आहे. अमेरिकेच्या स्टार अॅथलीट मूनने २०२२ मध्ये यूजीन आणि २०२३ मध्ये बुडापेस्ट वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक … Read more

अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन ट्रोल होताच दिले स्पष्टीकरण; म्हणाला….

मुंबई – अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे ट्रोल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान प्रसारित झालेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार दिसला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे. मात्र या जाहिरातीबाबत अक्षय कुमारने स्पष्टीकरण दिले आहे. अक्षय कुमारने … Read more

Estonia vs Russia : रशियाच्या ‘त्या’ कृतीला इस्टोनियानकडून ‘जशास तसे’ पद्धतीने प्रत्युत्तर; राजदूतांची केली…

मॉस्को – रशिया आणि इस्टोनिया या दोन्ही देशांनी आपापल्या देशामधून एकमेकांच्या राजदूतांची हकालपट्टी केली. दोन्ही देशांनी “जशास तसे’ पद्धतीने या कारवाईला प्रत्युत्तर दिले आहे. आता आपल्या देशातील दूतावासाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांकडून केले जाईल, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्टोनियाचे राजदूत मॅग्नस लॅड्रे यांना पाचारण करून 7 फेब्रुवारीपूर्वी देश सोडून जाण्याचे आदेश दिले. … Read more

अँबेसिडर पुनरागमन करणार; इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – सन 1970 च्या सुमारास भारतीय रस्त्यावर अधिराज्य असलेली अँबेसिडर कार आता पुनरागमन करण्याची शक्‍यता आहे. मात्र हि कार आता इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता आहे. अँबेसिडर कारची निर्मिती हिंदुस्थान मोटर्सद्वारा करण्यात येत होती. 1985 भारतामध्ये या कार कंपनीचा वाटा तब्बल 75 टक्के इतका होता. मात्र नंतर नव्या कार बाजारात आल्यानंतर अँबेसिडर … Read more

पंडित बिरजू महाराजांनी शास्त्रीय नृत्य लोकाभिमुख केले – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य नृत्यकलेला समर्पित करताना भारतीय शास्त्रीय नृत्य अधिक लोकाभिमुख केले. अभिजात शास्त्रीय नृत्याचे ते आंतरराष्ट्रीय राजदूत होते. बिरजू महाराज प्रयोगशील होते व अनेकदा त्यांनी नवतेचा अंगिकार केला. संगीत … Read more

फ्रान्सने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील राजदूत माघारी बोलावले

पॅरिस – ऑस्ट्रेलियाने स्वतःचा आण्विक क्षमता असलेली पाणबुडी विकसित करण्यासाठी अमेरिकेबरोबर करार केल्यानंतर फ्रान्सने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील राजदूत माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रलियाने पाणबुडी फ्रान्सबरोबरचा करार रद्द करून अमेरिकेबरोबर करार केल्यामुळे नाराज झालेल्या फ्रान्सने या देशातूल राजदूतांना चर्चेसाठी माघारी बोलावले आहे. या प्रकरणाचा गांभर्य लक्षात घेऊन अध्यक्षांच्या सल्ल्याने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील राजदूतांना माघारी बोलावण्यात … Read more

पाकिस्तानची जागतिक पातळीवर पुन्हा नाचक्की

इस्लामाबाद – क्रिकेटपटूचा पंतप्रधान बनलेले इमरान खान यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये सर्व विरोधी पक्ष एकवटले असताना, आता त्यातून धडा घेण्याऐवजी, खान यांचे सरकार सातत्याने जागतिक पातळीवर देशाची नाचक्की आणि फटफजिती करुन घेत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी इस्लामिक दहशतवादावर एक वक्तव्य केले होते. यावरून मुस्लिम राष्ट्रांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पाकिस्ताननेही संसदेत निषेध प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे … Read more

महात्मा गांधींच्या पुतळा विटंबना प्रकरणी अमेरिकेने मागितली माफी

न्यूयॉर्क : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना  घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणी … Read more

तरणजितसिंग संधू भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत

नवी दिल्ली : वरिष्ठ राजनैतिक अधिकारी तरणजितसिंग संधू यांची भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते हषवर्धन श्रृंगला यांची जागा घेतील. श्रृंगला यांची याआधीच परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाली आहे. ते उद्या (बुधवार) नवा कार्यभार स्वीकारणार असल्याचे समजते. अमेरिकेतील राजदूतपदी नियुक्ती झालेले संधू भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) 1988 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते … Read more